दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 23 नोव्हेंबर 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 02 मार्गशीर्ष शके 1948; तिथि : चतुर्दशी 23:42; नक्षत्र : भरणी 26:02;
- योग : वरियान 19:58; करण : गरज 13:13;
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:49; सूर्यास्त : 17:59;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128
वैकुंठ चतुर्दशी
पौर्णिमा प्रारंभ रात्रौ 11:42
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार
टीम अवांतर
मराठीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1923 रोजी सांगली जिल्ह्यातील गोमेवाडी येथे झाला. इनामदारांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या नवीन मराठी प्राथमिक शाळेत झाले, नंतर अहमदनगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. तेथे त्यांनी वाचनाची हौस मनमुराद भागवली.
बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि अलिगढ विद्यापीठ यांच्या परीक्षा देऊन ते पदवीधर झाले. औंधच्या यमाई हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरीही केली. अर्थशास्त्राची एम. ए. पदवी घेतलेले इनामदार नंतर ‘सकाळ’, ‘केसरी’ या वृत्तपत्रांत लेखन करू लागले. कथा लेखनाने इनामदार यांच्या लेखनाला सुरूवात झाली. 1945 मध्ये ‘अनिल’ साप्ताहिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध व्हायला लागल्या. 1958 पर्यंत त्यांनी ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘किर्लोस्कर’, ‘साप्ताहिक स्वराज्य’ वगैरे नियतकालिकांतून लेखन केले.
हेही वाचा – साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 नोव्हेंबर 2026
इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी कसून संशोधन, इतिहासाचे सजर्नशील आकलन, आणि प्रसंगातील नाटयमयता व चित्रदर्शी शैली, यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. भूमापनाचे शासकीय खात्यातील त्यांचे कामदेखील त्यांना संशोधनाच्या दृष्टीने पूरक ठरले. त्यांच्या ऐतिहासिक कादंबरी लेखनाला महाराष्ट्रात तोड नाही.
1857 च्या स्वातंत्र्यसमरावर लिहिलेली ‘बंड’ ही त्यांची पहिली कादंबरी असली तरी झेप ही त्यांची कादंबरी आधी प्रसिद्ध झाली, तर दुसरी ऐतिहासिक कादंबरी 1963 साली प्रकाशित झाली. पुढे 1962 ते 1986 या काळात झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजेश्री, अशा त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि त्या वाचकप्रिय देखील ठरल्या. झेप या कादंबरीच्या 10 आवृत्त्या निघाल्या. इनामदार यांनी इंद्रनील हा कथासंग्रह आणि वाळल्या फुलांत हे तीन खंडात विभागलेले आत्मचरित्र देखील लिहिले.
झेप, झुंज आणि मंत्रावेगळा या त्यांच्या कादंबऱ्यांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. 1997 मध्ये नगर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. याशिवाय ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे ते तीन वर्ष उपाध्यक्ष देखील होते. 16 ऑक्टोबर 2002 रोजी इनामदार यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस खूप छान जाणार आहे. आज तुमची अशा व्यक्तीशी भेट होईल, जिच्या शब्दांचा तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम होईल. ऑफिसमधील तुमचे चांगले काम पाहून तुमचे सहकारी तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकतील. तुम्ही इतरांसाठी प्रेरणास्रोत बनाल. काम करण्याच्या नवीन पद्धतींबाबत जोडीदाराशी चर्चा कराल. यांच्याकडूनही काही नवीन कल्पना मिळतील. आर्थिक बाबतीत लोकांवर अती विश्वास ठेवणे टाळा. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे उत्तम.
वृषभ – आजचा दिवस सामान्य असेल. व्यवसायात चांगला नफा झाल्यामुळे, तुम्ही नवीन शाखा उघडण्याबद्दल कुटुंबियांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या पाठिंब्याने, तुम्ही एक मोठी समस्या सोडवू शकाल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. संगीत क्षेत्रातील जातकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज अनावश्यक वाद टाळणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल उत्साह वाटू शकतो. कार्यालयात कामाचा ताण अचानक वाढू शकतो, ज्यामुळे तुम्हाला काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही.
मिथुन – आजचा दिवस चांगला जाईल. मात्र आपल्या प्रियजनांशी अनावश्यक वाद घालणे टाळा, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक तर होईलच शिवाय तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल. व्यवसायाच्या संदर्भात इतरांशी संपर्क साधणे चांगले परिणाम देतील. व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता आहे. आपले उत्पन्न आणि खर्चासाठी अंदाजपत्रक तयार करा, कारण यामुळे तुम्हाला भविष्यात लागणाऱ्या भांडवलाची तरतूद करण्यासाठी पैसे वाचविण्यात मदत होईल.
