Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 14 सप्टेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 14 सप्टेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 14 सप्टेंबर 2025; वार : रविवार
  • भारतीय सौर : 23 भाद्रपद शके 1947; तिथि : अष्टमी 27:05; नक्षत्र : रोहिणी 08:40
  • योग : वज्र 07:34, सिद्धी 28:54; करण : बालव 16:02
  • सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ 20:03; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:42
  • पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

अष्टमी श्राद्ध

वेद कन्सल्टन्सी / 9987433660

हेही वाचा – सिंधू मॅडम अन् कलेक्टर शिल्पा…


दिनविशेष

अभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर

टीम अवांतर

मराठी नाट्य तसेच हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जन्म 14 सप्टेंबर 1932 रोजी चिपळूण येथे झाला. व्यवसायाने दंतशल्यचिकित्सक असणारे डॉ. घाणेकर सन 1960 ते 1980 या काळातले मराठीतले पहिले सुपरस्टार होते. ‘दादी माँ’ या 1966 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती. त्यानंतर वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे त्यांना अफाट लोकप्रियता लाभली. ही लोकप्रियता इतकी वाढली की डॉ. घाणेकर यांच्याशिवाय संभाजी ही कल्पनाही त्यावेळी रसिक करू शकत नव्हते. घाणेकर यांची शरीरयष्टी तशी किरकोळच होती मात्र प्रभावशाली संवादफेक, जरब बसवणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली यांच्या जोरावर त्यांनी संभाजीची भूमिका साकारली होती. या नाटकाव्यतिरिक्त ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गारंबीचा बापू’, ‘आनंदी गोपाळ’, ‘शितू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘मधुमंजिरी’ या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिकाही जबरदस्त गाजल्या. नाटकातील कलाकारांची नावे घोषित करताना सगळ्यात शेवटी “…आणि काशिनाथ घाणेकर” असे म्हणण्याचा पायंडा त्यांच्यामुळेच पडला. यात त्यांचे वेगळेपण अधोरेखित होत असे. मराठा तितुका मेळवावा, एकटी, झेप, देवमाणूस, पाठलाग, मधुचंद्र, हा खेळ सावल्यांचा, गारंबीचा बापू यासारखे मराठी तर दादी मॉं, अभिलाषा यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. पाठलाग आणि देवमाणूस या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. अशा या महान अभिनय सम्राटाचे 2 मार्च 1986 रोजी निधन झाले

हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी वेळ काढावाच लागेल!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!