Sunday, August 31, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 31 जुलै 2025

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 31 जुलै 2025

दर्शन कुलकर्णी

आज, दिनांक : 31 जुलै 2025; वार : गुरुवार

भारतीय सौर : 09 श्रावण शके 1947; तिथि : सप्तमी 28:58; नक्षत्र : चित्रा 24:40

योग : साध्य 28:31; करण : गरज 15:47

सूर्य : कर्क; चंद्र : कन्या 11:14; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:14

पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन

संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

शीतला सप्तमी


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – दिवस चांगला जाईल. व्यवसायाच्या बाबतीत, काही मोठ्या आणि विशेष करारांना अंतिम रूप दिले जाऊ शकते. समाजात तुमच्याबद्दचा आदर वाढेल, भौतिक सुखात देखील वाढ होईल. शुभ कार्यासाठी काही खर्च देखील करू शकता, ज्यामुळे लोक प्रशंसा करतील. कुटुंबातही शांततापूर्ण आणि आनंदी वातावरण असेल.

वृषभ – व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन योजना बनवू शकता, ज्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कोणत्याही कायदेशीर वादात अडकला असाल तर, त्यात यश मिळू शकते. दिवसभरात कामात काही अडचणी येऊ शकतात, परंतु त्या अडचणींवर हुशारीने मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन – सर्जनशील कामात दिवस व्यतीत होणार आहे. कामाच्या ठिकाणीही, तेच काम कराल जे तुम्हाला सर्वात जास्त आवडते. त्यामुळे मनाला शांती मिळेल. व्यवसायाच्या नव्या योजना मनात येतील, यासाठी कोणत्याही अनुभवी आणि वरिष्ठ व्यक्तीची मदत घेऊ शकता.

कर्क – आजचा दिवस शुभदायी जाणार आहे. कामाच्या ठिकाणी पूर्ण मेहनत आणि समर्पणाने कोणतेही काम केले तर त्याचे परिणाम लगेच मिळतील. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले कोणतेही काम आता पूर्ण करता येईल. तसेच, कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या बैठका किंवा चर्चा होऊ शकतात. यामध्ये सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

सिंह – कामात जरा जास्तच व्यग्र राहाल. कामाच्या ठिकाणी काही वरिष्ठ अधिकारी महत्त्वाच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत सावध रहा आणि गरजेपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका. संयमाने काम केल्यास यश मिळू शकते. दिवस जसजसा पुढे सरकेल तसतशी परिस्थितीत सुधारणा होईल.

कन्या – कामाच्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे जरा अंतर राखूनच काम करावे लागेल. कठोर शब्द वापरणे टाळा आणि संयम ठेवा, अन्यथा मोठी समस्या उद्भवू शकते. आत्मविश्वासाने काम करणे फायदेशीर ठरेल आणि भोवतालच्या परिस्थितीतही सुधारणा होईल.

हेही वाचा – Local train : डोंबिवली ते कसारा प्रवासातील ‘ते’ नातं

तुळ – व्यवसाय आणि नोकरीच्या बाबतीत दिवस फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी काही वाद सुरू असेल तर तो आता सोडवला जाऊ शकतो. त्याच वेळी, व्यवसायाच्या दृष्टीने नवीन प्रकल्पावर काम सुरू होऊ शकते, ज्यातून भविष्यात मोठा नफा मिळेल. मात्र मालमत्तेच्या बाबतीत काही समस्या निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक – व्यवसायासाठी दिवस खूप चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी नफा कमावण्याच्या अनेक संधी निर्माण होतील. अशा परिस्थितीत, खूप व्यग्र रहाल. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत काहीतरी नवीन केल्याने तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. कुटुंबात आनंद, शांती आणि स्थिरता राहील.

धनु – कामाच्या ठिकाणी सतर्क राहण्याची गरज आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे उत्तम. व्यवसायात थोडीशी जोखीम घेतल्यास मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन संधी ओळखाव्या लागतील आणि काही नवीन काम हाती घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. जवळच्या व्यक्तीसाठी पैशांची आवश्यकता भासू शकते.

मकर – व्यवसायाच्या बाबतीत दिवस सामान्य राहील. भागीदारीत केलेल्या व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एकाच वेळी अनेक कामे करावी लागू शकतात, ज्यामुळे दिवसभर कामात मग्न रहाल आणि ताण थोडा वाढू शकतो.

