Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एक चुटपुट लावून गेलेली मैफल…

    October 25, 2026

    बचतीचे अनेक मार्ग…

    October 25, 2026

    Homeopathy : हॅनिमनला प्रश्न पडला…

    October 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, October 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » एक चुटपुट लावून गेलेली मैफल…
    फिल्मी

    एक चुटपुट लावून गेलेली मैफल…

    विशाल कुलकर्णीBy विशाल कुलकर्णीOctober 25, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, विशाल कुलकर्णी, लेखक विशाल कुलकर्णी, चुटपुट लावणारी मैफल, गाण्याची मैफल, आओगे जब तुम ओ साजना, राशिद अली खाँसाहब, राग खमाज, राग मिश्र खमाज, भैरवी, आये ना बालम, बडे गुलाम अली खाँसाहेब, ठुमरी, दादरा, केरवा
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    काही वर्षांपूर्वी एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने दिल्लीत तीन-चार दिवस मुक्कामाचा योग होता. दरवर्षी दिल्लीत हॉटेल ग्रॅंड अशोकमध्ये ही छोटीशी कॉन्फरन्स भरते. आमच्या कंपनीचा (ट्रिंबल) बुथ असतो. त्यावेळी आमच्या ओम्निस्टार सर्व्हिसेससंदर्भात मलाही एक छोटेसे प्रेझेंटेशन करायचे होते. कंपनीने राहायची सोय अशोकमध्येच केली होती. उद्घाटनाच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत प्रदर्शन स्थळीच होतो. पहिल्या दिवशी संध्याकाळी सगळ्या निमंत्रितांसाठी म्हणून अशोकमध्येच एक स्वागत भोजनाचा बेत होता. पण दिवसभर स्टॉलवर उभे राहून कंटाळलेलो असल्याने मी त्या स्वागत भोजनाच्या कार्यक्रमाला जायचे नाही, असे ठरवले होते. फारशी भूकही नव्हती, त्यामुळे रूमवरच उपलब्ध असलेली फळे खाऊन वसंतरावांना ऐकत शांत पहुडलो होतो.

    तेवढ्यात कुठून तरी कानावर बागेश्रीचे सूर ऐकू आले. क्षणभर चमकलो… कारण मी तर ‘घेई छंद ऐकत होतो’ आणि मधेच बागेश्री? मला एसीचा त्रास होतो म्हणून एसी बंद करून एका बाजूची खिडकी थोडी उघडली होती, तिकडूनच सूर येत होते. मी खिडकीत जाऊन बघितले, तेव्हा लक्षात आले की, खालच्या मजल्यावरील हॉलमधून ते सूर झिरपत होते. राहवलं नाही आणि कपडे करून तसाच खाली आलो. प्रशस्त हॉल होता. मोजक्या टेबल–खुर्च्या मांडलेल्या, लोक बसलेले. काही जण मागे उभे राहून ऐकत होते. मंचावर कुणीतरी बेभान होऊन गात होतं…

    मी तिथेच उभा राहून ऐकत राहिलो. गाणारा कोण होता, कुणास ठाऊक? पण साला नशा होता त्यांच्या आवाजात…

    “बडा उमदा गाते है ना राशिद अली खानसाहब?”

    शेजारून पृच्छा झाली आणि माझे लक्ष गेले, माझ्या मागचा बार काऊंटरवरचा माणूस विचारत होता. मी नुसतेच त्याच्याकडे पाहून हलकेच हसलो.

    “कुछ लेंगे सर?”

    “White wine should be fine!”

    हातात ग्लास आला आणि मी तिथल्याच एका टेबलाशेजारी असलेली खुर्ची पटकावून बसलो. अतिशय उमदं आणि देखणं व्यक्तिमत्व लाभलेला हा तरुण गायक… खाली अंथरलेल्या गादीवर त्यांनी बैठक लावली, साथीदारांना काही सूचना दिल्या आणि सुरांना साद घातली…

    “आओगे जब तुम ओ साजना, अंगना फूल खिलें…”

    ‘खमाज’मधलं ते गाणं साकारताना त्यांनी आलाप घेतला आणि तो क्षण जणू तिथेच थांबला… माझ्या डोक्यात टण्ण करून घंटी वाजली… ‘राशिद अली खाँसाहब’! सिनेमा थिएटरमध्ये, टीव्हीवर, मोबाइलवर हे गाणे खूप वेळा ऐकले होते. पण प्रत्यक्ष खाँसाहेबांच्या तोंडून त्यांच्या समोर बसून हे गाणे ऐकण्याचा नशा, तो मज़ा काही औरच होता!!

