दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 09 ऑगस्ट 2025; वार : शनिवार
भारतीय सौर : 18 श्रावण शके 1947; तिथि : पौर्णिमा 13:24; नक्षत्र : श्रवण 14:23
योग : सौभाग्य 26:14; करण : बालव 24:50
सूर्य : कर्क; चंद्र : मकर 26:10; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:10
ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
अश्वत्थमारुती पूजन
पौर्णिमा समाप्ती दुपारी 01:24
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यावसायिक बाबींमध्ये मित्रांचा पाठिंबा मिळेल. त्यांच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
वृषभ – आरोग्य चांगले राहील. मात्र पालकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मागावी लागू शकते. वादग्रस्त बाबींपासून दूर राहा. व्यक्तिमत्वात सुधारणा होईल.
मिथुन – व्यावसायिकदृष्ट्या चांगली प्रगती साधणार आहात. आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणत्याही जुन्या आजारापासून आराम मिळेल. जोडीदाराशी वाद टाळा. मित्रांसोबत एक छान संध्याकाळ घालवण्याची संधी मिळेल.
कर्क – तुमच्या नवीन विचारांमुळे कामाच्या ठिकाणी एक नवीन ओळख मिळेल. त्याचवेळी योग्य ती सावधगिरी बाळगा, कारण सहकारी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात. आज आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सामान्य राहील. पण आज केलेल्या गुंतवणुकीचा भविष्यात चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सिंह – भावनिकदृष्ट्या मन:स्थिती अस्थिर असेल, त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा. आज आरोग्यासोबतच आर्थिक स्थितीही बिघडू शकते. पण कौटुंबिक जीवनात शांतता असेल. कार्यालयामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी एखादी घटना घडू शकते.
कन्या – आज मानसिकदृष्ट्या बरेच चढउतार अनुभवण्यास मिळतील. तरी संयमाने कामे पूर्ण करा. बौद्धिक कार्यामुळे तुम्हाला आदर मिळेल. नोकरीत बढतीचे जसे योग आहेत तसेच परदेशगमनाचे योग देखील बनत आहेत. यामुळे उत्पन्न वाढेल, जे येणाऱ्या काळात आर्थिक स्थिरता प्रदान करू शकते.
हेही वाचा – Playgroup : पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता
तुळ – आरोग्याला प्राधान्य द्या. जास्त खर्च मनाला त्रास देऊ शकतो. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. प्रियजनांचा पाठिंबा मिळेल. ज्यामुळे आर्थिक समस्यांमधून बाहेर पडता येईल. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल.
वृश्चिक – आज आरोग्य चांगले राहील. मात्र पैसे कुठे खर्च होत आहेत, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्चामुळे मनाला त्रास होऊ शकतो. जोडीदाराची साथ मिळेल. व्यवसाय विस्तार होण्याची शक्यता आहे.
धनु – कामाच्या ठिकाणी व्यग्र असाल. पैशाशी संबंधित कोणताही विषय तुम्हाला त्रास देऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या दिवस थोडा चांगला, थोडा वाईट असा राहणार आहे. जोडीदाराशी मतभेद होण्याची चिन्हे आहेत. कार्यालयातील परिस्थिती चांगली असेल.
मकर – एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी ओळख होऊ शकते. मानसिकदृष्ट्या आनंदी असलात तरी, आत्मविश्वासाची कमी असेल. पालकांकडून व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळू शकते. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल.
कुंभ – आजचा दिवस चांगला असेल. आत्मविश्वासाने प्रत्येक काम पूर्ण कराल. अभ्यासातील आवड वाढेल. शैक्षणिक कामात यशस्वी व्हाल, ज्यामुळे आदर सन्मानात वाढ होईल. आर्थिकदृष्ट्या स्थिती उत्तम असेल. मित्रांना दिलेले पैसे परत मिळतील.
मीन – आज जोडीदाराशी समन्वय ठेवून कामे उरकण्याची आवश्यकता आहे. व्यवसायाची स्थिती चांगली असेल. आर्थिक लाभ होऊ शकतो, मात्र खर्च कमी करणे उत्तम. ऑफिसमधील काही सहकारी कामात समस्या निर्माण करू शकतात.
हेही वाचा – Mission Admission : पूर्व-प्राथमिक शालेय प्रवेशाची पूर्व-तयारी
दिनविशेष
जागतिक आदिवासी दिन
टीम अवांतर
आदिवासी हा पृथ्वीवरील मूळ रहिवासी असे मानले जाते. मात्र त्यांच्या अधिकारांचे वारंवार उल्लंघन केले जाते. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाची सेवा करणारा हा वर्ग. पण सर्वाधिक अत्याचार आणि गुलामगिरीची वागणूक या वर्गाला मिळाली. याची दखल घेत, आदिवासींच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे या हेतूने 1960च्या दशकात अमेरिकेत तसेच विविध देशांमध्ये चळवळी सुरू झाल्या. पुढे 9 ऑगस्ट 1982 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने जिनिव्हामध्ये एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले. यानंतरच्या पुढील काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवर बैठकांच्या माध्यमातून सतत चर्चा, विचारमंथन होत राहिले. याचा परिणाम म्हणून संयुक्त राष्ट्राने 1994 हे वर्ष आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले. तसेच 1995 ते 2005 हे पहिले आदिवासी दशक तर 2005 ते 2014 हे दुसरे आदिवासी दशक म्हणून घोषित केले. 9 ऑगस्ट 1982 रोजी जिनिव्हामध्ये झालेल्या बैठकीची आठवण म्हणून 1995 साली पहिला जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्टला साजरा करण्यात आला. जागतिक स्तरावर आदिवासींना एकत्र आणणे, त्यांच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक प्रश्न सोडविणे, त्यांच्यावरील अन्याय, त्यांचे होणारे शोषण थांबविणे यासारखे उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहेत. आदिवासी म्हणजेच आदिम काळापासून वास करणारे असून नैसर्गिकरित्या आयुष्य जगणे, निसर्ग, साधेपणा हा त्यांचा विशेष आहे. त्यांची अतिशय प्राचीन, समृद्ध आणि स्वतंत्र अशी संस्कृती आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अर्थात, कालानुरूप आता आदिवासी हळूहळू मुख्य प्रवाहात सहभागी होत असून शिक्षितांचा टक्का वाढत आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख या वर्गाची निर्माण झालेली दिसते.