यशःश्री जोशी
खिरापतीसाठीचे साहित्य
- किसलेलं सुकं खोबरं – 1 वाटी
- पिठी साखर – अर्धी वाटी
- काजू आणि बदाम – 1 ते 2 टेबलस्पून
पुरवठा संख्या : 5 ते 7 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ :
- खोबरं किसायला – 10 मिनिटे
- पिठीसाखर करायला 2 मिनिटे
- वेलची पूड करायला – 1 मिनिट
शिजवण्याचा वेळ :
- खोबरं भाजून घ्यायला 5 ते 6 मिनिटे
- भाजलेले खोबरे गार करायला – 7 ते 8 मिनिटे
एकूण वेळ : 25 मिनिटे
कृती
- सुकं खोबरं जाडसर किसून घ्या.
- जाड बुडाच्या कढईत किसलेले खोबरे घालून मंद आचेवर पाच मिनिटे भाजून घ्या. खोबऱ्याचा रंग बदलणार नाही, याची काळजी घ्या. (कढईचे बूड किती जाड आहे आणि गॅसची आच यावर भाजण्याचा वेळ कमी जास्त होऊ शकतो.)
- खोबरं जरासं कुरकुरीत झालं की, गॅस बंद करा. खोबरं गार करण्यासाठी त्याच कढईत ठेवा.
- खोबरं गार होईपर्यंत मिक्सरवर पिठीसाखर करून घ्या.
- खोबरं गार झालं की, त्यात पिठीसाखर, काजू-बदामाचे तुकडे आणि वेलची पावडर घालून छानपैकी एकत्र करा.
- नैवेद्यासाठी खिरापत तयार आहे
विशेष आहार माहिती : शाकाहारी
हेही वाचा – Recipe : नारळाच्या रसातील अळूवडी
टीप
- पारंपरिक पद्धतीत खिरापत म्हणजे खोबरं आणि पिठीसाखर यांचे मिश्रण असते. काजू बदामाचे तुकडे आणि वेलची पावडर ऐच्छिक आहे. आवडत नसेल तर वगळले तरी चालेल.
- वेलची पावडर करताना अख्खी हिरवी वेलची मंद आचेवर भाजून दाणा टपोरा झाला की थंड करून सालासकट मिक्सरवर फिरवून घ्या. त्यात थोडीशी साखर घातली तर पावडर लवकर होते आणि पुरवठ्याला देखील खूप होते. सालासकट पावडर आहे हे कळतही नाही.
पंचखाद्य साहित्य
- खसखस – पाव वाटी
- सुकं किसलेले खोबरे – अर्धी वाटी
- खारीक पावडर – पाव वाटी
- बेदाणे (किसमिस) – पाव वाटी
- खडीसाखर – पाव वाटी
पुरवठा संख्या : 5 ते 7 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ : खोबरं किसायला – 10 मिनिटे
शिजवण्याचा वेळ :
- खोबरं भाजून घ्यायला 7 ते 8 मिनिटे
- खसखस भाजायला – 6 ते 7 मिनिटे
- भाजलेले खोबरे गार करायला – 7 ते 8 मिनिटे
- खसखस गार करायला – 5 ते 6 मिनिटे
एकूण वेळ : 25 ते 30 मिनिटे
कृती
- सुकं खोबरं जाडसर किसून घ्या.
- जाड बुडाच्या कढईत खसखस घालून मंद आचेवर रंग जरासा बदलेपर्यंत भाजून घ्या. याला साधारणपणे 5 ते 6 मिनिटे लागतील. (कढईचे बूड किती जाड आहे आणि गॅसची आच यावर भाजण्याचा वेळ कमी जास्त होऊ शकतो.) नंतर खसखस गार करायला ठेवा.
- आता याच कढईत किसलेले खोबरे भाजून घ्या. भाजताना आच मंदच ठेवा. खोबऱ्याचा रंग सोनेरी झाला की, गॅस बंद करून खोबरं गार करण्यासाठी ठेवा.
- गार झालेली खसखस मिक्सरमध्ये फिरवून घ्या. अगदी बारीक करून घ्या.
- त्यानंतर खोबरं गार झाल्यावर हाताने चुरडून घ्या. मग त्यात खसखस पावडर, खारीक पावडर, किसमिस आणि खडीसाखर घालून छान एकत्र करा. खमंग खिरापत तयार.
विशेष आहार माहिती : शाकाहारी
टिप
- हल्ली तयार खारीक पावडर बाजारात विकत मिळते. ती खिरापतीसाठी वापरावी. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना चावण्याचा त्रास असेल तर पावडर उपयुक्त ठरते. अन्यथा खारकेचे छोटे छोटे तुकडे करून ते कढईत जरासे गरम करून गार झाल्यावर खिरापतीसाठी वापरू शकता
- खडीसाखर मिक्सरला फिरवून त्याची पिठीसाखर करून देखील खिरापतीत वापरता येईल.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.