दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 22 नोव्हेंबर 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 01 अग्रहायण शके 1948; तिथि : त्रयोदशी 26:37; नक्षत्र : अश्विनी 28:15;
- योग : व्यतिपात 23:29; करण : कौलव 15:51;
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:48; सूर्यास्त : 17:59;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128
प्रदोष
वैकुंठ चतुर्दशी उपवास
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी लक्ष्मीकांत झा
टीम अवांतर
अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी लक्ष्मीकांत झा यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1913 रोजी बिहारमधील दरभंगा येथे झाला. त्यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठ, ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) येथे झाले. ते जेव्हा केन्स केंब्रिजमध्ये शिकवत होते, तेव्हा त्यांनी तेथे अर्थशास्त्राचा अभ्यास केला.
LSE मध्ये झा यांना प्रख्यात शिक्षक हॅरोल्ड लास्की यांनी शिकवले. ते भारतीय नागरी सेवेच्या 1936 च्या तुकडीचे सदस्य होते. ब्रिटिशांच्या राजवटीत झा पुरवठा विभागात उपसचिव पदापर्यंत पोहोचले होते. 1946 या नवीन वर्षाच्या सन्मान सोहळ्यात त्यांच्या सेवेसाठी त्यांना MBE (Member of the Order of the British Empire) या किताबाने सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर, 1967 साली आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी उद्योग, वाणिज्य आणि वित्त मंत्रालयात सचिव म्हणून आणि भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तसेच इंदिरा गांधी यांचे सचिव म्हणून काम केले होते.
हेही वाचा – एक मॉर्निंग वॉक असाही….
आरबीआयचे गव्हर्नर म्हणून असणाऱ्या त्यांच्या कार्यकाळात, महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त 2 ऑक्टोबर 1969 रोजी ₹ 2, 5, 10 आणि 100 या मूल्यांच्या भारतीय रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. या नोटांवर त्यांची इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये स्वाक्षरी आहे. भारत सरकारची अधिकृत भाषा असलेल्या हिंदीमधील स्वाक्षरी, आरबीआयच्या त्यांच्या कार्यकाळात प्रथमच चलनी नोटांवर दिसली.
त्यांच्याच कार्यकाळात 14 प्रमुख व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयीकरण, व्यावसायिक बँकांवर सामाजिक नियंत्रणांची सुरूवात, राष्ट्रीय पत परिषदेची स्थापना आणि पतपुरवठा सुलभ करण्यासाठी लीड बँक योजनेची सुरुवात देखील झाली. इतर घडामोडींमध्ये, सोन्यावर वैधानिक नियंत्रण आणले गेले; ठेव विमा तत्त्वतः सहकारी बँकांपर्यंत वाढवण्यात आला; आणि कृषी पत मंडळाची स्थापना हाती घेण्यात आली
हेही वाचा – आठवणींची पेटी… निसर्ग अनुभवणं!
1970-73 या महत्त्वपूर्ण काळात, भारताचे पाकिस्तानशी झालेले युद्ध आणि बांगलादेशची निर्मिती झाली, तेव्हा ते अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी अमेरिकेत भारताची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली.
झा यांनी ‘मिस्टर रेड टेप’ आणि ‘इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी फॉर द एटीज्: प्रायोरिटीज फॉर द सेव्हन्थ प्लॅन’ यांसारखी प्रशासकीय आणि आर्थिक विषयांवर पुस्तके लिहिली. ते 3 जुलै 1973 ते 22 फेब्रुवारी 1981 पर्यंत जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल होते. 1980 च्या दशकात उत्तर-दक्षिण आर्थिक समस्यांवरील ब्रँड्ट आयोगाचे ते सदस्य होते. 1981 ते 1988 या काळात भारत सरकारच्या आर्थिक प्रशासन सुधारणा आयोगाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नंतर पंतप्रधान राजीव गांधी यांचे आर्थिक बाबींवरील सल्लागार म्हणूनही काम केले.
16 जानेवारी 1988 रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या वेळी, झा राज्यसभेचे सदस्य होते. 1990 मध्ये, आरबीआयने त्यांच्या स्मरणार्थ एल. के. झा मेमोरियल लेक्चर्सची सुरुवात केली.


