“आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं…”
ही ओळ ऐकताच अंगावर नाही रोमांच उभे राहीले तरच सांगा. विशेषतः, या गाण्याच्या दुसर्या कडव्याची सुरुवात करताना किशोरदा “लब हिले तो मोगरे के…” म्हणतात, तेव्हा त्यांच्या ‘लब हिले तो’च्या उच्चारणावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. मला वाटतं लताबाईंच्या आयुष्यातलं हे एकमेव गाणं असेल ज्यात ‘लताबाई’ असूनही मनात ‘ठसून’ राहतो, तो ‘गायका’चा म्हणजे ‘किशोरदां’चा आवाज! एकतर अवखळ, खोडकर मूडमधलं हे गीत, त्याला किशोरदांसारखा तेवढाच अवखळ आणि ताकदीचा गायक आणि गुलझारसाहेबांचे जानलेवा शब्द…. देता किती घेशील दो कराने? अशी अवस्था होऊन जाते आपली.
आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है
आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं…
हेही वाचा – ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा
असल्या भन्नाट कल्पना फक्त गुलझार यांनाच सुचू शकतात. म्हणजे बघा ना, म्हटलं तर ‘गुपित’ आहे, पण गुपितही कसं तर दरवळणारं, म्हणजे गुपित असूनही गुपित नसलेलं, असं काही तरी… गुपित असूनही आपल्या अस्तित्वाची अलगद जाणीव करून देणारं, असं काहीतरी! क्या बात है गुलझारसाहब… क्या बात हैं!
लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं
आप की आँखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं
आप की खामोशियाँ भी आप की आवाज़ हैं
प्रेयसीच्या ओठांची तुलना मोगरीच्या पाकळ्यांशी करणं, तिच्या डोळ्यांतल्या गहिर्या भावनांना सागराच्या लाटांची उपमा देणं आणि वर कळस म्हणजे “तुझं मौनदेखील बोलकं आहे…” हे सांगणं, ही सगळी गुलझार ल़क्षणं व्यक्त करण्यासाठी किशोरच हवा…
आणि ती लक्षणं सार्थ ठरवण्यासाठी समोर ‘रेखा’च हवी.
हेही वाचा – मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://whatsapp.com/channel/0029VbAtufJ65yDINAO9Ad2H
या लिंकला क्लिक करून WhatsApp Channel जॉइन करा.


