नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…
मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांच्याच आग्रहामुळे मी पुन्हा कामाची सुरुवात केली. दुसऱ्या इनिंगची सुरुवात ‘स्टार प्रवाह’च्या नवीन सीरियलने झाली. सीरियलचे नाव ‘वचन दिले तू मला’… सुलभा देशपांडे, ज्योत्स्ना कार्येकर, आसावरी जोशी, राजेंद्र चावला, पुष्कर जोग, मयुरी वाघ, भारती पाटील, सुश्रुत मंकणी आणि अन्य बरेच कलाकार होते. माझं कॅरेक्टर म्हणजे एकदम ठसका! खूप श्रीमंत, पैशाचा माज असलेली अशिक्षित बिनडोक पण प्रेमळ आई…
कथानक पण छान होतं… मला फुटेज पण चांगलं होत… म्हणजे, लोक रस्त्यात ओळखायला लागली होती. हे पाहून छान वाटायचं. तशात मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आला. मी बाजारात जाऊन पूजा तसेच हळदी कुंकवाची सगळी खरेदी केली. हातात दोन पिशव्या भरून फळं, थोडी फुलं घेऊन घरी जायला निघाले होते. माझ्याच तंद्रीत होते…
तेवढ्यात जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. कोण असेल? का भांडत असेल? रस्त्यात गर्दी जमा झाली होती. मी शांतपणे गर्दीतून रस्ता काढत निघाले. तेवढ्यात मागून जोरात आवाज आला… “ओ थांबा.”
ती हाक मी ऐकली, पण माझ्यासाठी असेल असे वाटलं नाही…
आता जास्त जोरात हाक आली, “ओये, हीरोईन थांबा जरा…”
हेही वाचा – दोन वेण्या अन् रीमा दिदी…
आता ही हाक माझ्यासाठीच होती… मी थांबले… वळून बघितलं… आणि थोडी गडबडले! ती भांडणारी बाईच मला आवाज देत होती!! काय आणि कसं react व्हावं कळलंच नाही. सगळी गर्दी माझ्याकडे बघत होती. मी वळले तशी ती बाई ओरडली… “ओ हीरोईन… छान काम करता.”
मी ‘thanks’ म्हणून लाजत हसले आणि निघाले… पुन्हा ती भांडणाच्या सुरातच म्हणाली, …आणि हो छान दिसता. सुंदर…” मी वळले, मनापासून हसले आणि निघाले…
हेही वाचा – तो आला, तो बोलला… पण…
पुन्हा जोरात आवाज यायला लागला… भांडण पुन्हा सुरू झालं होतं… माझ्याशी बोलताना त्यांचा break झाला होता जणू! फ्रेश होऊन त्या पुन्हा जोरजोरात भांडायला लागल्या…
माझ्या सेकंड इनिंगच्या कामाचा कौतुक सोहळा अशा प्रकारे पार पाडला!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.