Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 ऑक्टोबर 2026

    October 16, 2026

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 ऑक्टोबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 ऑक्टोबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 16, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 16 ऑक्टोबर 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 24 आश्विन शके 1948; तिथि : षष्ठी 29:49; नक्षत्र : ज्येष्ठा 06:47;
    • योग : शोभन 22:04; करण : कौलव 16:37;
    • सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक 06:47; सूर्योदय : 06:32; सूर्यास्त : 18:16;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    सरस्वती आवाहन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    ओगले ग्लास वर्कचे संस्थापक गुरुनाथ ओगले

    टीम अवांतर

    भारतातील औद्योगिकीकरणास हातभार लावणारे प्रसिद्ध कारखानदार आणि  ओगलेवाडी येथील ‘ओगले ग्‍लास वर्क्स’ चे एक संस्थापक गुरुनाथ ओगले यांचा जन्म 1887 मध्ये बावडा (कोल्हापूर) येथे झाला. त्यांच्या जन्म तारखेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथे तर पुढील शिक्षण मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्‍निकल इन्स्टिट्यूटमध्ये झाले. या संस्थेमधून 1908 मध्ये त्यांनी एल्एम्ईचा अभ्यासक्रम पहिल्या क्रमांकाने पूर्ण केला.

    नंतर ते बार्शी येथील ‘लक्ष्मी टेक्‍निकल इन्स्टिट्यूट’ मध्ये काही काळ मुख्य अध्यापक म्हणून कार्यरत होते. गुरुनाथ ओगले हे लोकमान्य टिळकांचे मोठे भक्त होते आणि त्यांनी दिलेल्या ‘स्वदेशी’च्या हाकेला प्रतिसाद देत त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठे योगदान दिले. अर्थात त्याआधी स्वतःच्या व्यवसायात आलेल्या अपयशानंतर गुरुनाथ यांनी किर्लोस्कर बंधूंच्या कारखान्यात अभियंत्याची नोकरी स्वीकारली होती.

    हेही वाचा – स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    काही काळाने ओगलेवाडी येथील आपल्या भावाच्या काच कारखान्यात ते काम करू लागले. त्यांचा एकूण अनुभव लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना काच उत्पादनच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन परदेशी पाठविले.

    1920-21 या काळात इंग्लंड येथील शेफील्ड येथील अभ्यासक्रम पूर्ण करून ते अमेरिकेस गेले. अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठात काच निर्मितीच्या तंत्राचा अभ्यास करून 1922 साली ते भारतात परतले. 1924 साली  कंदील निर्मितीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री खरेदी करण्याकरिता ते जर्मनीला गेले. भारतात परतल्यावर 1925-26 पासून प्रसिद्ध प्रभाकर कंदिलांचे उत्पादन त्यांनी सुरू केले. प्रभाकर हे त्यांच्या वडिलांचे नाव. आयुष्यभर खस्ता खाऊन वडिलांनी आपल्याला‌ मोठे केले याची कृतज्ञता म्हणून या कंदिलाला वडिलांचे नाव देण्यात आले. हा कंदील ग्रामीण तसेच शहरी भागात अत्यंत लोकप्रिय ठरला आणि पुढे 1962 च्या भारत-चीन युद्धात रात्रीच्या अंधारात सैनिकांसाठी मोठा आधार ठरला होता.

    कंदीलांसोबतच सायकली तसेच विजेचे पंखे यांच्या उत्पादनाच्या योजनाही गुरुनाथ यांनी आखल्या होत्या; मात्र काही कारणांनी त्यांना मूर्त रूप मिळाले नाही. पूर्वीचे त्रावणकोर (केरळ) व श्रीलंका येथील सरकारांशी काच कारखाने सुरू करण्याबद्दल त्यांनी वाटाघाटी करून प्रत्यक्ष कारखान्यांची उभारणी देखील केली. ते वर्ष होते 1942-43 चे. मात्र या सगळ्यात प्रभाकर कंदिलांची निर्मिती ही गुरुनाथ यांची सर्वांत महत्त्वाची कामगिरी समजली जाते. प्रभाकर कंदील लवकरच जगप्रसिद्ध झाला.

    ओगलेवाडीच्या कारखान्यात विविध प्रकारचा काचमाल, एनॅमलवेअर, प्रभाकर कंदील आणि स्टोव्ह, विजेच्या मोटरी तसेच पंप यांचे उत्पादन होते. सध्या तिथे सुमारे 2 हजार कामगार काम करतात. पुण्याजवळील पिंपरी येथे मूळ ओगलेवाडी कारखान्याची शाखा असून तेथे स्वयंचलित दाबयंत्रावर काचेचे प्याले, टंबलर आणि बरण्या यांचे उत्पादन केले जाते. या कारखान्यात 250 कामगार आहेत.

