लीना जोशी परुळेकर
मागच्या लेखात आपण पारंपरिक घरगुती उपाय पाहिले. आता या लेखात आपण काही trending ingredients आणि trends बद्दल माहिती घेऊ.
सध्याच्या उत्पादनांमध्ये एक ingredient जे खूप trending आहे,- ते म्हणजे ‘Hyaluronic Acid’ (हायल्यूरॉनिक ॲसिड) मुळात हे Acid आपल्या शरीरात तयार होते. हे डोळे, joints आणि त्वचेत आढळते. हे Acid शरीरात इतर उपयोगांच्या जोडीला त्वचेला – hydration देण्याचे काम सुद्धा करते. या acid मुळे त्वचेची flexibility आणि elasticity वाढायला मदत होते, ज्यामुळे त्वचा मऊ मुलायम राहून त्यावरील fine lines आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते. हे acid artificially बनवून त्याचा विविध उत्पादनांमध्ये उपयोग केला जातो. Hyaluronic Acid चे वैशिष्ट्य म्हणजे हे कुठल्याही प्रकारच्या त्वचेवर वापरता येते. तेलकट त्वचेमध्ये excess oil तयार होत असते, ज्यामुळे त्वचा तेलकट दिसते. हे acid excess oil तयार होण्यावर नियंत्रण ठेवते. कोरड्या त्वचेत हे acid moisture धरून ठेवण्याचे काम करते. शिवाय, वातावरणातून moisture attract करण्याची या acid मध्ये क्षमता असते, ज्यामुळे त्वचा hydrate रहाते, परिणामी त्वचा टवटवीत आणि तुकतुकीत दिसते. तेलकट आणि कोरड्या त्वचेवर चालत असल्यामुळे naturally हे मिश्र त्वचेवर सुद्धा उत्तम काम करते. संवेदनशील त्वचेवर हे सामान्यत: काम करते. पण, Hyaluronic Acid असलेले उत्पादन संवदेनशील त्वचेवर वापरण्याआधी एकदा कानामागे उत्पादन किंचित लावून Patch test घ्यावी. 48 तास निरीक्षण करून, Allergy आली नाही तरच वापरावे. बाजारात Hyaluronic Acid असलेले serums, moisturizers, Sheet masks अशी उत्पादने मिळतात.
हेही वाचा – Skin Care : पारंपरिक घरगुती उपाय
दुसरे ingredient म्हणजे ‘Retinol (रेटिनॉल). Retinol हा ‘Vitamin A’चा एक प्रकार आहे. Retinol मुळे तेलकट त्वचेवर जर मुरमे असतील तर मुरुमांचे प्रमाण नियंत्रीत होण्यास मदत मिळते. मुरुमांशी संबंधित असणारा लालसरपणा, फुगीरपणा कमी होतो. Retinol मुळे त्वचेवरील मृत त्वचा exfoliate होऊन, त्वचेची रंध्रे मोकळी होतात. कोरड्या त्वचेवर Retinol हे fine lines आणि सुरकुत्या कमी करायला मदत करते. आपल्या त्वचेत Elastin आणि collagen या tissues चे जाळे असते. Elastin मुळे त्वचेला elasticity आणि Flexibility मिळते तर collagen मुळे strength आणि Structure. Retinol मुळे collagen बनण्याच्या प्रक्रियेला boost मिळतो. ज्यामुळे त्वचा Plump दिसायला मदत होते. कोरड्या त्वचेवर Retinol नेहमीच फायदेशीर होईल असे नाही. कारण, Retinol मुळे काही वेळा त्वचा जास्त कोरडी होते, काही वेळा irritation झाल्याने लालसर होऊ शकते.
Retinol असलेली उत्पादने वापरताना काळजी घ्यायला हवी. ही उत्पादने वापरायला लगेच सुरुवात करू नये. सुरुवातीला आठवड्यातून एकदा हे उत्पादन वापरून बघावे. त्वचा ज्या प्रकारे respond करेल, त्यावरून पुढचे application ठरवावे. Retinol असलेले उत्पादन वापरताना, शक्यतो त्यात Retinol किती Percent आहे, हे दिले आहे का? ते पहावे. Retinol चे प्रमाण कमी असेल तर रोज वापरायला हरकत नाही, अन्यथा आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा वापरावे. संवेदनशील त्वचेवर Patch test घेतल्याशिवाय ही उत्पादने वापरू नयेत.
सध्या प्रचंड trend मध्ये असलेली त्वचेवरील treatment म्हणजे Korean Glass Skin Routine. हे routine follow करण्याआधी काही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. आपल्या त्वचेमध्ये आणि Korea मध्ये राहणाऱ्या लोकांच्या त्वचेमध्ये मुळात असणारा फरक! त्यांच्या त्वचेपेक्षा आपल्या त्वचेमध्ये melanin चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपली त्वचा त्यांच्यापेक्षा जास्त गव्हाळ असते. त्यांच्या त्वचेचा पोत हा पातळ असतो तर आपला त्यापेक्षा जाड. त्यांच्याकडील आणि आपल्याकडे असणारी वातावरणातील तफावत, पाण्यात आणि खाण्यात असणारा फरक, Daily routine मधला फरक… यासारख्या गोष्टींच्या फरकामुळे आपल्याला, त्यांच्याप्रमाणे तंतोतंत परिणाम मिळणे कठीण जाते. पण त्या routine मध्ये दिलेल्या पायऱ्या वापरून, आपल्या त्वचा प्रकारानुसार उत्पादने वापरून, आपण काही प्रमाणात का होईना तशी त्वचा achieve करू शकतो.
हेही वाचा – Skin Care : त्वचेचा ओलसरपणा टिकवणारे ‘पंचामृत’
अजून एक treatment म्हणजे rice water चा उपयोग. ही सुद्धा Korean Glass Skin Routine मधली एक पायरी आहे. पण, तुम्ही ती एक वेगळी treatment म्हणून सुद्धा करू शकता. इथेही आपल्याला त्वचेनुसारच result मिळणार आहेत. Rice Water मुळे काही वेळा dryness, irritation, redness येऊ शकतो. म्हणूनच एकदा patch test घेतल्याशीवाय कुठलीही treatment करू नये.
पुढच्या भागात आपण अजून काही ingredients बद्दल माहिती घेऊ.
(क्रमश:)