    हेही वाचा – जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    आओगे जब तुम ओ साजना
    अंगना फूल खिलेंगे
    बरसेगा सावन, बरसेगा सावन
    झूम झूम के॥
    दो दिल ऐसे मिलेंगे॥

    त्या सुरातून दूरदेशी गेलेल्या त्या साजणाबद्दलची ओढ तर व्यक्त होत होतीच, पण तो जवळ नाहीये, याची वेदना जास्त तीव्रतेने जाणवत होती. तू असतास तर काय झाले असते, हे सांगताना, (त्यात कुठेही नसलेले) तू नसल्याने काय झालेय, हेही तितक्याच समर्थपणे केवळ त्या सुरांमधून थेट आतपर्यंत पोहोचत होते. तू नाहीयेस तर हा श्रावण पण रुसून बसलाय, हे ठळकपणे जाणवत होते.

    नयना तेरे कजरारे है॥
    नयनो पे हम दिल हारे है॥
    अंजाने ही तेरी नैनो ने॥
    वादे किये कई सारे है॥
    साँसों की लय मद्धम चले, तोसे कहे॥
    बरसेगा सावन, बरसेगा सावन॥

    त्या सुरांमध्ये प्रियेच्या काळ्याभोर, कृष्णकमळासारख्या डोळ्यांचे कौतुक तर होतेच, पण तुझ्या डोळ्यांच्या जादूत मी माझे हृदयही हरवून बसलोय, ही लाडीक तक्रारही होती. कळत-नकळत तुझ्या डोळ्यांनी दिलेली अनेक वचने आठवताहेत… कसं असतं ना? प्रिय व्यक्तीच्या आठवणीत रमताना सगळं काही विसरायला होतं. एरव्ही व्यक्तिस्वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍या, व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या व्यक्ती सुद्धा क्षणभर आपलं अस्तित्व विसरून प्रियाच्या आठवणीत भान हरपून बसतात. कधी नव्हे ती श्वासांची गतीसुद्धा हळूवार झालेली असते, आपण आपल्याच त्या जुन्या स्मृतींमध्ये हरवत जातो आणि अचानक कानावर सूर येतात…

    चंदा को ताकूँ रातों में
    है ज़िंदगी तेरे हाथों में…

    किती सोपी पण सार्थ शब्दरचना. दुसरं काही करण्यासारखं उरलेलं नसतंच हो. रात्र जाता जात नाही, मनात तिचेच विचार. तरी बरं, कविंनी, शायरनी कायम प्रियेचे प्रतीक म्हणून गौरवलेला चंद्रमा आकाशात मंदपणे तेवत असतो. त्याच्याकडे कुठल्यातरी एका अनावर ओढीने पाहात असताना जाणीव होते की, आता करण्यासारखं आपल्या हातात काहीच उरलेलं नाही. आपलं सर्वस्व आपण कधीच तिच्या डोळ्यांमध्ये हरवून बसलोय. जणूकाही आपलं सगळं आयुष्यच तिच्या हवाली केलं असावं… आपल्याही नकळत आपलं मन आतुरतेने तिला साद घालायला लागतं…

    पलकों पे झिलमिल तारे हैं
    आना भरी बरसातों में
    सपनों का जहाँ होगा खिला-खिला
    बरसेगा सावन
    बरसेगा सावन झूम-झूम के
    दो दिल ऐसे मिलेंगे
    आओगे जब तुम ओ साजना

    खाँसाहेब गात होते. मस्त समा सजला होता. लोकांच्या हातातले ग्लास अजून तसेच होते. माझ्या ग्लासमधली वाइनही…! शेजारी बसलेले एक सद्गृहस्थ अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. योग्य त्या जागी मनापासून दादही देत होते. मला राहवेना, गाणे संपेपर्यंत मी वाट पाहिली आणि त्यानंतर शेजार्‍याला विचारलेच…

    “गुस्ताखी माफ, सरजी, लेकिन आप क्लासिकल संगीत के जानकार लगते है, बुरा ना मानें तो एक बात पुंछू?  ये ‘राग खमाज’ ही है ना, बतायेंगे जरा?”

    तशी ती व्यक्ती हसली. ते बहुदा राजस्थानी होते.

    “बेटे, राग तो पक्के तौर पर मैं भी नहीं बता सकता, पर ये गीत बहुत ही सुंदर है और खमाज राग परही आधारित लगता है. क्योंकि आरोह मे ‘रे’ वर्जित कर हम सीधे ‘ग’ लेते हैं, अवरोह में तार ‘रे’ ले रहे हैं, सा ग म प ध, ग म ग और कोमल नी का प्रयोग हैं | ये सभी लक्षण खमाज के हैं. इस राग का फिल्मी संगीत मे बहुत उपयोग होता है, क्योंकि स्वर मिला कर इसे मिश्र खमाज भी कह देते हैं. ये चंचल प्रकृति का राग हैं.”