    गुरुनाथ यांनी एडिसनचे चरित्र आणि अमेरिका ही दोन पुस्तके तर लिहिलीच शिवाय किर्लोस्कर मासिकातून विविध प्रकारचे लेखन देखील केले. 16 ऑक्टोबर 1944 रोजी वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज मन थोडे विचलित असेल, त्यामुळे कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. कामाचा वेगही संथ असेल, ज्यामुळे दबावाखाली काम करत असल्याचे तुम्हाला वाटेल. वडिलांशी हलकासा वाद होण्याची शक्यता आहे, परंतु त्यांचा दृष्टिकोन समजून घेतल्यास आणि त्याचा आदर केल्यास परिस्थिती लवकरच निवळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मिळालेला सल्ला खूप उपयुक्त ठरू शकतो. आज व्यवसायात काही मोठे बदल करण्याचा विचारही कराल. त्यासाठी योग्य दिशेने उचललेले पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

    वृषभ – आजचा दिवस थोडा आव्हानात्मक रीतीने सुरू होण्याची शक्यता आहे. आज खूप मेहनत कराल, त्याचवेळी तुमच्या आजूबाजूचे काही लोक तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत, इतरांच्या संभाषणात अडकण्याऐवजी आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे उत्तम आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर पूर्णपणे लक्ष एकाग्र करण्याची गरज आहे, कारण येणाऱ्या काळात कठोर परिश्रमाची गरज आहे. आज नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल आणि यापैकी काही ओळखी भविष्यात खूप उपयुक्त ठरू शकतात.

    मिथुन – आज आर्थिक परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असू शकते. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दीर्घकाळापासूनची चिंता कमी होईल. स्वतःच्या संभाषणात काही प्रमाणात संयम ठेवा, कारण तुमच्या बोलण्यातील नको इतका स्पष्टपणा समोरच्या व्यक्तीला नाराज करू शकतो. नवीन लोकांशी तुमचा संपर्क वाढेल आणि हे संबंध भविष्यात तुमच्यासाठी संधी घेऊन येऊ शकतात. तुम्ही घेतलेला एखादा निर्णय कुटुंबासाठी किंवा करिअरसाठी चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती कामासाठी परदेशात जाऊ शकते. काहीतरी नवीन सुरू करण्याची कल्पनाही तुमच्या मनात दृढ होईल.

    कर्क – आज काही परिस्थितींमुळे तुमचा गोंधळ उडू शकतो, त्यामुळे प्रत्येक निर्णयाचा काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे. संततीच्या संगतीकडे आणि त्याच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष द्या. महत्त्वाच्या कामांसाठी इतरांवर जास्त अवलंबून राहणे आज महागात पडू शकते. सामाजिक किंवा कौटुंबिक बाबींमधील लहानसा निष्काळजीपणासुद्धा अडचणी निर्माण करू शकतो. मालमत्ता किंवा वाटणीच्या बाबतीत आपले विचार काळजीपूर्वक व्यक्त करा. घाईघाईत केलेली टिपण्णी वाद वाढवू शकते.

    सिंह – आज तुमचा आत्मविश्वास टिकून राहील आणि तुमच्या मेहनतीला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे. हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी उत्साही राहाल. संततीच्या भविष्याबाबत महत्त्वाची पावले उचलू शकता. कुटुंबातील प्रलंबित आर्थिक बाबीही आज पूर्ण होऊ शकतात. जोडीदाराला दिलेली वचने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा; यामुळे नात्यातील विश्वास आणि गोडवा दोन्ही वाढेल. शक्य असेल तर पैसे उधार घेणे टाळा. गुंतवणूक किंवा शेअर बाजाराशी संबंधित बाबींमधील तुमच्या दूरदृष्टीमुळे नफा होऊ शकतो.

