मेष
- या आठवड्यात वास्तुविषयक समस्या सुटतील. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणचे वातावरण अनुकूल असेल. मात्र, त्याचबरोबर जास्त काम अंगावर पडेल. तुमच्या कामगिरीवर वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढून नफ्यात वाढ होईल. घरासाठी खर्च कराल. ऑफिससाठी नवीन जागा घेऊ शकाल. घरामध्ये सुशोभीकरण करण्यात महिला पुढाकार घेतील. विद्यार्थ्यांना कामामध्ये भावंडांची मदत होईल.
वृषभ
- या आठवड्यात तुमचा राशीस्वामी ग्रह शुक्र तुळ राशीत आला आहे. नोकरदारांचे वरिष्ठांबरोबरचे संबंध ताणले जाऊ शकतात. त्यामुळे सांभाळून बोला आणि वागा. दुसरीकडे, संततीचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक वर्गाची धंद्यात प्रगती होईल. वादग्रस्त वसुली होईल. नवीन संकल्पना राबवू शकाल. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. महिला घरात एखादा धार्मिक कार्यक्रम ठरवू शकतील, त्यातून आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकेल. शिक्षणही आवडीच्या क्षेत्रात घेऊ शकाल.
मिथुन
- तुमचा राशीस्वामी बुध या आठवड्यात स्वतःच्या कन्या राशीत येत आहे. नोकरदारांच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील. आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. प्रमोशन, पगारवाढ होऊ शकते. व्यावसायिक वर्गाकडून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण केली जाऊ शकतात. स्थावर मालमत्तेविषयीचे प्रश्न सुटतील. महिलांचे आर्थिक प्रश्न सुटतील; मनाप्रमाणे खर्च करू शकाल. विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळावी. स्वतःचे वाहन कुणाला चालवायला देऊ नका.
कर्क
- या आठवड्यात मेहनत करून यश खेचून आणू शकाल. नोकरदारांनी वरिष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकारी आणि इतर स्टाफशी बोलून, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर काम करा. प्रकृतीची काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाकडून उत्पन्नाचा नवीन मार्ग शोधून काढला जाऊ शकतो. कुटुंबात प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. अशावेळी कुटुंबाला प्राधान्य द्या. महिलांच्या बाबतीत घरात छोट्या कुरबुरी होण्याची शक्यता आहे; माहेरी जायला मिळेल. विद्यार्थ्यांनी वाहने जपून वापरावीत, वेगावर नियंत्रण ठेवावे.
सिंह
- राशीस्वामी सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीत आहे. नोकरदारांना कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य होईल. त्याचबरोबर अपेक्षाभंग होण्याचीही शक्यता आहे, मात्र त्याचा जास्त विचार करू नका. व्यावसायिक वर्गाला स्वतःच्या जागेत व्यवसाय सुरू करता येईल. नवीन संकल्पना राबवू शकाल. व्यापारानिमित्त लांबचा प्रवास होईल. ऐषआराम आणि चैनीच्या वस्तू खरेदीसाठी खर्च होईल. महिलांकडून घरातील भौतिक गरजांसाठी नवीन खरेदी केली जाईल. विद्यार्थी मित्र-मैत्रिणींवर खर्च करतील, पार्टी देऊ शकतात.
हेही वाचा – जातकांचे ज्योतिष ज्ञान
कन्या
- राशीस्वामी बुध 8 तारखेला कन्या राशीत येत आहे. नोकरदारांच्या बाबतीत अपेक्षित घटना घडतील. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. मौल्यवान वस्तू जपून ठेवा. सामाजिक स्तरावर मान-सन्मान मिळेल. व्यावसायिक वर्गाने अतिउत्साह दाखवू नये. बेकायदेशीर कामे टाळावीत, शॉर्टकट वापरू नका. काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. व्यवासायात आत्मविश्वास वाढेल, अपेक्षा पूर्ण होतील. महिलांना आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करता येईल. विद्यार्थ्यांनी वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करावे, चोरांपासून सावध राहा.
