प्राजक्ता अनंत काथे
(ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड)
मेष
हा आठवडा आपल्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास यांनी परिपूर्ण आहे. आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. पावसाळी सहलीचा योग आहे. नोकरदार वर्ग नवीन योजना आखू शकतील. त्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत मिळू शकेल. आपले आरोग्य उत्तम राहील. महिलांना कौटुंबिक जीवनाचा आनंद मिळू शकेल. मानसिक संतुलन उत्तम राहील. विद्यार्थ्यांना मित्राबरोबर चांगला वेळ घालवाल. एखादी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू शकाल.
वृषभ
या आठवड्यात आपल्याला ऑफिसमध्ये, कुटुंबात एखादी जबाबदारी स्वीकारावी लागेल. या आठवड्यात नवीन गुंतवणूक करणे टाळावे. गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावधान राहावे. पूर्ण विचार करून शांत डोक्याने नवीन निर्णय घ्यावा. महिला मनाप्रमाणे खरेदी करू शकतील. विद्यार्थी वर्गाला प्रवास करावा लागेल. प्रवासादरम्यात नवीन समविचारी मित्र भेटू शकतात.
मिथुन
हा आठवडा खूप बिझी असण्याची शक्यता आहे. आपल्या हातात घेतलेली काम पूर्ण करू शकाल. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लाभ संभवतो. छोटे प्रवास होऊ शकतात. आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर गैरसमज होण्याची शक्यता आहे. मौन बाळगणे हितावह आहे. महिला या आठवड्यात मुक्तपणे खर्च करू शकतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आनंदी रहाल. विद्यार्थी वर्गाचा मित्राबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात सावध राहावे.
कर्क
हा आठवडा नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. कौटुंबिक वातावरण छान आनंदी असेल. व्यापार-व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकते. कुठलेही काम अर्धवट ठेवू नका. कामाच्या बाबतीत निर्णय घेताना सखोल माहिती काढून मग निर्णय घ्या. महिलांचा तीर्थक्षेत्री प्रवास संभवतो. कुटुंबातील सदस्य समजून घेतील. नवीन मैत्रिणी मिळतील. विद्यार्थी वर्गाला कॉलेज कॅम्पसमधून नोकरी लागण्याची शक्यता आहे.
सिंह
हा आठवडा संमिश्र घटनांचा आहे. आपल्यात असलेली ऊर्जा आणि स्वतःवरील विश्वासामुळे काम झपाट्याने पूर्ण करू शकाल. प्रतिकूल वाटणारी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाने आपल्या अधिकाराचे कार्यक्षेत्र ओळखून काम करावे. स्वतःवरील विश्वास आणि प्रामाणिकपणा जपा. महिलांनी आपल्याला जमतील तेवढीच जबाबदारी स्वीकारावी. अतिआत्मविश्वास टाळा. विद्यार्थी वर्गाने कुसंगती टाळावी. चांगले मित्र ओळखून त्यांची संगत ठेवावी.
कन्या
हा आठवडा स्पर्धात्मक स्थितीचा आहे. या आठवड्यात सतत कसलीतरी चिंता वाटत राहील. हातात घेतलेली कामे प्रामाणिकपणे आणि वेळेवर पूर्ण करू शकाल. वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. कामाचा ताण न घेता, मनापासून काम करा. नोकरदार वर्गाने वादविवाद टाळावा, इतरांना समजून घ्यावे. कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. महिलांनी आपली मते इतरांवर लादू नये. प्रवासाची संधी जाऊ शकते. विद्यार्थी वर्गाने मानसिक ताण घेऊ नये. स्वतःच्या बुद्धीचातुर्य आणि सुसंवादाने नवीन संधी मिळू शकतील. त्यातूनच योग्य संधीची निवड करू शकाल.
हेही वाचा – Yoga is lifestyle : प्राणायाम हाच योग विद्येचा आत्मा
तुळ
या आठवड्यात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा परतवा मिळू शकेल. नवीन गुंतवणूक योग्य सल्ल्याने करा. शेअर मार्केटचा अभ्यास असणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. या आठवड्यात धनलाभ संभवतो. आर्थिक स्थिती उत्तम राहील. महिलांनी कोणाला उसने पैसे दिले असतील, तर ते परत मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी वर्गाने एकाग्रतेने अभ्यास करावा. वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
वृश्चिक
या आठवड्यात योग्य मार्गदर्शनामुळे महत्त्वाचे काम पूर्ण करू शकाल. कुटुंबातील मतभेद, गैरसमज दूर होतील. जोडीदाराशी नाते अधिक चांगले होईल. नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळू शकेल. अधिकारात वाढ होईल, व्यवसाय करणाऱ्यांना जुनी येणी येऊ शकतात. महिला नव्या योजनांचा वापर यशस्वीपणे करू शकतील. छोटे प्रवास होतील. आपल्या कार्यक्षेत्रात मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थी वर्गाने लक्षात ठेवावे.
धनु
या आठवड्यात ठरवलेली सगळी कामे होतील. आपली भाषा आणि व्यक्तिमत्वाचा सहकारी वर्गावर प्रभाव पडू शकेल. आपली कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. मित्रवर्ग आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. मित्रासाठी खर्च कराल. देवदर्शनानिमित्त प्रवास होईल. ज्या महिला कार्यरत आहेत, अशांना नवीन भरपूर कामे मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला यश प्राप्त होईल, मेहनतीचे चीज होईल.
मकर
या आठवड्यात कामानिमित्त प्रवास करावा लागेल. व्यावसायिक कामासाठी धावपळ संभवते, विश्रांतीची गरज भासू शकते. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी. कामाचे नियोजन योग्य प्रकारे करावे. योग्य आहार आणि व्यायाम नियमित ठेवावा. महिलांना कामात वाढ होण्याची शक्यता आहे. छोटे प्रवास होतील. जुन्या मैत्रिणी भेटतील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल. परीक्षेची तयारी आतापासूनच करावी.
कुंभ
या आठवड्यात बऱ्याच दिवसापासून राहिलेली इच्छा पूर्ण करू शकाल. हा आठवडा उत्साहाने भरलेला आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटू शकाल. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकाल. जपून बोला आपल्या बोलण्याचा विरोधक गैरफायदा घेऊ शकतात. महिलांना कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करू शकाल. विद्यार्थी वर्ग मित्र-मैत्रिणींबरोबर सहलीचा आनंद घेऊ शकाल.
मीन
या आठवड्यात महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात. ज्या लोकांशी पटत नाही, असे लोकही तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतील. या आठवड्यात उत्साहाने काम पर पाडू शकाल. सामाजिक मानसन्मान मिळू शकेल. कुटूंबात मंगलकार्याचे नियोजन करू शकाल. राहत्या घरासंबधित कामे मार्गी लागतील. रोजच्या जीवनात सूत्रबद्धता आणता येईल. महिलांना जुनी येणी येऊ शकतील. मनाप्रमाणे खर्च करू शकाल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात लक्ष केंद्रीत करता येईल. पॉकेटमनी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Unreasonable expectations : मुला-मुलींचे विवाह का रखडतात?
prajaktakathe3970@gmail.com