Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeआरोग्यSkin care : Sunscreen वापरणे अनिवार्य

Skin care : Sunscreen वापरणे अनिवार्य

लीना जोशी परुळेकर

मागच्या लेखात आपण काही ingredients तसेच काही trends बद्दल माहिती घेतली. आता या लेखात आपण Sunscreen बद्दल माहिती आणि काही tips बघू.

आपण आपल्या रोजच्या skin care routine मध्ये Sunscreen चा उल्लेख केला आहे. सूर्याचे UVB आणि UVA rays हे त्वचेसाठी हानीकारक आहेत. UVA Rays हे UVB Rays च्या तुलनेत जास्त हानीकारक असतात, ते त्वचेत खोलवर जाऊन नुकसान करतात. ज्यामुळे त्वचेला Pre-mature aging, Pigmentation, Sun burn इत्यादी समस्यांना तोंड द्यायला लागू शकते. म्हणूनच Sunscreen चा वापर हा अनिवार्य आहे. Sunscreen उत्पादनांवर SPF असे लिहिलेले असते, त्याचा अर्थ आहे. ‘Sun Protection Factor’. सामान्यतः SPF ची ताकद ही नंबरमध्ये दर्शवलेली असते. उदा. SPF 15, SPF 30, SPF 50 SPF 100

  • SPF 15 blocks 93% of UVB Rays
  • SPF 30 blocks 97% of UVB Rays
  • SPF 50 blocks 98% of UVB Rays
  • SPF 100 blocks 99% of UVB Rays

आपल्या भारतीय त्वचेवर SPF 15, SPF 30, SPF 50 recommended आहे.

Sunscreen  उत्पादनांवर PA असे लिहिलेले असते, ज्याचा अर्थ आहे ‘Protection Guide of UVA’. PA ची ताकद ही ‘Plus (+)’ sign ने दर्शवलेली असते. जास्त Plus sign म्हणजे जास्त Strength…

उदा.

  • PA + सामान्य संरक्षण
  • PA++ मध्यम संरक्षण
  • PA+++ जास्त संरक्षण
  • PA++++ अति जास्त संरक्षण

तेलकट त्वचेसाठी lightweight, Oil – free Sunscreen उपलब्ध असतात. कोरड्या त्वचेसाठी Hydrating Sunscreen उपलब्ध असतात. मिश्र त्वचेसाठी Gel base Sunscreen, जी कमी तेलकट, पण त्याचवेळी त्वचेला Hydrate करणारी असतात. संवेदनशील त्वचेसाठी जास्त SPF आणि जास्त PA strength असलेली Sunscreen वापरणे योग्य.

हेही वाचा – Skin care : Trending ingredients चा वापर

हल्ली आपल्या daily skin care routine मध्ये आपण Serum चा समावेश करतो. ही Serum सर्व त्वचा प्रकारांसाठी उपलब्ध असतात. Serum ही हलकी असतात आणि त्यामुळे easily त्वचेमध्ये मुरतात. आता जेव्हा आपण CTMS आणि CTN Plan follow करतो, तेव्हा Serum चा समावेश हा moisturizing या category मध्ये होतो. म्हणजेच दिवसा cleanser, toner, Serum, moisturizer, sunscreen हे routine. आणि रात्री cleanser, toner, Serum, nourishing cream हे routine.

आजकाल बाजारात आंघोळीसाठी विविध प्रकारचे साबण आणि Shower Gel उपलब्ध आहेत. कुठलाही साबण अथवा shower Gel वापरल्यावर आपल्या त्वचेवर त्याचा काय परिणाम होतो, हे बघूनच तो continue करावा. साबण किंवा shower Gel वापरल्यावर त्वचा अतिकोरडी होत असेल तर, त्याचा वापर थांबवावा. चेहऱ्याच्या त्वचेवर साबण अथवा Shower Gel  वापरला नाही तरी चालेल; कारण चेहऱ्यावर आपण cleanser वापरणार आहोत. आंघोळीच्या आधी cleansing करून, आंघोळीनंतर लगेच ओलसर चेहऱ्यावर toning करावे. जे साबणाचे तेच Face Wash साठी! Face wash वापरल्यावर चेहरा कोरडा पडत असेल तर ते वापरू नये. Cleanser हा त्यासाठीचा योग्य पर्याय आहे.

हेही वाचा – Skin Care : त्वचेचा ओलसरपणा टिकवणारे ‘पंचामृत’

आंघोळीनंतर चेहरा तसेच अंग पुसताना टॉवेलने जोरात घासू नये. हलक्या हाताने dab करत पुसावे.

कुठलीही उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्याची expiry Date नक्कीच बघितली गेली पाहिजे. Expired झालेली उत्पादने अजिबात वापरू नयेत.

पुढच्या भागात आपण make up संदर्भातली माहिती पाहू.

(क्रमश:)


lee.parulekar@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!