कुंभ – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस शुभ राहणार आहे. काम लवकर होईल आणि नफा कमावण्याच्या संधी देखील मिळू शकतात. परंतु कोणत्याही कामात किंवा निर्णयात घाई करणे टाळा, अन्यथा कोणती तरी महत्त्वाची गोष्ट हातातून निसटून जाऊ शकते. त्यामुळे कोणतेही काम विचारपूर्वक करणे चांगले राहील. आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल.

मीन – दिवस फायदेशीर राहणार आहे आणि व्यवसायात जोखीम घेतल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात. पण जास्त घाई करणे देखील टाळले पाहिजे. काही समस्या असतील तर त्या संयमाने सोडवता येतील. बुद्धिमत्तेमुळे आणि शहाणपणामुळे कामाच्या ठिकाणी सर्व कामे सहजपणे पूर्ण करू शकाल आणि यश मिळवाल.

हेही वाचा – About Website : ‘अवांतर’ नावामागची कथा…


 

दिनविशेष

प्रसिद्ध पार्श्वगायक महंमद रफी

टीम अवांतर

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायक महंमद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी अमृतसर जिल्ह्यातील कोटला सुलतानसिंग या गावी झाला. छोट्या रफीला शेतीची किंवा शिक्षणाची आवड नाही, असे पाहून त्याच्या थोरल्या भावाकडे लाहोरला पाठविण्यात आले. रफीचे गाण्याचे अंग हेरून भावाने, छोटे गुलाम अली खाँसाहेब, अब्दुल वहीद खाँसाहेब अशा उस्तादांकडून त्यांना गाणे शिकवण्याची व्यवस्था केली. पुढे रफी यांनी फिरोझ निझामी यांच्याकडे दोन वर्षे शागिर्दी केली. निझामी जेव्हा लाहोर नभोवाणी केंद्राचे संगीत-दिग्दर्शक झाले, तेव्हा त्यांनी महंमद रफी यांना नभोवाणीवर गायनाची संधी दिली. यादरम्यान लाहोरला चित्रपट-निर्मिती सुरू झाली होती. 1944 मध्ये गुलबलोच या पंजाबी चित्रपटात संगीत-दिग्दर्शक श्यामसुंदर यांनी रफी यांना दोन गीते गाण्याची संधी दिली. दिग्दर्शक नाझीर यांच्या आग्रहामुळे रफी मुंबईच्या चित्रपटासृष्टीत आले आणि त्यांनी नाझीरच्या लैला मजनू (1945) या चित्रपटात छोटी भूमिकाही केली. योगायोगाने श्यामसुंदर त्याचवेळी मुंबईत आले आणि त्यांनी रफी यांना गाँव की गोरी (1945) या पहिल्याच हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. त्यानंतर, रफीचे गुरू फिरोझ निझामी हे 1947 साली जुगनू या चित्रपटाचे संगीत-दिग्दर्शक म्हणून मुंबईत आले आणि साहजिकच रफी यांना त्या चित्रपटात पार्श्वगायक म्हणून संधी मिळाली. त्या चित्रपटातील ‘यहाँ बदला वफा का…’ या नूरजहाँबरोबर गायलेल्या द्वंद्वगीतामुळे रफी यांची खास पंजाबी ढंगाची गायकी एकदम लोकप्रिय झाली. तर, 1948 सालच्या ‘प्यार की जीत’ या चित्रपटातील ‘इस दिल के टुकडे हजार हुए’ या हुस्नलाल-भगतराम यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यामुळे रफी यांना अधिक प्रसिद्धी मिळाली व ती पुढे सतत वाढतच गेली. 36 वर्षांच्या कालावधीत महंमद रफी यांनी भजन, रागदारी, गजल, कवाली अशा निरनिराळ्या गीतप्रकारांमध्ये सुमारे 25 हजारांवर गाणी गायली. दिलीपकुमार, अशोककुमार यांच्यापासून ऋषी कपूरपर्यंत बहुतांश सर्व नायकांना त्यांनी आपला ‘उसना आवाज’ दिला. गुलाम हैदर, नौशाद, शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, रोशन, सचिनदेव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, कल्याणजी-आनंदजी यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांची गाणी रफी यांनी गायली आणि लोकप्रिय केली. 1973 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरविण्यात आले. 31 जुलै 1980 रोजी त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!