नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेय!
नुकताच गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने सर्वांनी साजरा केला. मी देखील बाप्पाच्या दर्शनासाठी माहेरी जायला निघाले होते… विरार स्टेशनपाशी आले… एका दुकानात कडक बुंदीचा मोठा लाडू दिसला. चेहऱ्यावर हसू आलं… मी तो लाडू बाप्पासाठी विकत घेतला अन् फ्लॅशबॅकमध्येच गेले…
एका मराठी नाटकाच्या तालमी सुरू होत्या. खूप मोठे नामवंत दिग्दर्शक होते. सरांच्या परवानगीने त्याचं नाव मी इथे सांगतेय… तर ते माझे लाडके सर सतीश पुळेकर! ही गंमत त्यांच्या लहानपणीची आहे…
शेजारच्या दुकानात मोठा बुंदीचा विकायला ठेवला होता. लाडू तोही फुटबॉल एवढा मोठा! लहान मुलांना अशा गोष्टी पाहून त्याचं अप्रूप वाटतेच नाही का? तर, माझ्या सरांनी अन् त्यांच्या मित्रांनी प्लॅन करून तो मोठा लाडू पळवला. गदारोळ तर झालाच… तसं होणं सहाजिकच होतं, पण गंमत तर पुढे आहे… त्या मित्रांनी मिळून तो लाडू फोडला आणि आणि आणि… फुसका बार… तो खरा लाडू नव्हताच मुळी!
हेही वाचा – माझ्या सेकंड इनिंगचा कौतुक सोहळा!
प्लास्टिकच्या मोठ्या बॉलवर बुंदीच्या अगोड कळ्या चिकटवल्या होत्या!… फक्त जाहिरातीसाठी… सगळाच पचका.
पण दुकानातून मोठा लाडू गायब केल्याने बोंबाबोंब तर झालीच… घरी सुद्धा फटके मिळाले.
असा तो हूड मुलगा मोठेपणी मात्र एकदम हुशार हँडसम बुद्धिवादी अँक्टर आणि डायरेक्टर बनला.
आता ही गंमत ऐकून गप्प बसेन ती मी कसली? नाटकात अजून एक मुलगी होती. आम्ही दोघींनी सतीश पुळेकर सरांना सरप्राइज द्यायचं ठरवलं. एक मोठा कडक बुंदीचा लाडू रिहर्सलला घेऊन गेलो. सरांच्या हातात हातोडी दिली आणि हळूच लाडवाचं पार्सल समोर ठेवलं. ते उघडल्यावर सरांचे डोळे अगदी लहान मुलासारखे चमकले…!
हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…
सरांनी बुंदीचे लाडू कित्येक वेळा खाल्ले असतील, पण आम्ही दोघींनी दिलेल सरप्राइज मात्र त्यांना त्यांच्या लहानपणीच्या दिवसात नक्कीच घेऊन गेलं असणार!
तर मित्र-मैत्रिणींनो… तुम्हालाही कधी कोणाला आनंद देता आला तर, जरूर द्यायचा प्रयत्न करा!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.
अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, सतीश पुळेकर, लाडू, गणेशोत्सव, नाटक, बुंदी लाडू, Satish Pulekar, Laddu, Ganeshotsav, Drama, Bundi Laddu