Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : देखतां आहे आवडें, घेऊं जाइजे तरी नातुडे

    November 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 नोव्हेंबर 2026

    November 21, 2026

    …अन् शर्वायने माफी मागितली

    November 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, November 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : देखतां आहे आवडें, घेऊं जाइजे तरी नातुडे
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : देखतां आहे आवडें, घेऊं जाइजे तरी नातुडे

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 21, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Fifteen, पंधरावा अध्याय, अध्याय पंधरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप, पुरुषोत्तम योग
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय पंधरावा

    अर्जुना ऐसेनि पाहीं । आद्यंतु ययासि नाहीं । माजीं स्थिती आभासे कांहीं । परी टवाळ तें गा ॥237॥ ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रींही कीर न रिगे । तरी माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ॥238॥ तेसा आद्यंती कीर नाहीं । आणि साचही नोहे कहीं । परि लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥239॥ नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥240॥ ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥241॥ आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां । तरी दिसणेंही क्षणा एका । होय जाय ॥242॥ स्वप्नींही मानिलें लटिकें । तरी निर्वाहो कां एकसारिखें । तेवीं आभासु हा क्षणिकें । रीतीचा गा ॥243॥ देखतां आहे आवडें । घेऊं जाइजे तरी नातुडे । जैसा टिकु कीजे माकडें । जळामाजीं ॥244॥ तरंगभंगु सांडीं पडे । विजूही न पुरे होडे । आभासासि तेणें पाडें । होणें जाणें गा ॥245॥ जैसा ग्रीष्मशेषींचा वारा । नेणिजे समोर कीं पाठीमोरा । तैसी स्थिती नाहीं तरुवरा । भवरूपा यया ॥246॥ एवं आदि ना अंत स्थिती । ना रूप ययासि आथी । आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ॥247॥ आपुलिया अज्ञानासाठीं । नव्हता थांवला किरीटी । तरी आतां आत्माज्ञानाचेनि लोटीं । खांडेनि गा ॥248॥ वांचूणि ज्ञानेवीण ऐकें । उपाय करिसी जितुके । तिहीं गुंफसि अधिकें । रुखीं इये ॥249॥ मग किती खांदोखांदीं । यया हिंडावें ऊर्ध्वीं अधीं । म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यक् ज्ञानें ॥250॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आम्हीं सांगितली जे परी, मूळडाळांची उजरी

    अर्थ

    अर्जुना, याप्रमाणे पहा की, या संसारवृक्षाला आदि व अंत नाही, मध्ये स्थितिकाली तो काही भासतो, पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे. ॥237॥ ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि (शेवटी) खरोखर समुद्रांतही मिळत नाही, तरी मध्येच जसे मिथ्या मृगजळ दिसते ॥238॥ त्याप्रमाणे अर्जुना, संसारवृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही. परंतु खोटेपणाची नवलाई अशी आहे की, तो नसून भासतो. ॥239॥ ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते, त्याप्रमाणे अज्ञान्याला हा संसारवृक्ष आहे असे भासते. ॥240॥ अशा रीतीने स्थितिकाली हा संसारवृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवतो. तो कसा तर जसा बहुरूपी हा कफनी धारण करून (सोंग आणून) लोकांना फसवतो तसा. ॥241॥ आणि नसलेलाच निळेपणा आकाशात दिसतो, तसा दिसेना का? तरी ते दिसणेही एका क्षणात होते व जाते. ॥242॥ स्वप्नांतील खोटे पदार्थ वस्तुत: नाहीत, तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी ते एकसारखे टिकतात का? तशा क्षणिक भासणार्‍या पद्धतीचा हा संसारवृक्षाचा आभास आहे. ॥243॥ पाण्यात दिसणारे आपले प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे, (तरी पण ते प्रतिबिंब त्यास सापडत नाही) त्याप्रमाणे हा संसारवृक्षाचा भास पाहिला असता, आहे असा वाटतो आणि त्यास धरावयास गेले तर (म्हणजे विचाराने त्याचे अस्तित्व पाहू गेले तर) तो सापडत नाही. ॥244॥ बा अर्जुना, लाटांचे होणे व जाणे (ह्या संसारभासाच्या होण्या-जाण्याच्या उपमेला) कमी पडते. (विजेचा उदयास्त जरी अति त्वरित असतो तरी ती वीजदेखील याच्या बरोबरीला येत नाही, तितक्या मानाने (त्वरेने) संसारभासाचे होणेजाणे आहे. ॥245॥ ज्याप्रमाणे ग्रीष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो की पाठीमागून वहातो, हे कळत नाही (त्याची स्थिती जशी एकच नसते) ज्याप्रमाणे या संसाररूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितिकाली एकच अवस्था नाही, म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होते. (म्हणजे संसाराला स्थितीही नाही). ॥246॥ याप्रमाणे संसारवृक्षाला आदि, अंत व स्थिति ही नाहीत व याला रूपही नाही. आता (असे जर आहे तर) अर्जुना, याला उपटून टाकण्यात श्रम ते काय? ॥247॥ अर्जुना, हा नसलेला संसारवृक्ष (केवळ) आपल्या अज्ञानामुळे बळावला आहे. तर आता (त्याला) आत्मज्ञानरूपी दुधारी तलवारीने नाहीसा कर. ॥248॥ नाहीतर एका ज्ञानावाचून (त्याच्या नाशाकरिता) जितके उपाय तू करशील, त्यांच्या (त्या उपायांच्या) योगाने तू या संसारवृक्षात अधिक अडकशील. ॥249॥ मग (त्या संसारवृक्षाच्या) फांद्या-फांद्यांनी खाली व वर किती फिरावे? म्हणून या संसारवृक्षाचे अज्ञानरूपी मूळच यथार्थज्ञानाने तोडून टाक. ॥250॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    November 20, 2026 अध्यात्म

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    November 19, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : आम्हीं सांगितली जे परी, मूळडाळांची उजरी

    November 19, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    By Team AvaantarNovember 20, 2026

    अध्याय पंधरावा तरी प्रबोधु जंव नोहे । तंव निद्रे काय अंतु आहे । कीं रात्री…

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    November 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आम्हीं सांगितली जे परी, मूळडाळांची उजरी

    November 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि, मनुष्यत्वचि होय आदि

    November 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : देखतां आहे आवडें, घेऊं जाइजे तरी नातुडे

    November 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 नोव्हेंबर 2026

    November 21, 2026

    …अन् शर्वायने माफी मागितली

    November 20, 2026

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026

    Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    November 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    November 20, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : देखतां आहे आवडें, घेऊं जाइजे तरी नातुडे

    November 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 नोव्हेंबर 2026

    November 21, 2026

    …अन् शर्वायने माफी मागितली

    November 20, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.