प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
या आठवड्यात नोकरदारांना अधिक जबाबदारीची कामे येऊ शकतात. त्या कामांसोबत यशाची संधी मिळण्याची शक्यता आहे. संधीचा उपयोग करण्यासाठी वेळेचे नियोजन करा. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. महिलांनी मानसिक प्रसन्नता टिकवण्यास प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी लागेल. शक्यतो प्रवास टाळावा.
वृषभ
या आठवड्यात व्यावसायिक लोकांना आर्थिक फायदा संभवतो. त्यामुळे नवीन क्षेत्रात प्रवेश करू शकाल. आपल्या प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. घरातील जेष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी. महिला कलात्मक दृष्टिकोनातून विषयांची मांडणी करतील आणि महिला मंडळात नाव कमवू शकाल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. करिअरशी संबंधित प्रवास होऊ शकतो.
मिथुन
या आठवड्यात नोकरदारांना वरिष्ठांकडून जास्त काम मिळण्याची शक्यता आहे. प्रतिकूल काळात सर्वांशी जुळवून घ्यावे लागू शकते. आर्थिक गणिते उत्तम जमतील. नवीन गुंतवणूक करू शकाल. कौटुंबिक गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिलांनी संवादावर भर द्यावा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल. प्रवास लांबण्याची शक्यता आहे.
कर्क
या आठवड्यात काळानुसार बदलण्याची तयारी ठेवावी लागेल. नवीन गोष्टी शिकाव्या लागू शकतात. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन करावे लागेल. आरोग्य चांगले राहील. महिलांचे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शाळा किंवा कॉलेजमधील स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता येईल आणि यश मिळेल.
सिंह
या आठवड्यात नवीन ओळखी होतील. लोकांची नीट पारख करा. गोड बोलण्याने फसण्याची शक्यता आहे. आर्थिक येणी उशिरा येतील, त्यामुळे कामाचा वेग कमी होऊ शकतो. महिलांनी गृहकर्तव्यांमध्ये दुर्लक्ष करू नये. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुरू ठेवा, यश नक्की मिळेल.
कन्या
या आठवड्यात कामासंदर्भात वरिष्ठांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. कामांना गती मिळाल्यामुळे उत्साही वाटेल. ठाम भूमिका ठेवा. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. महिलांनी गृहकर्तव्यांना प्राधान्य द्यावे. योग्यवेळी आराम करावा. आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे. प्रवास फलदायी ठरेल.
हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
तुळ
या आठवड्यात मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या आदर्श जीवनशैलीचे कौतुक होऊ शकते. नवीन संकल्पना मांडता येतील आणि त्यांचे स्वागत होईल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे, त्याचा फायदा होईल. महिलांची जुनी दुखणी परत उद्भवू शकतात, काळजी घ्या. विद्यार्थ्यांना मित्रांसोबत लांबचा प्रवास होऊ शकतो.
वृश्चिक
या आठवड्यात चिकाटी आणि संयमाने राहिलेली कामे पूर्ण करा. निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करा. कार्यक्षेत्रात नव्या बदलांसाठी पुढाकार घेतल्यास फायदा होईल. आर्थिक गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. महिलांना कौटुंबिक स्नेहींच्या भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील. प्रवासात अडथळे येऊ शकतात, काळजी घ्या.
धनु
या आठवड्यात कामात यश मिळेल. जास्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती भक्कम राहील. खर्चाचे योग्य नियोजन करून नव्या योजना तयार करू शकाल. घरातील वरिष्ठांची चांगली काळजी घेऊ शकाल. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, प्रामाणिक प्रयत्न करा.
मकर
या आठवड्यात सकारात्मक विचार ठेवा. कामाच्या ठिकाणी संयम आवश्यक आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. स्नेही आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शब्द जपून वापरा. महिलांना भाऊ-बहिणींच्या भेटी होतील, वातावरण प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि अनावश्यक भटकंती टाळावी.
कुंभ
या आठवड्यात कामाचा ताण राहील. साचलेली कामे अंगावर येतील. संयमाने आणि संवाद साधून कामे वेळेत पूर्ण करू शकाल. आर्थिक लाभ होईल. ऑफिसमधील राजकारण मानसिक त्रास देऊ शकते. महिलांनी आप्तेष्टांचे मन सांभाळण्याचा प्रयत्न करावा.
हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव निवारणाची आवश्यकता
मीन
या आठवड्यात सुरुवातीलाच पैशाचे आणि कामाचे नियोजन करावे लागेल. जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. बचतीचे नवीन पर्याय मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मानसिक स्वास्थ्य सुधारेल. महिलांना मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, त्याचे उत्तम फळ मिळेल.