    कन्या – आज, तुमची संवादशैली आणि वागणूक लोकांना प्रभावित करेल, ज्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर वाढू शकतो. मात्र अनावश्यक काळजी तुमच्या मनाची शांती भंग करू शकते, म्हणून छोट्या-छोट्या गोष्टींचा जास्त विचार करणे टाळा. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच पुढे जाणे एक चांगली कल्पना असू शकते. भूतकाळातील चुकांमधून शिकल्याने तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दबाव आणि मानसिक तणावातून हळूहळू दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

    तुळ – आज, काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. याशिवाय एखाद्या नवीन प्रकल्पावर काम सुरू करण्याचा विचार कराल. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्येही पुढे जाण्याचा विचार करू शकता, परंतु निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा केल्याची खात्री करा. संततीच्या करिअरबद्दलची चिंता हळूहळू कमी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वैयक्तिक किंवा महत्त्वाच्या गोष्टी सांगणे टाळा. प्रभावशाली किंवा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटल्याने नवीन संधींची दारे उघडू शकतात. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध रहा. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा.

    वृश्चिक – आज जबाबदाऱ्या अधिक असतील आणि अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. केलेल्या कृतीचे किंवा घेतलेल्या निर्णयांचे तात्काळ परिणाम न दिसल्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते. अशा वेळी संयम बाळगणे आवश्यक आहे. प्रार्थना आणि आध्यात्मिक कार्यात गुंतल्याने मनाला शांती मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचा मूड हलका होईल. भूतकाळातील चुकांवर विचार करत बसण्याऐवजी, त्यातून शिका आणि पुढे जा. तुम्हाला भावंडांकडून पाठिंबा मिळेल आणि  वडिलांचा एखादा सल्ला खूप उपयुक्त ठरू शकतो.

    हेही वाचा – दरवाजा ढकलायचा की, ओढायचा?

    धनु – आज कोणत्याही महत्त्वाच्या कामात घाई न करणेच उत्तम ठरेल. मालमत्तेसंबंधी एखादे प्रकरण अचानक तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते आणि त्याच्याशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये, कारण हा कठोर परिश्रमाचा काळ आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित दिनचर्या पाळा. लहान मुले एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करू शकतात. मात्र वाजवी हट्ट पुरविणे योग्य ठरेल.

    मकर – आज काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी चांगला दिवस असू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि घरात सहकार्याचे वातावरण राहील. समाजातील तुमची वाढती ओळख पाहून काहीजण तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. राजकारण किंवा समाजकार्यात सक्रिय असलेल्यांनी आपल्या सभोवतालच्या लोकांबाबत आणि परिस्थितीबाबत सावधगिरी बाळगावी. दुसऱ्याचे वाहन चालवणे टाळा, कारण एका लहान चुकीमुळेही कायदेशीर अडचण येऊ शकते. नोकरी किंवा करिअरशी संबंधित कोणत्याही कामासाठी प्रवास करावा लागेल.

    कुंभ – आज उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. केवळ दिखाव्यासाठी किंवा छंदांसाठी अवाजवी खर्च करणे टाळा, कारण यामुळे तुमचे बजेट नंतर बिघडू शकते. कोणतीही गोष्ट घाईने केल्यास नुकसान होऊ शकते, म्हणून निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ थांबा. विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा निकालांबाबत चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोणतेही वचन देण्यापूर्वी, आपल्या परिस्थितीचे काळजीपूर्वक मूल्यांकन करा, जेणेकरून नंतर ती वचने पूर्ण करताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत.

    मीन – आज स्वतःच्या आरोग्यात काही चढ-उतार जाणवू शकतात. याशिवाय तुमचे मन एखाद्या गोष्टीमुळे अस्वस्थ होऊ शकते. जुनी कर्जे फेडण्यासाठी तुमच्यावर दबाव येऊ शकतो. घरातील एखाद्या शुभ कार्याच्या तयारीमुळे आनंद आणि उत्साह वाढेल. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या नात्यात नवीनता आणि जवळीकता दोन्ही निर्माण होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना अधिक मेहनत करण्याची गरज आहे. येत्या काळात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑक्टोबर 2026

    October 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑक्टोबर 2026

    October 14, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑक्टोबर 2026

    By Team AvaantarOctober 15, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 ऑक्टोबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 23…

    वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    October 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑक्टोबर 2026

    October 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑक्टोबर 2026

    October 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 ऑक्टोबर 2026

    October 16, 2026

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026

    दरवाजा ढकलायचा की, ओढायचा?

    October 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नगरेंचि रचावीं, जळाशयें निर्मावीं

    October 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 471
    • अवांतर 217
    • आरोग्य 159
    • पंचांग आणि भविष्य 631
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 259
    • मैत्रीण 32
    • ललित 994
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 ऑक्टोबर 2026

    October 16, 2026

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.