दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 23 जुलै 2025; वार : बुधवार
भारतीय सौर : 1 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्दशी 26:28; नक्षत्र : आर्द्रा 17:54
योग : व्याघात 12:33; करण : विष्टी 15:32
सूर्य : कर्क; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:17
पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
शिवरात्री
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. आपले काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. आपल्या वेळेची किंमत समजून घ्या. वडिलांचा सल्ला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकतो. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत.
वृषभ – नवीन करार लाभदायक वाटत असले तरी, अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील. प्रलंबित अडचणी, प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे.
मिथुन – व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो. व्यवहार सुधारण्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे, एवढेच फक्त करू शकता. रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी जुन्या मित्रांना भेटण्याचा प्लॅन बनवू शकता.
कर्क – प्रलंबित देणी आल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. घरगुती कामे कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी ठरतील.
सिंह – क्रीडा प्रकार आणि मैदानी स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना आज समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नकळत चूक होऊन वरिष्ठ नाराज होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची अपेक्षा आहे.
कन्या – पैशांची अतिशय निकड भासेल आणि तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. त्यामुळे आज पैशांची किंमत लक्षात येईल. तुमची ही आर्थिक स्थिती पाहून निकटवर्तीयाकडून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरात अवघडल्यासारखे वाटेल.
हेही वाचा – Kavi Grace : ‘ती गेली तेव्हा…’च्या निमित्ताने
तुळ – कामाच्या ठिकाणी दिवस उत्तम जाण्यासाठी आंतरिक क्षमता निश्चित साथ देईल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.
वृश्चिक – नवीन प्रकल्पांसाठी सहजपणे भांडवल उभे कराल. थकीत देणी परत मिळवाल. मात्र, संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. बहुतांश घटना हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल.
धनु – कामाच्या ठिकाणी तुमचा सगळ्यांवर प्रभाव राहील. भाऊ बहिणींच्या मदतीने आर्थिक लाभ मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा.
मकर – उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी ऊर्जा टिकून राहील. या राशीतील जे रचनात्मक कार्याने जोडलेले आहे, आज त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वारेमाप खर्च करू नका, नियंत्रण ठेवा. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा.
कुंभ – राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो, त्यामुळे संयम राखा. आर्थिक बचतीवर भर द्या. कार्य क्षेत्रात प्रतिस्पर्धी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो म्हणून, डोळे आणि कान उघडे ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. नवीन मित्र भेटतील.
मीन – व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी आपली कौशल्ये वापरा, थोड्याशा प्रयत्नांमुळे समस्या कायमस्वरूपी सुटेल. योग्य रीतीने बचत केली तर, अडचणीच्या वेळी तो पैसा कामाला येईल, अन्यथा पश्चाताप करावा लागेल. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा.
हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…
दिनविशेष
कॅप्टन लक्ष्मी सेहगल
टीम अवांतर
भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी आणि आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1914 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांनी 1938मध्ये मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी मिळविली. तर, 1939 साली स्त्रीरोग चिकित्सा आणि प्रसूतिशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1943मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी, अशी इच्छा व्यक्त केली. या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी सेहगल आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या. सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना देण्यात आले. जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबॉम्ब आणि गनिमीकाव्याची व्यूहरचना त्यांनी शिकून घेतली. ‘चलो दिल्ली’ हे त्यांचे लक्ष्य होते; मात्र 1945 साली अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला आणि जपानने शरणागती पतकरली, तेव्हा आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. युद्धविरामापर्यंत कॅप्टन लक्ष्मींना पदोन्नती मिळून त्या लेफ्टनंट कर्नल झाल्या होत्या. 1947 साली आझाद हिंद सेनेतीलच कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या. 1971मध्ये पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यांच्या देदीप्यमान कर्तृत्वाबद्दल 1998 साली भारत सरकारने पद्मविभूषण किताब देऊन त्यांचा गौरव केला. तर, 2002मध्ये अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध राष्ट्रपतीपदाची निवडणूक त्या हरल्या. 23 जुलै 2012 रोजी कानपूर येथे त्यांचे वार्धक्याने निधन झाले. सुभाषिणी अली आणि अनिसा पुरी या त्यांच्या कन्या, तर नातू शाद अली हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई या त्यांच्या धाकट्या भगिनी होत.