Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरावया मृगजळाची गंगा, डोणीलागीं धांवतां दांगा-

    November 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 22 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, November 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 नोव्हेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 नोव्हेंबर 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेNovember 22, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष : हितशत्रू सक्रिय होतील

    • या आठवड्यात साडेसातीचा त्रास संभवतो. नोकरदारांनी कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी कर्क राशीतील केतूचे भ्रमण परीक्षा घेणारे ठरेल; आपली कार्यक्षमता तपासून त्याप्रमाणेच कामाचा व्याप वाढवा. हितशत्रू सक्रिय होतील, त्यामुळे सावध राहा. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि पथ्य पाळावे. विद्यार्थ्यांवर गुरुकृपा राहील. ते बौद्धिक क्षेत्रात प्रगती करतील.

    वृषभ : कार्यपद्धतीत बदल घडण्याची शक्यता

    • या आठवड्यात विरोधकांना कमी लेखू नका. नोकरदारांनी आपल्या वरिष्ठांशी सांभाळून बोलावे आणि वागावे. त्यांच्या कार्यपद्धतीत अचानक बदल घडण्याची शक्यता आहे; त्यामुळे बदल स्वीकारणे आणि त्यानुसार काम शिकून घेणे यातच फायदा आहे. व्यावसायिकांनी गोड बोलून आपले काम करून घ्यावे. स्पर्धकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. महिलांना बाहेरगावी राहणाऱ्या मुलांकडे जाण्याचा योग आहे. काही महिला जातकांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. शैक्षणिक कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांनी वेळीच निर्णय घ्यावा, त्यांना काही प्रसंगात धैर्य राखून काम करावे लागेल.

    मिथुन : कामे वेळेवर होतील

    • या आठवड्यात बुध आणि  शुक्राचे सहकार्य मिळू शकेल. त्यामुळे हा आठवडा शुभ राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर आणि अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील. नोकरदार वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकतील. कार्यक्षेत्रातील विरोधकांवर लक्ष ठेवा. व्यवसायात स्थिरता येईल. महत्त्वाच्या चर्चा आणि भेटीगाठी होतील. यातून व्यावसायिकांना नवीन कामे मिळतील. महिला घर आणि ऑफिस यामध्ये खूप बिझी राहतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल; नवीन भाषा शिकण्याचा ते प्रयत्न करतील.

    कर्क : कामे मार्गी लागतील

    • या आठवड्यात निर्णायक लाभ होतील. नोकरदारांनी नवे तंत्र शिकून घ्यावे. आर्थिक व्यवहार लांबणीवर पडतील; त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. व्यावसायिकांनी व्यवसायाशी संबंधित निर्णय प्रलंबित ठेवू नयेत, महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जर तुम्ही परदेशांशी संबंधित काम किंवा व्यवसाय करत असाल, तर या आठवड्यात तुम्हाला विशेष यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. महिलांनी घरात आनंदी वातावरण ठेवावे आणि छोट्या कारणांनी नाराजी टाळावी. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करावा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

    सिंह : सकारात्मक वातावरण

    • या आठवड्यात वातावरण सकारात्मक राहील. नोकरदार जातक कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि इतर सहकाऱ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करू शकतील. व्यावसायिकांनी भागीदारी व्यवसायात धोरणात्मक बदल करताना दक्षता बाळगावी; कागदपत्रे वाचून, त्यातील नियम व अटी समजून घेऊन मगच सही करा. या आठवड्यात वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधीच्या वादांवर तोडगा काढला जाईल. महिलांना स्वाभिमान जपण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, जेणेकरून अभ्यासाला योग्य दिशा मिळेल.

    हेही वाचा – दक्षिण-पूर्व दिशेचा वास्तुदोष आणि उच्च रक्तदाब

    कन्या : आर्थिक उलाढालीला गती

    • या आठवड्यात आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करा. काही काळापासून असलेल्या समस्यांवर उपाय शोधण्यात या आठवड्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळेल. नोकरदारांनी नवीन आव्हाने स्वीकारावीत. काही क्षण खूप परीक्षा घेणारे असतील, मात्र त्यात तुम्ही पास व्हाल. व्यावसायिकांनी नव्या संकल्पना व्यवसायात राबविण्यास सुरुवात करावी; यामुळे आर्थिक उलाढालीला गती मिळेल. महिला प्रियजनांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा द्यावी, त्यात ते यश मिळवू शकतील.

    तुळ : प्रगतीच्या चांगल्या संधी

    • या आठवड्यात राशीस्वामी शुक्राचा कृपावर्षाव राहील. करिअर किंवा व्यवसायात प्रगती करण्याच्या चांगल्या संधी मिळतील, मात्र, आळस आणि अहंकार यामुळे त्या संधी हातून निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहा. नोकरदारांनी राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. मन शांत ठेवून आर्थिक व्यवहार मार्गी लावा. घराचे बजेट व्यवस्थित आखा. व्यावसायिकांना नव्या योजना कार्यान्वित करण्यासाठी आर्थिक साहाय्य लागेल; अशावेळी बँक मदत करेल. महिलांनी गैरसमज टाळावेत आणि आपल्या मनातील विचार स्पष्टपणे मांडावेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती व्हावी, यासाठी पुढील शिक्षणाचा आराखडा नीट आखावा.

