Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    प्रसादची हीच ती सखी!

    May 10, 2026

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 15 सप्टेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 15 सप्टेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 15, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 15 सप्टेंबर 2025; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 24 भाद्रपद शके 1947; तिथि : नवमी 25:31; नक्षत्र : मृगशीर्ष 07:31
    • योग : व्यतिपात 26:33; करण : तैतिल 14:15
    • सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:41
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    नवमी श्राद्ध

    अविधवा नवमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – अनेक दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. वरिष्ठ कामावर खूप खूश असतील, परंतु घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. धर्मादाय कार्यात सामील होऊन तुम्ही चांगले नाव कमवाल. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला खोटे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.

    वृषभ – आज मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत असेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही जे काही काम कराल त्यात नक्कीच यश मिळेल. पैशांशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती कोणालाही देण्याची गरज नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना थोडा शहाणपणा दाखवावा लागेल. एखादा नातेवाईक भेटायला येऊ शकतो.

    मिथुन – आजचा दिवस यशाचा असेल. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल. कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. आज नवीन वाहन खरेदीचा विचार करू शकता. वाढत्या खर्चाबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटेल.

    कर्क – आजचा दिवस गुंतागुंतीचा असेल. कोणताही निर्णय अतिशय हुशारीने घ्या. कौटुंबिक बाबी एकत्र बसून सोडवा. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आवश्यक कर्जासाठी अर्ज करू शकता. सरकारी प्रकरणात निर्णय येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. त्यामुळे थोडे निराश होऊ शकता.

    सिंह –  आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला राहील. हाती घेतलेल्या कामात चांगले यश मिळेल. तुम्ही दुसऱ्या कोणावर अवलंबून राहणार नाही. एखादे प्रलंबित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात भागीदाराशी आगामी योजनांबद्दल बोलू शकता. एखादी चांगली योजना समजली तर त्यात हुशारीने गुंतवणूक करा.

    हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी वेळ काढावाच लागेल!

    कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याचा असेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर, ती संधी सोडू नका. वाहन चालवताना काळजी घ्या. सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर ते काही काळासाठी पुढे ढकला. कामाच्या बाबतीत पालक काही सल्ला देत असतील तर त्यावर अवश्य अंमलबजावणी करा.

    तुळ – काम करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल. विरोधक सतर्क आहेत, जे त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. अनेक दिवसांपासून असणाऱ्या इच्छा पूर्ण होण्याची  शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याची संधी सोडू नका. दुसऱ्याच्या खासगी आयुष्याबाबत अनावश्यक बोलणे टाळावे लागेल. सामाजिक कार्यासाठी एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक – आजचा दिवस अनुकूल असेल. कौटुंबिक खर्चाकडे जरा लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या कुरबुरी असतील, त्यामुळे त्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल. एखादी गोष्ट जोडीदाराला पटवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. वाहन सावधगिरीने चालवा. व्यवसायात वाढ होईल, ज्यामुळे कामाची गुणवत्ता सुधारेल.

    धनु – आजचा दिवस तुमच्या प्रभाव आणि वैभवात वाढ आणणारा आहे. सरकारी काम उरकण्याची योजना आखू शकता. घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन झाल्यामुळे वातावरण आनंददायी असेल. कामाबद्दल थोडी काळजी घ्या.

    मकर – आजचा दिवस आनंदाचा असेल. आजूबाजूला होणाऱ्या वादविवादांपासून दूर रहाणे उत्तम. नोकरीच्या शोधात असलेल्या जातांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, अविवाहित जातकांसाठी घरात लग्नाचा विषय निघू शकतो. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यापासून मुक्तता मिळेल.

    कुंभ – आजचा दिवस फायदेशीर असेल. एखादे नवीन काम सुरू करता येईल. नातेवाईकांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. महिलांना मैत्रिणींकडून व्यवसायात चांगला नफा होईल. जुन्या चुकांपासून धडा घ्या आणि यशस्वी वाटचाल करा. यशस्वी नवीन वाहन खरेदीचा विचार करू शकता.

    हेही वाचा – कंडक्टरचं गणित खरं ठरलं, पण…

    मीन – शंकांचे काहूर असल्याने अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. कोणत्याही व्यवहाराला अंतिम रूप मिळायला आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकारी ताण वाढवू शकतात. दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज केला असेल तर आज तिथून मुलाखतीसाठी फोन येण्याची शक्यता आहे.


    दिनविशेष

    प्रसिद्ध स्थापत्य अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

    टीम अवांतर

    प्रसिद्ध स्थापत्य अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे झाला. 1880मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. 1883मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 1884मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता आला. पुढे 1909 साली हैदराबाद संस्थानात हैदराबाद शहराची पुनर्रचना तसेच, मूसा आणि इसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुरापासून शहराचे संरक्षण ही कामे त्यांनी केली. नंतर 1912 ते 1918 ही सहा वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण, उद्योग, कृषी आदी सर्व क्षेत्रांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी (सध्याची दि हिंदुस्थान एरॉनॉटिक्‌स) आणि ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेतही त्यांनी भाग घेतला. म्हैसूरपासून 18 किमी. वरील कृष्णराजसागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्याच कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. 12.5 कोटी रुपयांची कावेरी बंधारा योजना यांखेरीज कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड तसेच विजापूर शहर पाणीपुरवठा योजनाही त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांनी अभिकल्पित केल्या. नवी दिल्लीची योजनाबद्ध सुधारणा त्यांनीच केली. ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहाबाद आणि म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन गौरवले. 1955 साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्‍न’ दिला. त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. 14 एप्रिल 1962 रोजी बंगलोर येथे या शतायुषी अभियंत्याचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    By Team AvaantarMay 9, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 19…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    प्रसादची हीच ती सखी!

    May 10, 2026

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 292
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 613
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    प्रसादची हीच ती सखी!

    May 10, 2026

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026
    Most Popular

    प्रसादची हीच ती सखी!

    May 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.