दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 22 सप्टेंबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 01 आश्विन शके 1947; तिथि : प्रतिपदा 26:55; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 11:23
- योग : शुक्ल 19:58; करण : किंस्तुघ्न 14:06
- सूर्य : कन्या; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:35
- पक्ष : शुक्ल; मास : अश्विन; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
शारदीय नवरात्रारंभ
घटस्थापना
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट नियोजन करा. कुठलेही पाऊल उचलण्यापूर्वी परिणामांचा विचार करा. एखाद्या व्यक्तीच्या मदतीमुळे व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज अचानक कुठे प्रवासाला जावे लागू शकते.
वृषभ – अनपेक्षितरित्या खर्चात वाढ झाल्याने मन:शांती ढळेल. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. सर्व लोकांशी अंतर ठेवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचे असेल. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे.
मिथुन – काही अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सगळे आलबेल राहील. संभाषणाबाबत कायम स्पष्टता ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील.
कर्क – सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली आनंदी आणि रिलॅक्स करतील. व्यवहारात विश्वासार्ह नसलेल्या मित्रांपासून सावध राहा. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकून कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने अल्पावधीचे प्रशिक्षण घ्या. कामाच्या व्यग्रतेतून आज थोडीसी उसंत मिळेल.
सिंह – दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट आणि चोख ठेवा. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करा. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे.
हेही वाचा – हत्ती आणि युद्ध…
कन्या – नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आरोग्य सुधारण्याचा प्रयत्ना करा. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे आर्थिक चिंता उद्भवू शकते. स्पष्टतेशिवाय कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल.
तुळ – एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. व्यवसायात फसवले जाणार नाहीत, याची काळजी घ्या. चौकस राहा. मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमची स्थिती काय आहे हे प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात खूप अडचणी येतील.
वृश्चिक – कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची, सहानुभूतीची गरज असू शकते. बरोबरीच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आजवर आत्मसात केलेले ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य होऊ शकते.
धनु – कमकुवत इच्छाशक्तीमुळे भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकता. अनावश्यक खर्च टाळा. कामकाजातील हस्तक्षेपामुळे जोडीदार अस्वस्थ होईल. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.
मकर – तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. ध्यानीमनी नसताना एक देणेदार तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करू शकतो, हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव शीघ्रकोपी बनवू शकतात. त्यामुळे शांत राहा. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील.
कुंभ – काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे अस्वस्थ व्हाल. त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतील.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी पैशाचा यथायोग्य विनियोग आवश्यक
मीन – अनेक चिंतांनी ग्रासल्यमुळे तुमची प्रतिकारक्षमता घटेल आणि विचारशक्ती कुंठेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून सामना करण्यासाठी स्वत:ला उत्तेजन द्या. संपत्तीविषयक काही गोष्ट कोर्ट-कचेरीत प्रलंबित असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो. एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत कोणालाही कसलेही वचन देऊ नका.
दिनविशेष
सिनेअभिनेत्री दुर्गा खोटे
टीम अवांतर
भारतीय चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म 14 जानेवारी 1905 रोजी मुंबईत एका संपन्न कुटुंबात झाला. त्यांचे वडील पांडुरंग लाड हे बॅरिस्टर होते. दुर्गाबाईंचे शालेय शिक्षण कॅथिड्रल हायस्कूलमध्ये झाले. त्यांना शालेय वयापासून अभिनयात रस होता. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांवर प्रभूत्व होते. दुर्गाबाईंचा विवाह बॅ. विश्वनाथ खोटे यांच्याशी झालेला होता. विवाहानंतर काही कालावधीत दुर्गाबाईंनी घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे चित्रपटांत काम करण्याचा निर्णय घेतला. मोहन भवनानींच्या फरेबी जाल या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा छोटीशी भूमिका मिळाली. पण हा चित्रपट चालला नाही. त्यावेळी चित्रपटांमध्ये सहसा स्त्रिया काम करीत नसत. अशावेळी एका कुलीन घरातल्या स्त्रीने चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे त्यांना समाजातील काही लोकांची टीकाही सहन करावी लागली. पुढे प्रभात फिल्म कंपनीच्या व्ही. शांताराम दिग्दर्शित अयोध्येचा राजा (1931) या पहिल्याच बोलपटात त्यांना तारामतीची भूमिका मिळाली. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोनही भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटांतील गाणी त्यांनी स्वत: गायली होती आणि ती अतिशय लोकप्रिय झाली. त्यानंतर मायामच्छिंद्र या चित्रपटात त्यांनी एका योद्धा स्त्रीची भूमिका केली होती. हे दोनही चित्रपट खूप गाजले. या चित्रपटांमुळे दुर्गाबाईंना प्रसिद्धी मिळाली. गीता, विदुर, जशास तसे, मोरूची मावशी, सीता स्वयंवर, मायाबाजार यासारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. दोनशेहून अधिक चित्रपटांत त्यांनी नायिकेच्या आणि चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका केल्या. मुगल ए आझम, नरसीभगत, बावर्ची, खिलौना, बॉबी या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या चरित्र भूमिका खूप गाजल्या. जर्मन दिग्दर्शक पॉल झील (Paul Zils) यांच्याअवर इंडिया (1950) आणि इस्माईल मर्चंट यांच्या हाऊसहोल्डर या दोन इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. तर, बेचाळीसचे आंदोलन, कीचकवध, भाऊबंदकी, शोभेचा पंखा, वैजयंती, खडाष्टक, पतंगाची दोरी, कौंतेय, संशयकल्लोळ इत्यादी मराठी नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. वैजयंती, कौंतेय, पतंगाची दोरी, द्रौपदी या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. ख्यातकीर्त रंगकर्मी विजया मेहता या त्यांच्या स्नुषा होत. दुर्गाबाईंची चित्रपटात आणि नाट्यसृष्टीतील कामगिरी लक्षात घेऊन संगीत नाटक अकादमीने 1958 साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला. 1961 मध्ये दिल्लीत भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 1968 साली त्यांना पद्मश्रीचा बहुमानही लाभला आहे. 1972मध्ये मराठी नाट्यपरिषदेतर्फे विष्णुदास भावे सन्मानपदक त्यांना देण्यात आले होते. 1983 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. दुर्गाबाईंनी 1980मध्ये दुर्गा खोटे प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे त्यांनी लघुचित्रपट, जाहिरातपट, मालिका आणि चित्रपटांचीही निर्मिती केली. या संस्थेद्वारे निर्मिती केलेली वागळे की दुनिया ही मालिका खूप गाजली. दुर्गाबाईंनी त्यांचे जीवन आणि त्यांचा रूपेरी पडद्यावरचा प्रवास मी दुर्गा खोटे या आत्मचरित्रात शब्दबद्ध केलेला आहे. 22 सप्टेंबर 1991 रोजी वयाच्या 86व्या वर्षी त्यांचे अलिबाग येथे निधन झाले.


