मेष : रागावर नियंत्रण ठेवा
- या आठवड्यात ग्रहांची उत्तम साथ मिळेल. नोकरदारांचा राशी स्वामी मंगळ, नीच राशीत आहे, म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. शाब्दिक वाद घालू नका. सामंजस्याने प्रश्न सोडवा. वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या. व्यावसायिकाच्या कुटुंबात मंगल कार्य ठरेल. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महिलांना खरी मैत्री आणि संधीसाधू लोक यांच्यातला फरक समजेल. विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाग्रता वाढवावी लागेल.
वृषभ : कामे पूर्ण करून घ्या
- या आठवड्यात गुरू-मंगळ युती पराक्रम स्थानी असल्याने अडकलेली कामे पूर्ण करून घ्या. कामाच्या ठिकाणी नोकरदार जातकांवर कामाची जास्तीची जबाबदारी पडेल. त्यामुळे घर आणि नोकरी यात समन्वय साधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. व्यावसायिकांच्या हितशत्रूंचा त्रास वाढेल. म्हणून आपल्या स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवा. उत्पादनाची जोरदार जाहिरात करावी लागेल. घरातील विवाहयोग्य मुलामुलींची लग्न ठरतील. त्यामुळे महिला वर्गाची धावपळ वाढेल. मात्र या गडबडीत संतुलित आहाराकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य व्यक्तींची साथ मिळेल. ज्यामुळे ते आपली अडकलेली कामे पूर्ण करू शकतील.
मिथुन : आर्थिक स्थिती उत्तम
- या आठवड्यात धन स्थानात गुरू असल्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. नोकरदारांनी वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. संभाषणचातुर्यामुळे नवीन प्रोजेक्ट मिळवाल. कोणी विचारले नसताना आपले मत देऊ नका. व्यावसायिकांची व्यवसायात प्रगती होईल. मात्र मोठी गुंतवणूक करताना कागदपत्रे तपासून घ्या. व्यवसायाच्या जागेत बदल संभवतो. महिलांनी प्रवासात पाकीट तसेच कागदपत्रे सांभाळावीत. विद्यार्थ्यांच्या संदर्भात भावंडांमध्ये मतभेद आणि दुरावा निर्माण येईल.
कर्क : व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल
- या आठवड्यात गुरू-मंगळ कर्क राशीत आहेत. नोकरदारांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडेल. त्यामुळे त्यांची उमेद वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या ते आत्मविश्वासाने पूर्ण करू शकतील. व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. काही गोष्टी अनुभव आणि अपयशातून शिकायला मिळतील. महिलांना अचानक धनलाभ होईल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
सिंह : अनावश्यक खर्च टाळा
- हा आठवडा संमिश्र घटनांचा आहे. गुरू-मंगळ व्यय स्थानी असल्यामुळे अचानक खर्च वाढेल. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. नोकरदारांना कामानिमित्त परदेश प्रवास घडण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे इतरांवर सोपवण्यापेक्षा स्वतःच करा. व्यावसायिकांनी दुःखी आणि कडू आठवणी मागे सोडून पुढे जाणे इष्ट ठरेल. कष्ट आणि मेहनत करून व्यवसाय कसा वाढवता येईल, यासाठी प्रयत्न करा. महिलांच्या बाबतीत वैवाहिक आयुष्यात वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी मित्रांवर अवलंबून राहू नये; फसवणूक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करणारे वास्तुदोष आणि त्यावरील उपाय
कन्या : इच्छा पूर्ण होतील
- या आठवड्यात गुरू-मंगळ लाभ स्थानी आहेत. त्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतील. नोकरदारांची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. अवघड कामे पटापट हातावेगळी करू शकाल. व्यावसायिकांनी आर्थिक गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घ्यावी. त्यांचे अडकलेले पैसे वसूल होतील. ज्यामुळे नवीन काम हातात घेऊ शकाल. महिला धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतील. मैत्रिणींबरोबर छान वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे. सगळी कागदपत्रे बरोबर ठेवावीत.
तुळ : कामाचा ताण वाढेल
- राशी स्वामी शुक्र नीच राशीत असून 27 तारखेला उदय होत आहे. या काळात नोकरदारांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. कामाचा ताण वाढेल. नवीन जबाबदारी मिळेल, त्यासोबत नवीन काम शिकायला मिळेल. मात्र भावनेच्या आहारी जाऊ नका, डोळसपणे विचार करा आणि मगच निर्णय घ्या. व्यावसायिकांनी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. नवीन संकल्पना राबवू शकाल. वाहनाची खरेदी-विक्री होऊ शकते. महिलांनी व्यायाम तसेच चालण्याचा रोज सराव करावा. घरचा साधा, सात्विक आहार घ्यावा. विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया आणि गेम्स यांच्यापासून लांब राहावे. मित्रांशी देखील काही प्रमाणात अंतर वाढेल.
