दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 13 ऑगस्ट 2025; वार : बुधवार
भारतीय सौर : 22 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्थी 06:36, पंचमी 28:33; नक्षत्र : उत्तर भाद्रपदा 10:32
योग : धृती 16:05; करण : कौलव 17:30
सूर्य : कर्क; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:07
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी काही बदल दिसायला लागतील, त्यामुळे मन थोडे अस्वस्थ राहील. याशिवाय सहकाऱ्यांवरचा ताणही वाढेल. परंतु तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने परिस्थिती सामान्य करू शकाल. इतरांना मदत करण्यासाठी दिवसभर व्यग्र असाल. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
वृषभ – दिवस शुभ राहील. व्यवसायाबाबत काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरदार जातकांसाठी दिवस चांगला असेल आणि त्यांना कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचा फायदा मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
मिथुन – कामाच्या ठिकाणी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने एखादे महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळू शकेल. अपूर्ण इच्छा पूर्ण होतील, त्यामुळे मन आनंदी असेल. कुटुंबातून वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद देखील मिळतील. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची आणि अनावश्यक खर्च टाळण्याची आवश्यकता असेल.
कर्क – कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यामुळे आर्थिक स्थितीही सुधारेल. व्यवसायाच्या योजनांनाही गती मिळेल, समाजात आदरही वाढेल. मात्र घाईघाईने निर्णय घेण्याचे टाळावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते.
सिंह – राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना अनपेक्षित फायदे मिळण्याची शक्यता आहे आणि आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. कामाच्या ठिकाणी विरोधकांपेक्षा पुढे जाऊ शकता आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम आता पूर्ण होऊ शकते. संततीकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
कन्या – दिवस चांगला जाईल आणि कामाच्या ठिकाणी विरोधकांची रणनीतीही अपयशी ठरेल. व्यवसायात नफा मिळविण्याच्या नवीन संधी मिळू शकतात, मात्र त्या कोणत्या हे ओळखावे लागेल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीसाठी एखादी आवडती भेटवस्तू विकत घ्याल. ज्यामुळे मनाला समाधान मिळेल.
हेही वाचा – Dnyaneshwari : आग लागो या युद्धाला…
तुळ – नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी बोलण्याची पद्धत प्रभावी असल्याने विशेष आदर मिळेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल.
वृश्चिक – आर्थिकबाबतीत दिवस शुभ राहील. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल आणि समाजात आदरही वाढेल. प्रतिकूल परिस्थिती उद्भवलीच तर संयमाने निर्णय घ्यावे लागतील. संध्याकाळी प्रियजनांशी भेटी होतील, त्यामुळे मन आनंदी राहील.
धनु – कामाच्या ठिकाणी हाताखालील कर्मचाऱ्यामुळे ताण वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक बाबींमध्येही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अडकला असाल तर आता त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो.
मकर – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभाच्या दृष्टीने संधी मिळू शकतात. व्यवसायात बदल करण्याचा विचार करत असाल तर आधी नीट विचार करा. प्रवासाला जाताना काळजीपूर्वक गाडी चालवा कारण अचानक गाडी बिघडल्याने खर्च वाढू शकतो.
कुंभ – बजेटनुसार पैसा खर्च करा, अन्यथा पैशांची चणचण भासू शकते. मालमत्ता खरेदी करताना किंवा विकताना, काळजीपूर्वक निर्णय घ्या आणि कागदपत्रे पूर्णपणे वाचल्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.
मीन – कामाच्या निमित्ताने लहान-मोठा प्रवास करावा लागू शकतो, तो फलदायी ठरेल. कामात प्रगती झाल्यामुळे समाधानी असाल आणि मानसिक ताणही कमी होईल. विद्यार्थ्यांसाठीही दिवस शुभ राहील, आवडत्या विषयात यश मिळू शकेल. नोकरदार जातकांसाठी दिवस चांगला असेल.
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसियांतें कैसेनि मारुं । कवणावरी शस्त्र धरूं…
दिनविशेष
साहित्यिक विश्राम बेडेकर
टीम अवांतर
विख्यात मराठी साहित्यिक आणि चित्रपटव्यावसायिक विश्राम बेडेकर यांचा जन्म 13 ऑगस्ट 1906 विदर्भातील अमरावती शहरात झाले. मराठी रंगभूमीवरील विख्यात नट चिंतामणराव कोल्हटकर आणि श्रेष्ठ गायक नट मास्टर दीनानाथ यांनी सुरू केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ या संस्थेच्या 1934 साली कृष्णार्जुन युद्ध या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर यांनी चित्रपटव्यवसायात पदार्पण केले. तत्पूर्वी, 1933मध्ये मास्टर दीनानाथ यांच्या ‘बलवत संगीत नाटक मंडळी’साठी ब्रह्मकुमारी हे नाटक त्यांनी लिहिले होते. या नाटकातील ‘मी लोपले मधुमीलनात या’ हे पद अत्यंत लोकप्रिय ठरले. 1935 साली कृष्णार्जुन युद्धाचे आणखी एक सहदिग्दर्शक वा. ना. भट यांच्या सहकार्याने ‘भट-बेडेकर प्रॉडक्शन्स’ ही चित्रसंस्था स्थापन केली. राम गणेश गडकरी आणि चिं.वि. जोशी याच्या अनुक्रमे ‘ठकीचे लग्न’ आणि ‘सत्याचे प्रयोग’ या विनोदी कथांवर त्यांनी बोलपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी बोलपट होत. प्रभातच्या ‘शेजारी’ या गाजलेल्या चित्रपटाची पटकथा आणि संवाद त्यांनीच लिहिले होते. राजकमलच्या ‘अमर भूपाळी’ची (1951) कथाही त्यांचीच होती. 1951 ते 1981 या काळात त्यांनी फक्त सहा चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात वासुदेव बळवंत आणि रुस्तुम सोहराब यांचा समावेश होतो. बेडेकर यांची रणांगण (1939) ही कांदबरी मराठीत अपूर्व ठरली. 1980 मध्ये त्यांनी ‘एक झाड दोन पक्षी’ नावाने आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकासाठी त्यांना 1985 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1988 मध्ये मुंबईत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. 30 ऑक्टोबर 1998 रोजी विश्राम बेडेकर यांचे निधन झाले.