कर्क – आजचा दिवस चांगला असेल. बऱ्याच काळापासून विचार करत असलेला एखादा प्रकल्प आज सुरू करू शकाल. समाजकार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. भावंडांसोबतचे तुमचे सुरू असणारे मतभेद संवादातून मिटण्याची शक्यता आहे. आज कार्यालयीन कामात सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. जे तुमचे विरोधक होते, तेसुद्धा आता मैत्रीचा हात पुढे करू शकतात. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात काही बदल करू शकतात; मात्र त्यांनी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे, कारण त्यामुळेच यश लवकरच मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व समस्या सुटतील.
सिंह – आजचा दिवस व्यस्ततेत जाणार आहे, त्यामुळे तुमचे आजूबाजूच्या परिस्थितीकडे फारसे लक्ष जाणार नाही. तुम्ही सर्व क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी कराल. दिलेली वचने पूर्ण करून तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. सर्जनशील कामांमध्ये पुढे जाल. पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. तुमचे बहुतेक प्रयत्न यशस्वी होतील, काही महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतील. मात्र आज तुमच्याच जवळची व्यक्ती तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकते; सावध रहा.
कन्या – आजचा दिवस फायदेशीर असेल. मात्र कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये घाई करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यातील समस्या टाळण्यास मदत होईल. आज काम सामान्य गतीने पूर्ण कराल. जर काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे; यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जोडीदाराला त्यांच्या करिअरमध्ये उत्तम यश मिळू शकते. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखा.
तुळ – तुम्हाला विविध स्रोतांकडून उत्पन्न मिळेल. प्रशासनाशी संबंधित बाबीं आणि कामे यांमध्ये सावधगिरी बाळगा. गुंतवणुकीच्या बाबींना गती मिळेल. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासून घ्या. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळू शकतो. स्पर्धात्मक क्षेत्रात त्यांना प्रगती साधता येईल. खर्च वाढू शकतो, त्यामुळे स्वतःच्या सवयींमध्ये काही बदल करण्याची गरज भासू शकते. जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.
वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आरोग्याच्या दृष्टीने तो चांगला राहील. वाढत्या खर्चामुळे समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे खर्चात काटकसर करण्याचा प्रयत्न करा. मालमत्तेचे व्यवहार घाईगडबडीत पूर्ण करणे टाळा. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रमुख नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. एका दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येचे निराकरण करण्याची योजना आज आखाल.
हेही वाचा – Homeopathy: काट्याने काटा काढणं
धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. योजनांना गती मिळेल आणि तुमची काही नवीन लोकांशी भेट होईल. तुम्ही महत्त्वाच्या कामांची यादी तयार कराल आणि ती यशस्वीपणे पूर्ण कराल. वडीलधाऱ्यांकडून भरपूर पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी दूर होतील, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी व्हाल किंवा श्रद्धा आणि भक्तीने एखादे धार्मिक कार्य पार पाडाल.
मकर – आजचा दिवस अनुकूल असेल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी, तुम्ही एक सविस्तर योजना तयार कराल आणि त्यावर तुमच्या पालकांचा सल्ला घ्याल. सरकारी बाबींमधील धोरणे आणि नियमांकडे बारकाईने लक्ष दिल्यास गोष्टी सोप्या होतील. आर्थिक बाबींमध्ये घाई करणे टाळा. तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे कार्यालयात आदर मिळेल. तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण कराल. अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा. बऱ्याच काळानंतर तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते. त्यामुळे संध्याकाळ आनंदात जाईल.
कुंभ – आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुमचा कल आज धार्मिक कार्यांकडे असेल आणि लोक तुमच्या कार्याची प्रशंसा करतील. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, ज्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. संततीच्या मनोरंजनासाठी आज त्यांना बाहेर घेऊन जाल. महिला आपल्या कामाचे नियोजन करतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही विषयावर चर्चा करताना बोलण्यात संयम ठेवावा लागेल. अन्यथा अंतिम टप्प्यात आलेली चर्चा फिस्कटण्याची शक्यता आहे.
मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येणारा ठरेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. हा दिवस तुमच्या करिअरसाठी अनुकूल असेल. एखादे काम पूर्ण झाल्याचा तुम्हाला आनंद होईल. कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. आरोग्यही उत्तम असेल. आज अनेक नवीन आणि सकारात्मक अनुभव मिळतील. सर्व कामे देखील सुरळीतपणे पूर्ण होतील.


