Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Gratitude : अबोल कृतज्ञता
    ललित

    Gratitude : अबोल कृतज्ञता

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 27, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Feelings, अबोल, कृतज्ञता, अबोल कृतज्ञता, Gratitude
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शैलजा पुरोहित

    आपल्याला मिळालेला मानव जन्म ही ईश्वरी देणगी आहे. त्याने बहाल केलेली विचारशक्ती हा अनमोल उपहार आहे. विचारशक्तीमुळेच तर सृजनशीलतेचा गुण प्राप्त होतो. सारी भौतिक सुख लाभणे, अनुकूल परिस्थिती मिळणे हे भाग्यच आहे. हे सारे  कुणामुळे  घडतं, याचा विचार तरी मनात येतो का? त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण आपल्या कृतीतून, उक्तीतून दाखवतो का?

    निसर्गाने ही चराचर सृष्टी निर्माण केली आहे. तिथे असणाऱ्या पशू, पक्षी, प्राणी, कीटक यांच्याकडून खूप काही शिकू शकतो. फुलपाखराचेच बघा ना! मध गोळा करण्यासाठी  ते फुलांवर येते. स्वगरजेनुसार मध घेऊन, पाकळीची नासधूस न करता अलगद उडून जाते. विद्ध्वंस न करणे ही जणू त्याने फुलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे. त्याचा हा गुण अनुकरणीय आहे ना!

    निसर्ग दानशूर आहे. मित्रत्वाच्या नात्याने तो आपल्याला भरभरून देतो. आपली हावरट वृत्ती मात्र त्याच्याकडून सातत्याने ओरबाडून घेतच असते. त्या नादात आपल्या मित्राला विद्रुप करतो आहोत, त्याचा ऱ्हास होत आहे, हे सोयीस्करपणे विसरतो. त्सुनामी, भूकंप यासारख्या आपत्ती ओढावल्या की, निसर्गाला जबाबदार धरून मोकळे होतो. किती  कृतघ्न आहोत आपण!

    जन हो, हे सारे थांबवा. मित्राला जगवा. पर्यावरणाकडे लक्ष पुरवा आणि आपली कृतज्ञता  व्यक्त करा. जन्म घेतल्यापासून शिक्षणाला सुरुवात होते. आई दुग्धपानाबरोबर शिक्षण देत असते. काऊ, चिऊच्या गोष्टी सांगून त्यांची ओळख करून देते. म्हणून ती पहिली गुरू. वडिलांचे बोट धरून जगाची ओळख करून घेतो. त्यांचे बोट सुटेपर्यंत आपल्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर, कृतज्ञता असते. पण परिस्थिती पालटते त्यावेळी त्यांच्याविषयीची भावना तितकीच तीव्र असते का? याचे उत्तर स्वत:च्या मनाला विचारा. अन्यथा, आज जागोजागी दिसणारे वृद्धाश्रम काळाची गरज बनले नसते.

    हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन

    “शिष्यात इच्छेत पराजयम्” अशा वृत्तीचे शिक्षक आपल्या शिष्याला हातचे काहीही न राखता भरभरून ज्ञान देत राहतात. असेच शिक्षक शिष्याच्या ह्रदयात अढळ स्थान प्राप्त करतात. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजकार्य करणारे आपल्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त करत असतात. कारण समाजानेच त्यांना स्वत:ची ओळख दिलेली असते. समाजात स्थान आणि दर्जा दिलेला असतो.

    शेतकरी तर आपला अन्नदाता आहे. आजची त्याची स्थिती मात्र दयनीय आहे. त्यांच्या आत्महत्यांबद्दल ऐकून आपण हळहळतो, मन हेलावते. एवढे पुरेसे नाही. त्या परिस्थितीत त्यांना आर्थिक गरज असते, तशीच मानसिक आधाराची देखील गरज असते. त्याचप्रमाणे ज्याच्या जीवावर आपण आपले जीवन निर्धास्तपणे सोपवून सुखरुप जगू शकतो, मौजमजा करू शकतो, त्या तिन्ही दलांतील सैनिकांप्रति आपली काही कर्तव्ये आहेत. “जय जवान, जय किसान” हे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेली घोषणा आहे. तमाम भारतीयांच्या मनात या द्वयीविषयी असणारी भावना, त्यांच्या विषयी असणारी कृतज्ञता, आपुलकी या घोषणेतून त्यांनी दर्शविली आहे.

    कृतज्ञता व्यक्त करणे हा एक शिष्टाचार आहे, तो रिवाज आपण पाळतो देखील. आपल्या संकटकाळी कुणीतरी आपल्याला निरपेक्षपणे मदत करतो, विश्वास दाखवून मदतीचा हात देतो – कधी ती मदत आर्थिक असू शकते, कधी मानसिक आधार देणारी असते… आपुलकीची ही मदत अमूल्य असते. अशावेळी मदतकर्त्याला ‘धन्यवाद’, ‘Thanks’ असे म्हणतो. मला मात्र वाटते की, अबोलपणे त्यांच्या ऋणात राहणे अधिक श्रेयस्कर आहे. एकप्रकारे आपण त्यांच्याप्रति व्यक्त केलेली ती कृतज्ञताच असते.

    हेही वाचा – US tourists : शंका सरल्या, वाढली भारताबद्दलची ओढ!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026 ललित

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026 ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    By प्रणाली वैद्यMay 8, 2026

    भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने…

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 411
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026
    Most Popular

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.