दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 10 सप्टेंबर 2025; वार : बुधवार
- भारतीय सौर : 19 भाद्रपद शके 1947; तिथि : तृतीया 15:38; नक्षत्र : रेवती 16:03
- योग : वृद्धी 20:31; करण : बव 26:11
- सूर्य : सिंह; चंद्र : मीन 16:03; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:45
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:34)
तृतीया श्राद्ध
चतुर्थी श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ यांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र,कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. ज्येष्ठांचा सल्ला धन लाभ करवून देऊ शकतो. कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे प्रिय व्यक्तींशी संबंध दुरावू शकतात.
वृषभ – जुना मित्र आज आर्थिक मदत मागू शकतो, मात्र ती देण्यापूर्वी पूर्ण विचार करून निर्णय घ्या. कार्यालयात सहकारी मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. त्यामुळे स्वत:च्याच मेहनतीवर काम पूर्ण करावे लागेल.
मिथुन – वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. आपल्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि कामात उत्साह तसेच शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर, फायद्यात राहाल. घरगुती वस्तूंची बेफिकीरपणे हाताळणी करणे अडचणीत टाकू शकते. प्रियजनाबरोबरचे गैरसमज दूर होतील.
कर्क – कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण असेल. पण तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही मिळू शकते. समाधानकारक परिणाम साधण्यासाठी सर्व कामाचे नीट नियोजन करा. कौटुंबिक आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील.
सिंह – पैशांची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते. अशा स्थितीमध्ये घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. अफवा आणि पोकळ गप्पांपासून दूर राहा. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.
हेही वाचा – सिंधू मॅडम अन् कलेक्टर शिल्पा…
कन्या – मनामध्ये सकारात्मक विचार सुरू ठेवा. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. आजच्या दिवशी उपस्थित राहिलेल्या व्याख्यान आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील.
तुळ – आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. कोणाला तरी उधार दिलेली रक्कम आज परत मिळू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा प्रिय व्यक्तींचे मन दुखावू शकते. आयुष्यातील समस्यांबाबत घरातील ज्येष्ठ व्यक्तीसोबत संवाद साधू शकता.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी आज एखादी चांगली बातमी मिळेल. अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे घरातील ज्येष्ठांकडून बचतीबाबत योग्य सल्ला घेऊ शकता. आज स्वत:साठी काही वेळ द्या.
धनु – आर्थिक स्थितीत नक्कीच बदल होणार आहे. मेहनतीच्या आधारे नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. रिकाम्या वेळेत ध्यानधारणा करण्याला प्राधान्य द्या.
मकर – आर्थिक दृष्ट्या दिवस संमिश्र राहील. धन लाभ होऊ शकतो परंतु, त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम / समारंभ पार पाडण्यासाठी शुभ दिवस आहे. आज तुम्ही जीवनसाथीला फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल.
कुंभ – जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. जवळच्या व्यक्तींबरोबरचा वादविवाद टाळा. वादग्रस्त मुद्दे असतील तर चर्चेद्वारे त्यातून मार्ग काढा. कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.
हेही वाचा – बाप्पा… जगण्यासाठी पुरेसा!
मीन – आपल्या वजनावर लक्ष ठेवा, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी सारे लक्ष प्रयत्नांवर केंद्रित करा. दिवस अनुकूल असल्याने अनेक घटक तुमच्या बाजूने असतील.
दिनविशेष
महान क्रिकेटपटू रणजीत सिंहजी
थोर भारतीय क्रिकेटपटू कुमार रणजीत सिंहजी यांचा जन्म 10 सप्टेंबर 1872 रोजी जामनगरजवळच्या सरोदर या खेडेगावात झाला. नवानगरच्या जामसाहेबांचे ते वारस होत. क्रिकेटबरोबरच रणजीत सिंहजी यांना टेनिस आणि बिल्यर्ड्स या खेळांतही प्रवीण होते, पण त्यांचा कल क्रिकेटकडेच जास्त होता. 1888 साली ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. सेंटफेथ शाळेत शिकत असताना त्या शाळेचे मुख्याध्यापक गुडचाईल्ड यांच्या नजरेत रणजींचा खेळ भरला. त्यांनी रणजींना सर्वतोपरीने उत्तेजन दिले. 1894 साली त्यांचा समावेश ‘मेरिलीबोन क्रिकेट क्लब’च्या (एमसीसी) संघात झाला. 1895पासून रणजींचे क्रिकेटमधील कौशल्य दिसले. त्याच साली ससेक्स परगणा संघात त्यांचा सन्मानपूर्वक अंतर्भाव झाला. भारतीय खेळाडू परगणा संघातून क्रिकेट (कौंटी क्रिकेट) खेळण्याच्या योग्यतेचे नसतात, हा इंग्रजांचा समज रणजींनी आपल्या खेळाने चुकीचा ठरवला. पहिल्याच सामन्यात एमसीसी विरुद्ध शतक झळकवून त्यांनी लॉर्ड्सचे मैदान गाजवले. 1896 साली पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडतर्फे त्यांची निवड झाली असती, पण एमसीसीचे त्यावेळचे अध्यक्ष लॉर्ड हॅरिस हे वर्णद्वेष्टे होते. ब्रिटिश नागरिक नसल्याने रणजींना इंग्लंडतर्फे खेळता येणार नाही, असा त्यांनी निर्णय दिला. पण मँचेस्टरच्या दुसऱ्याच कसोटीमध्ये रणजींची निवड झाली. त्यात रणजींनी पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात नाबाद 154 धावा काढून आपल्या पहिल्याच कसोटी पदार्पणात शतक फडकावण्याचा बहुमान मिळवला. त्यांच्या नावावर एकूण 500 सामने 24,692 धावा 285 सर्वोच्च (नाबाद) 72 शतके (त्यात 14 द्विशतके) आणि 56.37 सरासरी आहे. एकाच महिन्यात एक हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन वेळा केलेला आहे. रणजी हे ग्लान्स फटक्याबद्दल प्रख्यात होते. त्या फटक्याचे जनकत्वही त्यांच्याकडेच जाते. तसेच, त्यांचा हुकचा फटकाही अप्रतिम होता. भारतात जन्मलेले आणि इंग्लंडतर्फे खेळणारे तेच पहिले भारतीय खेळाडू होत. भारताला कसोटी सामन्याचा अधिकृत दर्जा मिळण्यापूर्वीच रणजी कसोटीत खेळलेले आहेत, हे त्यांच्या कारकीर्दीचे एक वैशिष्ट्यच. 2 एप्रिल 1933 रोजी जामनगर येथे त्यांचे निधन झाले. भारतात रणजी पहिल्या दर्जाचे क्रिकेट खेळले नाहीत. तथापि, त्यांची स्मृती जागृत रहावी, म्हणून भारतातील राष्ट्रीय विजेतेपदाच्या क्रिकेट स्पर्धेला रणजींचे नाव देण्यात आलेले आहे. रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 1934 पासून ते आजतागायत सातत्याने सुरू आहे.