Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » भूतकाळ न विसरलेला भिडुजी!
    फिल्मी

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    हर्षा गुप्तेBy हर्षा गुप्तेAugust 31, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, हर्षा गुप्ते, अभिनेत्री हर्षा गुप्ते, भिडू जॅकी श्रॉफ, हीरो जॅकी श्रॉफ, माणुसकी जपणारा जॅकी, भूतकाळ न विसरलेला जॅकी श्रॉफ, कुटुंबवत्सल जॅकीश्रॉफ, भिडुजी जॅकी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    मी अकरावीला असताना ‘हीरो’ सिनेमा रीलीज झाला. खूप सारे नावाजलेले कलाकार त्यात होते. शिवाय, दोन नवीन कलाकार – जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री. ब्लॉक बस्टर फिल्म ठरली. जॅकी आणि मीनाक्षीच्या प्रेमात पडलेली तरूणाई. जॅकीसाठी मुली तशाही वेड्याच झाल्या होत्या. मी म्हणायचे, ‘त्यात काय एवढं फक्त हँडसम आहे. ॲक्टर तर यथातथाच…’ पण ‘परिंदा’ रीलीज झाला आणि जॅकीने सिद्ध केलं की, तो ॲक्टर पण चांगलाच आहे! त्याच्या इतर भूमिका बघता बघता मलाही तो आवडायला लागला.

    मधे खूप वर्षे गेली. विक्रोळीला दहीहंडीच्या कार्यक्रमाला मला चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं. तिथे हा बाबा भेटला. लांबूनच मला बघून हा ओरडला ‘Oye CID.’ आवाज जॅकीचा. म्हणून मी सहज मागे वळून पाहिलं. माझं म्हणजे असं झालं की ‘वॉव, जॅकी श्रॉफ!’ आणि तो तर मलाच हाक मारत होता. मी एकदम हवेत. जेव्हा तो म्हणाला की, “मी तुला CIDमध्ये, क्राइम पेट्रोलमध्ये काम करताना पाहिलंय. मस्त काम करतेस.” मी भलतीच खूश. मग काय इव्हेंट संपल्यावर त्याने त्याचा नंबर शेअर केला.

    हेही वाचा – दोन वेण्या अन् रीमा दिदी…

    त्याच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. मला त्याने घरी बोलावलं. मी आणि माझी लेक आम्ही दोघी वांद्रे येथे जॅकीच्या घरी गणपतीला गेलो. जाताना मी बनवलेले उकडीचे मोदक घेऊन गेले. जॅकीच्या बायकोने, आयेशाने मस्त स्वागत केलं. जॅकीने तिला सांगितलं होतं की, “माझी मैत्रीण येणार आहे, CID.” ती सुद्धा कोण CID येतेय, तिची वाट बघत होती. तो सकाळी कुठल्यातरी कार्यक्रमाला गेला होता, म्हणून आल्यावर आंघोळीला गेला होता. आयेशाने बाप्पाच दर्शन करवलं. केळीच्या पानावर मी नेलेल्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पा समोर ठेवला. तेवढ्यात जॅकी आला. बाप्पाला नमस्कार करून एक मोदक उचलून खाल्ला… “मोदक कौन लाया रे? गरम और मक्खन जैसा। बावा सॉलिड है।“ त्याने आणि आयेशा ने 7-8 मोदक टपा टप उडवले. मुलगी कृष्णा जिममधून आली. तिलाही मोदक दिले आणि त्याच्या स्टाफला पण वाटले.

    “चला जेवायला बसूया.”

    आता आली का पंचाईत! असं पटकन कसं कोणाकडे जेवायला बसणार… मी म्हटलं, “माझा उपवास आहे. मी नाही जेवणार.” तर, माझी लेक बसली त्याच्यासोबत जेवायला. तो इतका कुटुंबवत्सल माणूस आहे ना की, लेकीने ‘ही भाजी नको मला आवडत नाही,’ असं म्हटलं तर म्हणे, “अगं खाऊन बघ. आवडली तर खा नाहीतर मी खाईन.” तिला नाहीच आवडली. त्याने तिच्या उष्ट्या ताटातली ती भाजी घेऊन खाल्ली. इतका गोड आणि पक्का फॅमिली पर्सन! जेवण झाल्यावर फोटो काढणे. मग म्हणे, “थांब आता. टायगर येईल तासाभरात. त्याला भेटून जा.”

    हेही वाचा – मानो या ना मानो…

    म्हटलं नको – “उशीर होईल. अजून दोन-तीन ठिकाणी जायचं आहे.”

    आयेशाला टाटा करून निघालो. हा आम्हाला खाली सोडायला… रिक्षात बसवलं. आम्ही दूर जाईपर्यंत रस्त्यावर उभा होता. असा ‘न भूतो न भविष्यती’ माझा आवडता हीरो काही काळ माझ्या संपर्कात होता. नंतर तो काही काळ सगळं सोडून त्याच्या फॉर्महाऊसवर राहायला गेला. निसर्गाच्या सान्निध्यात रमला होता. त्याने कामं कमी केलीत, त्यामुळे तो पुणे हायवेच्या फार्महाऊसवरच जास्त असतो. तो सगळ्यांपासून तसा लांबच गेला. अगदी कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये राहिलाच नाही. मी त्याला ‘भिडुजी’ म्हणायचे. आता त्याचे नंबर बदलले आहेत. कदाचित, तो विसरलाही असेल मला.

    तो मोठा आहेच. देव त्याला अजून मोठा करो. कारण त्याला आजही त्याने पाहिलेल्या गरिबीची, छोट्या घराची जाण आहे. माणसांची कदर आहे… जियो भिडुजी!

    Avatar photo
    हर्षा गुप्ते

    मालिका, सिने, नाट्य अभिनेत्री

    Related Posts

    जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    August 16, 2026 फिल्मी

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    August 9, 2026 फिल्मी

    पल भर में ये क्या हो गया…

    August 9, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    By विशाल कुलकर्णीAugust 16, 2026

    किसको सुनाएं हाले-दिले जोर ए, अदा, आवारगी मै हमने जमाने की सैर की। काबे में…

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    August 9, 2026

    पल भर में ये क्या हो गया…

    August 9, 2026

    सेल्फी अन् विकतचं दुखणं!

    August 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑगस्ट 2026

    August 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 415
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 559
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 24
    • ललित 890
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.