हर्षा गुप्ते
निनाव
साहित्य
- बेसन – 1 वाटी
- ओल्या नारळाचं दूध – अडीच वाटी
- गूळ पावडर – दीड वाटी
- वेलची पावडर
- साजूक तूप
पुरवठा संख्या – दोघांसाठी
कालावधी – साधारणपणे 20 मिनिटे
कृती
- नारळाच्या दूधामध्ये गूळाची पावडर घालून ठेवा. जेणेकरून गूळ लवकर विरघळेल.
- एक वाटी बेसन मंद आचेवर जाड बुडाच्या कढईत खमंग भाजून घ्या.
- मंद आचेवर भाजलेल्या बेसनमध्ये हळूहळू गूळ मिश्रित नारळाचे दूध घालून ढवळत रहा. म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि सतत ढवळल्याने करपणारही नाही.
- त्यात नंतर वेलची पावडर आणि साजूक तूप घालायचे.
- यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढायची.
- कढईत खाली हलकेसे करपल्यावर निनावं एकदम खरपूस लागते.
- वाटीत काढून हरतालिका गौरीला त्याचा नैवेद्य दाखवायचा.
टिप
- निनाववर ड्रायफ्रुट्सचे तुकडे टाकून सजवू शकता.
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी
रोझ मोदक
साहित्य
- मोदक पिठ – 1 मोठी वाटी
- ओलं खोबरं – 1 वाटी (सारणासाठी)
- गूळ किंवा साखर – अर्ध्या वाटीपेक्षा कमी (सारणासाठी)
- गुलकंद – 2 टेबलस्पून (सारणासाठी)
- रोझ इसेन्स – 1 चमचा
- खायचा लाल रंग – अर्धा चमचा
- तेल
- पाणी
- वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
कालावधी – तास ते सव्वातास
कृती
- पाऊण वाटी पाणी आणि चमचाभर तेल एकत्रित उकळवा.
- पाण्याला चांगली उकळी आली की, त्यात एक वाटी मोदक पिठ घालून ते चांगलं मिक्स करा, नंतर त्यावर झाकण ठेवा आणि गॅस बंद करा.
- पिठात वाफ जिरेपर्यंत ओलं खोबरं आणि गूळ/साखर घालून सारण बनवून मंद आचेवर ठेवा.
- गूळ/साखर विरघळून खोबऱ्यात चांगले मिक्स झाले की, नंतर गॅस बंद करा.
- सारण थंड झाल्यावर त्यात दोन टेबलस्पून गुलकंद घालून ते एकत्रित करा.
- आता वाफेतल्या पिठात एक चमचा रोझ इसेन्स आणि अर्धा चमचा खायचा लाल रंग घालून पिठ मळून घ्या.
- आता त्याचे सारखे भाग करून उंडे करा. एक उंडा घेऊन त्याची पारी बनवा. त्यात गुलकंद मिश्रित सारण भरा. त्यानंतर पारीच्या पाकळ्या करा आणि त्या एकत्र करून मोदकाचा आकार द्या.
- मोदकाची खालची बाजू पाण्यात बुडवून ते मोदक पात्रात ठेवा. मोदक पात्र गॅसवर मंद आचेवर ठेवा. 15 मिनिटांनी गॅस बंद करा.
टिप
- तयार मोदक ताटात घेऊन त्यावर एक-एक वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ठेवून सजवा आणि आपल्या बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवा.
- गरम मोदक उघडून त्यावर साजूक तुपाची धार सोडून त्याचा आस्वाद घ्या.
हेही वाचा – Recipe : खमंग आणि रुचकर मूंगलेट
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.