    मला ‘खमाज’ माहीत होता पण खमाजची ही लक्षणं, हे बारकावे मात्र ठाऊक नव्हते. मी कौतुकाने आणि आदराने मान तुकवली.

    “शुक्रिया सरजी…” म्हणत मी त्या व्यक्तीला माझी ओळख करून दिली, माझे बिझनेस कार्ड दिले. तशी त्यांनीशी त्यांची ओळख करून दिली. ते सदगृहस्थ भारतीय लष्करामध्ये कर्नलच्या पदावर कार्यरत होते. कर्नल रूपसिंग राणावत, त्यावेळी काश्मीर प्रांतात पोस्टिंगवर होते. तेवढ्यात कुणीतरी माझ्या पाठीवर थाप मारली…

    “हाय फिशाल…”

    मी मागे वळून बघितले तर ‘वोल्कर’ होता. ‘वोल्कर वॅगेनेर’ आमचा भारतासाठीचा कंट्री मॅनेजर. ‘वोल्कर’ हॉलंडमध्ये असतो. मग थोडा वेळ त्याच्याबरोबर गप्पा रंगल्या. आता वाइनचे ग्लास पटापट संपायला लागले होते. त्यांच्याबरोबर हातातला ग्लास सांभाळत बाहेर पडलो. बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये फेर्‍या मारत आमची चर्चा सुरू झाली. साधारण अर्ध्या पाऊण तासानंतर वोल्करच्या हातातल्या ग्लास संपला आणि…

    “ओके फिशाल, सी यू टुमारो मॉर्निंग अ‍ॅट द बुथ!” म्हणून स्वारी निघून गेली.

    मी त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघून फक्त बोटे मोडायचीच काय ती बाकी ठेवली होती. माझी एक अप्रतिम मैफल अनुभवण्याची संधी वाया घालवली होती नालायकानं. मी तसाच घाईघाईत हॉलकडे परतलो आणि माझे टेबल गाठले, सुदैवाने माझी खुर्ची रिकामीच होती. कर्नलसाहेब तल्लीन होऊन ऐकत होते. मला बघताच हसून म्हणाले…

    “अरे, आप कहा चले गये थे बेटे, बहुत कुछ मिस कर दिया आपने…”

    “क्या करें सर, वो मेरे बॉस थे, उन्हें कुछ बात करनी थी, ना नहीं कर पाया. क्या क्या गाया राशिद अली खाँ साहबने?”

    “जो गया वो भूल जाओ, अब बैठकर सुनो. आखरी गीत याने ‘भैरवी’ गा रहे हैं  खाँ साहब!”

    मी सरसावून बसलो… खाँ साहेबांनी सूर लावला…

    “का करू सजनी, आये ना बालम!”

    मैफल हातातून की, कानातून गेली होती… पण निदान भैरवीला तरी पोहोचलो याचे समाधान लाभले. उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांच्या सर्वात प्रिय आणि लोकप्रिय ठुमरीने मैफलीची सांगता होत होती. राशिद अली खाँसाहब खूप उत्कटतेने ‘सिंध भैरवी’ रागातली ही ठुमरी आळवत होते. पण मज़ा येत नव्हता…

    माझ्या कानात, शेकडो वेळा ऐकलेले ‘बडे गुलाम अली खाँसाहेबांचेच’ सूर रेंगाळत होते. डोळ्यांसमोर तीच खाँसाहेबांची भारदस्त, पण तरीही अतिशय साधी मूर्ती उभी राहिली होती. खाँसाहेबांचा तो धीर गंभीर, मोक्षानंदी टाळी लावणारा आवाज…

    आये ना बालम
    का करू सजनी, आये ना बालम
    तड़पत बीती मोरी, उन बिन रतियाँ,
    आये ना बालम
    रोवत रोवत कल नाहीं आवे
    निस दिन मोहे बिरहा सतावे
    याद आवत जब उनकी बतियाँ…

    ‘आये ना बालम’ म्हणताना ज्या पद्धतीने बडे मिया ‘आये’वर जोर देतात. ती त्यांची उच्चारणाची पद्धत मला नेहमीच वेड लावत आलेली आहे. पटियाला घराण्याची ही खास चीज ऐकावी तर बडे गुलाम अली खाँसाहेबांच्याच आवाजात. मागे कधीतरी त्यांच्या शिष्या ‘कनिका मित्रा’ यांच्या आवाजातही ऐकली होती. ती पण तेवढीच खास जमलेली. पण त्यानंतर कुणाच्या तोंडी ‘आये ना बालम’ म्हणताना तो दर्द, ती नशा, ती कसक कधी जाणवलीच नाही. शब्द, स्वर सगळ्यालाच कसा तो खाँसाहेबांचा दैवी स्पर्श लाभलेला. त्यामुळे इतर कुणाच्या तोंडून ती ऐकताना ‘तो मज़ा’ नाही येत अनुभवाला. ती विरहाची अतीव वेदना नाही प्रत्ययाला येत.

