दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 28 जुलै 2025; वार : सोमवार
भारतीय सौर : 06 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्थी 23:23; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 17:34
योग : परिघ 26:53; करण : वणिज 10:57
सूर्य : कर्क; चंद्र : सिंह 23:59; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 19:16
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
विनायक चतुर्थी
शिवामुठ : तांदूळ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस सकारात्मक असेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या क्षेत्रात यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मालमत्तेशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात गोडवा राहील आणि जोडीदारासोबत सुट्टीवर जाण्याचा बेत कराल.
वृषभ – आज कारकिर्दीत यश मिळेल. तसेच आर्थिक स्थितीही सुधारेल. मात्र, मालमत्तेच्या बाबींवर लक्ष द्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. जोडीदार सरप्राइज डेटची योजना आखू शकतो. त्याचबरोबर आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
मिथुन – मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस असेल. कारकिर्दीत आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असू शकतो.
कर्क – आज मानसिक आरोग्याची काळजी घ्या. दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनावश्यक प्रवास टाळा. वर्गमित्रांशी परत एकदा भेटीगाठींचा योग असून व्यावसायिक जीवनासाठी या भेटींचा उत्तम फायदा होईल.
सिंह – कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. आर्थिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे निर्णय हुशारीने घ्या. आजचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कन्या – व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीकडून भेट मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यही उत्तम असेल. आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात. आज जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
हेही वाचा – Swami Samarth : स्वामी अन् मुंगळा…
तुळ – आजचा दिवस कडू-गोड अनुभवांचा असू शकतो. स्पर्धेचा अभाव तुमच्या उत्पादकतेवर देखील परिणाम करू शकतो. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील. विवाहोत्सुकांसाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही.
वृश्चिक – आज व्यवसायात यश मिळू शकते. व्यावसायिक बाबींमध्ये संयम बाळगण्याची गरज आहे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील. घरातील सदस्यांशी संबंध दृढ होतील. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवाल तसेच त्यांच्यासमवेत फिरायला जाल.
धनु – आज व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी मिळू शकतात. मालमत्तेत गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर असल्याचे सिद्ध होऊ शकते. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेणे अधिक योग्य ठरेल. जोडीदाराशी मोकळेपणाने बोला, त्यामुळे नात्याचा पाया अधिक मजबूत होण्यासाठी मदत मिळेल.
मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळा. चांगले आरोग्य राखण्यासाठी चौरस आहार घ्या. बाहेरील अन्न खाणे टाळा. नवीन मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे.
कुंभ – स्वतःच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. नोकरीच्या निमित्ताने छोटे प्रवास घडतील, मात्र प्रवासादरम्यान काही समस्या उद्भवू शकतात. आज स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्य आणि जोडीदारासोबत वेळ घालवा.
मीन – आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मालमत्तेत गुंतवणूक करणे टाळा. प्रवासाचे नियोजन करता येईल. आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कुटुंबातील सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. वैवाहिक जीवनात गोड-कडू अनुभव येऊ शकतात.
हेही वाचा – Unreasonable expectations : मुला-मुलींचे विवाह का रखडतात?
दिनविशेष
प्रसिद्ध साहित्यिक महाश्वेता देवी
टीम अवांतर
प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांचा जन्म 14 जानेवारी 1926 रोजी बांगलादेशातील ढाका शहरात झाला. त्यांचे वडील मनीष घटक हे कल्लोल साहित्यिक चळवळीचे कवी आणि कादंबरीकार होते तर, आई धरित्री देवी या देखील लेखिका आणि समाजसेविका होत्या. महाश्वेता देवी यांनी शांतिनिकेतनमधून बीए (ऑनर्स) आणि कोलकाता विद्यापीठातून एमए केल्यानंतर एक शिक्षिका आणि पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. कोलकाता विद्यापीठात त्या इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. 1984 मध्ये विद्यापीठात राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ लेखनावर भर दिला. त्यांनी 100हून अधिक पुस्तके आणि 20हून अधिक लघुकथांचे संग्रह लिहिले, महाश्वेता देवी यांनी प्रामुख्याने बंगाली भाषेमध्ये केलेल्या या लिखाणाचा इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. आदिवासींच्या आयुष्यावर त्यांनी विपुल लेखन केले. त्याचसोबत आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी मोठ्या स्वरूपात काम केले. झाशीच्या राणीच्या चरित्रावर आधारित ‘झाशीर राणी’ नावाची त्यांची पहिली कादंबरी 1956 मध्ये प्रकाशित झाली. त्याचप्रमाणे हजार चौराशिर माँ, रुदाली या त्यांच्या कादंबऱ्याही लोकप्रिय ठरल्या. या दोन्ही कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. साहित्य क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठीत अशा पुरस्कारांनी महाश्वेती देवी यांना गौरविण्यात आले आहे. 1979 साली साहित्य अकादमी पुरस्कार, 1986 साली पद्मश्री, 1996 मध्ये ज्ञानपीठ आणि 1997मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 2006 मध्ये पद्मविभूषण प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. 28 जुलै 2016 रोजी त्यांचे निधन झाले.