तुळ
- या आठवड्यात तुमचा राशीस्वामी शुक्र आधीच स्वतःच्या राशीत आहे. प्रसन्न वातावरण राहील. नोकरदारांच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कामात ज्या अडचणी येत होत्या, त्या आता संपतील, नवीन मार्ग सापडतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यावसायिक वर्गाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करा. सर्वच क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसतील. महिलांच्या बाबतीत घरात मुलांचे लग्न ठरू शकेल. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळू शकेल. क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी तसेच कलाकारांना प्रसिद्धी मिळेल, मानधनात वाढ होईल.
वृश्चिक
- या आठवड्यात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरदारांचे राहत्या घराचे प्रश्न सुटतील. कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. भाग्याची साथ मिळेल. व्यावसायिक वर्गाला जोडधंदा सुरू करता येईल. उधारी वसूल होईल आणि उत्पन्नात वाढ होईल. हितशत्रूंवर मात करू शकाल. महिलांच्या दृष्टीने घरात आनंदी वातावरण असेल. नवीन वाहन खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील.
धनु
- राशीस्वामी गुरू कर्क राशीत आहे. अडचणी संपुष्टात येतील. नोकरदारांची अपेक्षित कामे पूर्ण होतील. महत्त्वाच्या करारांवर सही करू शकाल. स्थावर संपत्तीबाबतची कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. कोणतेही काम हाती घेताना विचारपूर्वक हाती घ्या. व्यावसायिक वर्गाने घाईगडबडीत निर्णय घेऊ नये. सरकारी नियम आणि कायदे यांचे काटेकोर पालन करावे. महिलांच्या बाबतीत घरात माहेरवाशिणी येतील. म्हणून आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करावे, वादविवाद टाळावेत.
मकर
- राशीस्वामी शनि मीन राशीत वक्री आहे. नोकरदारांना कामाचा ताण कमी झालेला जाणवेल. तरीही, कामाबद्दल जागरूक राहा आणि कामाविषयीचे ज्ञान अद्ययावत ठेवा. व्यावसायिक वर्गाने कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. नवीन योजना सुरू करू शकाल. जुनी येणी वसूल होतील. त्याचबरोबर खर्चातही वाढ होईल. महिलांना असमाधानी वाटण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मेडिटेशन करा. नकारात्मक बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मनात असूनही विद्यार्थी कामे पूर्ण करू शकणार नाहीत. छोट्या अडचणी येतील.
कुंभ
- या आठवड्यात जपून बोलावे. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळावेत. तुम्ही केलेल्या नियोजनामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पण त्यातून मार्ग काढू शकाल. यासंदर्भात सहकारी आणि वरिष्ठ मदत करतील. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत फॅशन, डिझाइन, मॉडेलिंग, पर्यटन या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. व्यापारात वाढ होईल. महिलांनी जपून बोलावे, कुणालाही दुखवू नका. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याचा पुढे फायदा होईल.
हेही वाचा – वास्तुशास्त्र आणि नातेसंबंधातील ऊर्जा
मीन
- तुमच्या राशीत शनी वक्री झाला आहे. म्हणून विचित्र चिंता सतावेल. नोकरदारांनी राजकारण आणि गटबाजीपासून लांब रहावे. कामात शिस्त ठेवावी. कामाचे ज्ञान अद्ययावत ठेवावे लागेल. प्रवास करावा लागू शकतो. व्यावसायिक वर्गाने प्रवासात महत्त्वाची कागदपत्रे तसेच वस्तू जपून ठेवाव्यात. व्यापारासाठी आर्थिक मदत लगेच मिळू शकेल. महिलांच्या बाबतीत घरात कापणे, भाजणे अशा दुखापती होऊ शकतात. अशा वेळी औषधे घरात आणून ठेवावीत. कोणताही निर्णय घेताना विद्यार्थ्यांनी घरातील मोठ्यांशी विचारविनिमय करावा.