    हेही वाचा – नूतन… मौनाचा संवाद!

    विरहाची वेदना अधिक उत्कट, अधिक तीव्र करणारा सिंधू भैरवीतला तो सुप्रसिद्ध दादरा म्हणजे ‘आये ना बालम’! नुसता कल्पनेने देखील सर्वांगावर शहारा उभा राहावा असे ते सूर…

    तड़पत बीती मोरी, उन बिन रतियाँ…

    एका एका अक्षराच्या, शब्दांच्या उच्चाराला, उचलण्याला, स्वरांच्या हेलकाव्यांना, उस्तादजींच्या आलापांना, आणि दोन आलापांच्या मधल्या शांततेला, मुरक्यांना, झटक्यांना, तानांना झालेल्या खाँसाहेबांच्या गंधर्वीय स्पर्शाचं सामर्थ्य ही ठुमरी ऐकताना पदोपदी जाणवत राहतं. सुरुवातीला मी थोडा गोंधळलो होतो, अगदी सुरुवातीला हे गाणं ऐकलं तेव्हा. हा नक्की दादराच आहे की, केरवा (केहरवा)? पण मधे मायबोलीवरील एक लेखिका दाद यांच्या याच गाण्यावरील एका लेखात अवचितपणे या प्रश्नाचे उत्तर मिळून गेले.

    मायबोलीकर दाद म्हणतात –

    “मुळात याला ‘दादरा’ म्हणायचं की नाही, हा प्रश्नच आहे. ‘दादरा’ ही गायनप्रकार दादरा तालात (सहा मात्रा) किंवा दादर्‍याच्या ठेक्यात म्हटला जातो. माझ्या ऐकण्यात ही ठुमरी केहरव्यात किंवा केहरव्याच्या ठेक्यातच (आठ मात्रा) आहे. पण त्यांनी आवर्जून हा दादरा असल्याचं सांगितलं… अन् तरीही केहरव्याच्या तालात म्हटली. मुळात भैरवी जरी मैफलीला पूर्णविराम देण्यासाठी गायली जाण्याची रीत असली तरी, ज्या पद्धतीनं गावं तशा भावनेचं अवगुंठन घेऊन, हा राग उभा रहातो. म्हटलं तर भक्तिरस, म्हटलं तर शृंगार किंवा या दादर्‍यात साकारलेली अतीव विरहाची वेदना.”

    राशिद अली खाँसाहेबांची भैरवी ऐकत असताना मायबोलीवर झालेल्या या सगळ्या चर्चेची वारंवार आठवण होत होती. न राहवून मन समोर सुरू असलेल्या गायकीची बडे गुलाम अली खाँसाहेबांच्या गायकीशी तुलना करायला लागलं आणि…

    मी मैफल तिथेच सोडून तडक रूमवर निघून आलो. चुकीचं होतं की बरोबर, माहीत नाही. पण ती मैफल, ती भैरवी अर्धवट सोडून आल्याची चुटपुट कायमची मनाला लागून राहिलीय, हे मात्र खरं…

    Avatar photo
    विशाल कुलकर्णी

    विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

    Related Posts

    तारिणी सीरियल अन् मी!

    October 19, 2026 फिल्मी

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026 फिल्मी

    अभिनय अन् नृत्याचा सूर्य अस्ताला गेला…

    October 13, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    तारिणी सीरियल अन् मी!

    By हर्षा गुप्तेOctober 19, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आजचा विषय माझी आठवण किंवा अनुभव…

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    अभिनय अन् नृत्याचा सूर्य अस्ताला गेला…

    October 13, 2026

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एक चुटपुट लावून गेलेली मैफल…

    October 25, 2026

    बचतीचे अनेक मार्ग…

    October 25, 2026

    Homeopathy : हॅनिमनला प्रश्न पडला…

    October 25, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 25 ते 31 ऑक्टोबर 2026

    October 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : रात्रि तैसें पाहलें, हें धारणा जेवीं एक जालें

    October 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 25 ऑक्टोबर 2026

    October 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 482
    • अवांतर 217
    • आरोग्य 164
    • पंचांग आणि भविष्य 646
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 33
    • ललित 1015
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एक चुटपुट लावून गेलेली मैफल…

    October 25, 2026

    बचतीचे अनेक मार्ग…

    October 25, 2026

    Homeopathy : हॅनिमनला प्रश्न पडला…

    October 25, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.