वृश्चिक : भाग्याची उत्तम साथ
- राशी स्वामी मंगळ गुरूबरोबर आहे. भाग्याची उत्तम साथ मिळेल. नोकरदारांचा शनी पंचमात असल्यामुळे संततीविषयी काळजी वाढेल. घरातील मुले शिक्षणासाठी लांब जाऊ शकतात, त्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल. कामे सुरळीतपणे मार्गी लागतील. व्यावसायिकांमध्ये आध्यात्मिक गोडी वाढेल. गुरूंचे मार्गदर्शन मिळेल. त्याच त्याच कामाचा कंटाळा आला असेल तर, नवीन गोष्टी शिका. महिला मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाऊ शकतील. मेहनतीशिवाय यश मिळत नाही, ही गोष्ट विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावी.
धनु : मतभेद होण्याची शक्यता
- गुरू-मंगळ अष्टमात एकत्र आहेत. काही चांगल्या, तर काही वाईट गोष्टी अचानक घडतील. नोकरदारांचे सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र कामात सहजता असेल. वरिष्ठ खूश असतील. दुसरीकडे आईच्या प्रकृतीची काळजी वाटेल. व्यावसायिकांवरील कामाचा ताण वाढेल. त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्या, वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप नक्की घ्या. पैसा मिळेल तसा लगेच खर्च होईल, तेव्हा आर्थिक नियोजन करा. घरातील मदतनीस कामाच्या वेळी रजा घेईल, ज्यामुळे महिलांची चिडचिड होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण कराल.
मकर : अवलंबून राहू नका
- हा आठवडा आनंदी आणि प्रसन्न जाणार आहे. नोकरदारांना कामाचा ताण असला तरी, कामाच्या ठिकाणी छान आनंदी वातावरण असल्यामुळे कामे पटापट होतील. कामाच्या ठिकाणी छोट्या पार्ट्या होतील. व्यावसायिकांनी अनावश्यक खर्चाला आळा घालावा. व्यसनांपासून लांब राहावे. ग्राहकांना खोटी आश्वासने देऊ नका. महत्त्वाचे काम स्वतः करा, कोणावरही अवलंबून राहू नका. महिलांची प्रॉपर्टीविषयक कामे मार्गी लागतील. भावंडांशी वैचारिक मतभेद होतील. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून सावध राहावे. इतरांचे सामान स्वतःकडे ठेवून घेऊ नका.
कुंभ : संमिश्र घटनांचा काळ
- हा आठवडा संमिश्र घटनांचा काळ आहे. नोकरदारांना कामाची नवीन जबाबदारी मिळेल. सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. गुरू-मंगळ एकत्र असल्यामुळे जुने आजार परत उद्भवतील, त्यामुळे काळजी घ्या. व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. उगाच स्वप्नात रंगू नका. सत्य आणि खऱ्या परिस्थितीची जाणीव ठेवून पुढील नियोजन करा. महिलांना मानसिक त्रास जाणवेल. योगा आणि मेडिटेशन करा. विद्यार्थ्यांना एका महिन्यासाठी छोटी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ते काम करा, अनुभव घ्या.
हेही वाचा– अकल्पित अद्भुत अष्टम भाव
मीन : वेळीच कामे पूर्ण करा
- राशी स्वामी गुरू-मंगळ एकत्र कर्क राशीत आहेत. नोकरदारांना कामाचा कंटाळा येईल. त्याच त्याच रुटीनमुळे कामातील आळस वाढेल, पण त्यामुळे नंतर कामाचा लोड वाढेल, म्हणून वेळच्या वेळी कामे पूर्ण करा. व्यावसायिकांचा सणाच्या दिवसात व्यापार वाढेल; या पार्श्वभूमीवर नवीन गोष्टींचा उपयोग करून व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करा. महिलांनी आळस करू नये. नियमित व्यायाम करा. घर स्वच्छ राहील, याची काळजी घ्या. सकारात्मक विचार करा. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. एखादी कला शिकण्याची संधी मिळेल.
ईमेल – prajaktakathe3970@gmail.com