    वृश्चिक : पैशांची चणचण जाणवेल

    • या आठवड्यात पैशांची चणचण जाणवेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला खूप महत्त्वाच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. ही भेट खूप काही शिकवून जाईल. प्रवासाचा योग आहे, यातून काही नवीन ओळखी होतील. व्यावसायिकांनी व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने आधी आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घ्यावा; भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नये. महिलांनी घराचे बजेट सांभाळून, काही पैसे साठवून ठेवावेत. विद्यार्थ्यांनी कोणाकडूनही पैसे उसने घेऊ नयेत आणि खर्च सांभाळून करावा.

    धनु : सकारात्मक बातम्यांचा काळ

    • या आठवड्यात शुक्र लाभात आहे; त्यामुळे सकारात्मक बातम्या मिळतील. तुम्ही बुद्धी आणि वाणीच्या जोरावर, अशक्य वाटणारी कामेसुद्धा मोठ्या सहजतेने पूर्ण करू शकाल. त्यामुळे नोकरदारांनी कामाचे नियोजन विचारपूर्वक करावे. आर्थिक स्थिरतेसाठी केलेली गुंतवणूक कामास येईल. व्यावसायिकांनी विरोधकांचे डावपेच सफल होऊ देऊ नयेत; त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा. महिलांनी कर्तव्य पूर्ण करावे; मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागतील. विद्यार्थ्यांसाठी मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे.

    मकर : मतलबी लोकांपासून सावध रहा

    • हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला असेल. तुमचे काम कधी सुरळीतपणे पूर्ण झाल्यासारखे वाटेल, तर कधी ते क्षुल्लक कारणावरून अडकून पडेल. त्यामुळे या आठवड्यात खूप ताण जाणवेल. हाताखालील सहकाऱ्यांना शिकवण्यात नोकरदारांचा जास्त वेळ जाईल, त्यामुळे नेहमीची कामे वेळेत पूर्ण होऊ शकणार नाहीत आणि मग चिडचिड होईल. ऑफिसकडून एखादे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी नवीन योजनांचा सखोल अभ्यास करून मगच निर्णय घ्यावा; मतलबी लोकांपासून सावध रहा. महिलांना कुटुंबातील गरजांना प्राधान्य द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवता येईल.

    कुंभ : कामे सुरळीत मार्गी लागतील

    • काही काळापासून रेंगाळत असलेल्या वैयक्तिक समस्यांवर या आठवड्यात अखेर उपाय सापडतील. संपूर्ण आठवडाभर आनंद, शांती आणि समृद्धी नांदेल. तर दुसरीकडे, घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. नोकरदारांची कामे सुरळीत मार्गी लागतील. वरिष्ठ खूश असतील, नवीन जबाबदारी मिळेल, ती नवीन आव्हान म्हणून स्वीकाराल. व्यावसायिक आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकतील; आर्थिक प्रगती होईल, जुने कर्ज फेडून टाकता येईल.  घरात ज्येष्ठ व्यक्तींना भेटायला सारखे पाहुणे येतील. महिला वर्गाला त्यांचा पाहुणचार करावा लागेल. विद्यार्थ्यांना अचानक जुने मित्र-मैत्रिणी भेटतील.

    हेही वाचा – माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    मीन : रागावर नियंत्रण ठेवा

    • या आठवड्यात साडेसातीच्या प्रभावामुळे कठीण काळाला सामोरे जावे लागेल. नोकरदारांनी राजकारण तसेच गटबाजीपासून लांब राहावे. वरिष्ठ परीक्षा बघतील; मात्र शांत राहून निर्णय घ्या, रागावर नियंत्रण ठेवा. आठवड्याच्या पूर्वार्धात तुमच्यावर एका मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्राबद्दलचा आदर वाढेल. व्यावसायिकांनी कार्यतत्परता ठेवावी; संयमाने निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर कामे दुसरीकडे जातील. महिलांना मुलांकडे लक्ष द्यावे लागेल, त्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यातून मार्ग काढावा लागेल. विद्यार्थ्यांनी बोलण्यावर ताबा ठेवावा, कोणावर टीका करू नये.

    ईमेल – prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 22 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 नोव्हेंबर 2026

    November 21, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 नोव्हेंबर 2026

    November 20, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 22 नोव्हेंबर 2026

    By Team AvaantarNovember 22, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 नोव्हेंबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 01…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 नोव्हेंबर 2026

    November 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 नोव्हेंबर 2026

    November 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 नोव्हेंबर 2026

    November 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरावया मृगजळाची गंगा, डोणीलागीं धांवतां दांगा-

    November 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 22 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026

    सगेसोयरे…

    November 21, 2026

    चातुर्मास : केवळ व्रत नव्हे, तर….

    November 21, 2026

    ऑफिसमध्ये काम करून थकलात? ताण आला?

    November 21, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरावया मृगजळाची गंगा, डोणीलागीं धांवतां दांगा-

    November 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 22 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.