दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 30 ऑगस्ट 2025; वार : शनिवार
भारतीय सौर : 08 भाद्रपद शके 1947; तिथि : सप्तमी 22:45; नक्षत्र : विशाखा 14:36
योग : ऐंद्र 15:08; करण : गरज 09:34
सूर्य : सिंह; चंद्र : तुळ 07:52; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:55
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
- मेष – आजचा दिवस अनुकूल असेल. पैशांशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. ज्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मात्र कोणत्याही प्रकारची मोठी जोखीम घेण्याचे टाळा. समाजात आदर मिळेल. मित्रांकडून किंवा सासरच्या लोकांकडून मोठे फायदे मिळू शकतात. दानधर्म आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
- वृषभ – आजचा दिवस खूप धावपळीचा असेल. आज चांगल्या वागण्याने आणि बोलण्याने अनेक लोकांना प्रभावित करू शकाल. नवीन नोकरीच्या काही चांगल्या संधी मिळू शकतात, ज्यामध्ये चांगला पगार, पद आणि प्रतिष्ठा यांचा समावेश असेल. कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात आदर मिळेल. जोडीदारासोबत बाप्पाच्या दर्शनाला जाल.
- मिथुन – आज थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. काही शत्रू कामाच्या ठिकाणी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्या सर्वांना तुम्ही पराभूत करू शकाल. यासोबतच कायदेशीर बाबींमध्येही सावधगिरी बाळगा. मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला नफा मिळू शकतो.
- कर्क – कर्क राशीच्या जातकांना आज मोठी ध्येये साध्य करता येतील. एखादी चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. काही योजना यशस्वी होतील, ज्याचा मोठा फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करावा लागू शकेल. जोडीदारासोबत एखाद्या मुद्द्यावर मतभेद होतील.
- सिंह – आज एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये यश मिळेल. दिवस आनंदाच्या बातम्यांनी भरलेला असेल. नोकरदार जातकांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. मात्र, कोणत्याही कामात घाई करणे टाळा. ज्या योजनांवर काम करत आहात त्या प्रभावी ठरतील आणि त्यासंदर्भातील एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.
- कन्या – आजचा दिवस समस्यांनी भरलेला असू शकतो. खर्चात मोठी वाढ होऊ शकते. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक गणिते कोलमडतील. कामात कोणीतरी फसवू शकते. जे काम करण्याची तुमची इच्छा नाही तेच काम जबरदस्तीने करावे लागेल. ध्येय साध्य करण्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत थोडे सावधगिरी बाळगावी लागेल.
हेही वाचा – कलियुगातील सावित्री
- तुळ – दिवस संमिश्र असेल. आरोग्याच्या कुरबुरी असतील, त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्या. कोणत्याही कामात जोखीम घेणे टाळा. न्यायालयात खटला सुरू असेल तर, त्याच्याशी संबंधित इतर समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते. दुसरीकडे, आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे मन आनंदी राहील.
- वृश्चिक – अनेक चांगल्या बातम्या मिळतील. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी दाखवता येईल, ज्यामुळे आत्मविश्वास आणि आदर वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही चांगल्या संधी मिळू शकतील. सर्व सहकारी आणि अधिकारी कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे खूप आनंद होईल. कौटुंबिक स्तरावर आजचा दिवस चांगला असेल. आरोग्याची मात्र काळजी घ्या.
- धनु – जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. कामाच्या बाबतीत मनात अनेक प्रकारच्या चिंता असतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगले यश मिळू शकते. कोणालाही उधार पैसे देणे टाळावे, अन्यथा ते परत मिळण्याची शक्यता कमी असेल. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना चांगले यश मिळेल.
- मकर – अनेक बाबतीत आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. मोठी जबाबदारी मिळू शकते आणि त्यात मोठे यश देखील मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांनाही मोठी आणि चांगली संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासूनची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. कायदेशीर बाबींमधील अडथळे देखील दूर होतील.
- कुंभ – महत्त्वाचे काम करताना जास्त काळजी घ्यावी लागेल. घाईघाईने काम करणे टाळा, अन्यथा केलेले काम बिघडू शकते. एकंदरीत दिवस अनुकूल आणि सकारात्मक परिणाम देणारा असेल. कोणाशीही मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सोडवता येईल. अचानक प्रवास होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतील.
- मीन – दिवस संमिश्र आणि अनुकूल असेल. एखाद्याच्या कामात मदत केल्याने खूप आनंद मिळेल. जोडीदाराशी उत्तम समन्वय राहील. सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. मात्र काही खास गोष्टींबाबत गुप्तता बाळगा. व्यवसायात मोठे यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. आज काम करण्यात सर्व क्षमता पणाला लावाल.
हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!
दिनविशेष
अभ्यासक, संशोधक डॉ. शं.गो.तुळपुळे
टीम अवांतर
मराठी भाषा आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1914 रोजी पुणे येथे झाला. मुंबई विद्यापीठातून 1938 मध्ये एम.ए. आणि 1940 मध्ये ‘यादवकालीन मराठी भाषेचा भाषाशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास’ या विषयात संशोधन करून पीएच. डी. पदवी प्राप्त केली. 1969 पर्यंत ते पुणे विद्यापीठाच्या मराठी भाषा-साहित्य विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल, गुरुदेव रा. द. रानडे चरित्र आणि तत्वज्ञान, रमण महर्षी, संतवाणीतील पंथराज, श्रीकृष्ण-चरित्र (चक्रधर), पाच संतकवी, महानुभाव गद्य, दृष्टान्त पाठ, प्राचीन मराठी गद्य, यादवकलीन मराठी भाषा, मराठी निबंधाची वाटचाल, स्मृतिस्थळ, मराठी भाषेचा तंजावरी कोश यासारख्या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. याशिवाय प्राचीन मराठी कोरीव लेख, मराठी वाङ्मयाचा इतिहास -खंड 1 आरंभापासून इ.स.1350 पर्यंत, लीळाचरित्र यासारख्या ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. यापैकी अनेक ग्रंथ विविध विद्यापीठांमध्ये मराठी साहित्य अभ्यासकांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून आजही उपयोगी पडतात. पुणे विद्यापीठाच्या सुरुवातीच्या काळात मराठी विभागाला आणि मराठीच्या अभ्यासाला एक प्रकारची शिस्त लावण्याचा मोठा प्रयत्न त्यांनी केला. अनेक नामवंत विद्यार्थीही त्यांनी घडवले. अशा या थोर संशोधकाचे 30 ऑगस्ट 1994 रोजी निधन झाले.