Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 29 ऑगस्ट 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 29 ऑगस्ट 2025

दर्शन कुलकर्णी

आज, दिनांक : 29 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार

भारतीय सौर : 07 भाद्रपद शके 1947; तिथि : षष्ठी 20:20; नक्षत्र : स्वाती 11:37

योग : ब्रह्मा 14:11; करण : कौलव 07:08

सूर्य : सिंह; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:56

पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन

संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

सूर्यषष्ठी

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – स्वभावामुळे अनेकांशी सहज जुळवून घ्याल, मात्र याचा इतरांकडून फायदा घेतला जाईल. कामात निष्काळपणा टाळा. वागण्यात नम्र राहिल्यास काम सहज करुन घेता येईल. रागामुळे नुकसान होऊ शकते. कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होतील.

वृषभ – व्यवसायिकांना फायद्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. नवीन योजनांवर काम कराल. व्यवसायात नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठांचे ऐकावे लागेल, अन्यथा भविष्यात नुकसान होईल. रागावर नियंत्रण ठेवा. सरकारी काम करणाऱ्यांनी कामाकडे लक्ष द्यावे लागेल.

मिथुन – आज सकाळपासून थोडा नफा मिळेल. नफा टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कौटुंबिक व्यवसायातील काही समस्या वडिलांच्या किंवा ज्येष्ठांच्या मदतीने सुटतील. काही गोष्टींमुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी शत्रू नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.

कर्क – आज भावाच्या मदतीने रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. व्यवसायात अनेक छोट्या संधी मिळतील, त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. घरात वाद होतील. मात्र तुम्ही सामाजिक संवाद वाढवण्यात यशस्वी व्हाल.

सिंह – कामाच्या ठिकाणी विरोधकांकडे दुर्लक्ष करा. यश लवकरच मिळणार आहे. अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करणे टाळा, अन्यथा पैसे अडकू शकतात. सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांचे सामाजिक कार्य पाहून आनंद वाटेल.

कन्या – व्यवसायासाठी कोणताही नवीन प्रस्ताव फायनल केल्याने फायदा होईल. कोणत्याही परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यात सौम्यता ठेवायला हवी. प्रेम जीवनात गोडवा राहील. घरातील समस्या मोठ्यांच्या मदतीने दूर होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध

तुळ – संततीच्या समस्येवर उपाय न मिळाल्याने मानसिक अस्वस्थता जाणवेल. भूतकाळातील एखाद्या चुकीसाठी पश्चाताप करण्याची वेळ येईल. नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. सासरच्या मंडळीकडून मान मिळेल. मित्राच्या मदतीने पुढे जाल.

वृश्चिक – सरकारी योजनेचा पूरेपूर लाभ घ्याल. आईचे आरोग्य काळजी निर्माण करणारे असेल. व्यवसायाच्या योजनांवर पैसे खर्च कराल. मात्र, कर्जाचे व्यवहार टाळावे लागतील, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. निराशाजनक विचार करणे टाळा.

धनु – प्रियजनांच्या मदतीने अडकलेले पैसे मिळतील. नोकरी, व्यवसायात कामाकडे लक्ष केंद्रित करा. त्यातून लाभाची अपेक्षा आहे. व्यवसायात लाभाच्या अनेक संधी मिळतील. कोणाची तरी मदत मिळाल्याने आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल.

मकर – सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होणार नाही, याची काळजी घ्या. काम योग्य वेळी पूर्ण करा. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही पैसे खर्च करण्यात येईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहिल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ – जीवनशैलीत बदल होतील. वडिलांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक क्षेत्रात लाभ होतील. भावंडांच्या सहकार्याने मन प्रसन्न राहिल. प्रवास करावा लागू शकतो. महत्त्वाच्या वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळीकडून आर्थिक लाभ होतील.

मीन – व्यवसायात लाभाच्या अनेक संधी मिळतील. विद्यार्थ्यांना चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. संततीच्या समस्या सोडवण्यात दिवसभर व्यग्र रहाल. लांबचा प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.

हेही वाचा – भाऊ बहिणीत ‘तीन एकर’ची दरी


दिनविशेष

हॉकीपटू मेजर ध्यानचंद

टीम अवांतर

भारताला 1928, 1932 आणि 1936 या वर्षांमध्ये हॉकीतले सुवर्णपदक मिळवून देणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद (आताचे प्रयागराज) येथे झाला. ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमधून 1932मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्याआधी 1922मध्ये ध्यानचंद ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये शिपाई म्हणून भरती झाले. तिथेच ते खऱ्या अर्थाने हॉकी हा खेळ खेळायला लागले. न्यूझीलंडच्या दौर्‍यावर गेलेल्या भारताच्या हॉकी टीमने 18 सामने जिंकले, 2 अनिर्णित राहिले आणि फक्त 1 सामना गमावला. या विजयात ध्यानचंद यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे 1927मध्ये भारतात परतल्यावर त्यांना ’लान्स नायक’ म्हणून बढती दिली गेली. चेंडूवर उत्कृष्ट नियंत्रण आणि गोल करण्याच्या कौशल्यासाठी ते प्रसिद्ध होते. 17 मे 1928च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये पहिल्यांदाच भारतीय राष्ट्रीय हॉकी टीम ऑस्ट्रियाविरुद्ध 6-0ने जिंकून यशस्वी झाली. 26 मे रोजी नेदरलँड आणि भारत यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने नेदरलँडला 3-0 ने पराभूत केले आणि सोबतच भारतीय टीमने आपल्या देशाचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. ध्यानचंद याही स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारे खेळाडू होते. हा सिलसिला नंतर सुरूच राहिला. 1936मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या टीमने अंतिम सामन्यात जर्मनीला धूळ चारली आणि पुन्हा एकदा सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले. या विजयानंतर हिटलरने त्यांना नोकरीची ऑफर दिली होती. मात्र, ध्यानचंद यांनी धुडकावून लावली. 34 वर्षांच्या सेवेनंतर ध्यानचंद 29 ऑगस्ट 1956 रोजी लेफ्टनंट म्हणून भारतीय लष्करातून निवृत्त झाले. मात्र खेळाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय क्रीडा संस्था, पटियाला येथील मुख्य हॉकी प्रशिक्षकपद स्वीकारले. 1956मध्ये भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ देऊन सरकाने त्यांना सन्मानित केले. 3 डिसेंबर 1979 रोजी ध्यानचंद यांचे निधन झाले. 2012 मध्ये ध्यानचंद यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. त्याच वर्षीपासून 29 ऑगस्ट हा दिवस आता भारतात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!