मेष
- या आठवड्यात सरकारी कामे पूर्ण होतील. नोकरदारांचे ज्या गोष्टीसाठी प्रयत्न सुरू होते, ते काम पूर्ण होत येईल. वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा असेल. व्यावसायिक वर्गाला व्यवसायात लाभ होईल. राजकीय क्षेत्रात असाल तर, वर्चस्व सिद्ध करू शकाल. महिलांकडून धार्मिक गोष्टींसाठी खर्च केला जाईल, आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आनंदी वातावरण असेल, मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील.
वृषभ
- या आठवड्यात समस्या सुटतील. अनपेक्षित लाभ होईल. नोकरदारांना नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. तसेच, इतरांना कामात सहकार्य कराल. पण आधी स्वतःच्या कामाचे नियोजन करा, नंतर इतरांना मदत करा. व्यावसायिक वर्गाची आवक वाढेल. त्याचबरोबर कामाचा ताण येईल. महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घ्या. महिलांनी इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. प्रामाणिकपणे काम करावे. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्या, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
मिथुन
- या आठवड्यात आहार आणि पथ्य सांभाळा. नोकरदारांनी अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नये. कामाच्या ठिकाणी हिशोबात चोख राहा. सगळे व्यवहार लिहून ठेवणे योग्य ठरेल. व्यावसायिक वर्गाने कामात पारदर्शकता ठेवावी. कामाचा भार खूप वाढेल. महत्त्वाचे करार करताना सावधगिरी बाळगा. महिलांना सगळे भावा-बहिणींची भेट होईल. विद्यार्थ्यांकडून नकळत काही गोष्टी चुकू शकतात, म्हणून विचार करून निर्णय घ्या.
कर्क
- या आठवड्यात संयम ठेवा. वादविवाद टाळा. नोकरदारांनी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपावे. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक वर्गाने वादविवाद टाळावेत. व्यवसायात मोठी गुंतवणूक करू शकाल. व्यापारवृद्धीसाठी ट्रेनिंग घ्याल आणि इतरांनाही देऊ शकाल. महिलांनी इतरांना सल्ला देऊ नये. उगाच चिडचिड होऊ शकते, त्यामुळे शांत राहा, मेडिटेशन करा. विद्यार्थ्यांनी कोणतेही काम करताना घाईगडबड करू नये. विचार करून पाऊल उचलावे.
सिंह
- या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय टाळा. नोकरदारांनी आर्थिक व्यवहार जपून करावेत. एखाद्या कामाला खूप विलंब होईल. इतर कामे समजून-उमजून करावी लागतील. व्यावसायिक वर्गाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे टाळावे. आधीची वसुली येण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रसंगी कायदेशीर कारवाई करावी. तुमचे विचार इतरांना पटवून देण्यासाठी महिलांना मेहनत करावी लागेल. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून लांब रहावे. मेहनत करा, यश मिळेल.
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू
कन्या
- या आठवड्यात काटकसर करा. नोकरदारांच्या बाबतीत कामात जबाबदारी वाढेल, अधिकारात वाढ होईल. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. या प्रवासात ओळखी होतील, त्याचा उपयोग नंतर होऊ शकतो. व्यावसायिक वर्गाने भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नये. इतरांचे बोलणे ऐकून घ्या, पण निर्णय पूर्ण विचार करून घ्या. महिलांच्या बाबतीत संततीच्या कौतुकाचे क्षण येतील. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी आपल्या कामाची जबाबदारी इतरांवर सोपवू नये. अशाने नुकसान होण्याची शक्यता आहे.
तूळ
- हा आठवडा आनंदाचा आहे. राशीस्वामी शुक्र 3 तारखेला स्वतःच्या राशीत येत आहे. नोकरदार आर्थिक बाबतीत समाधानी असतील. स्वतःला कामात झोकून देऊन काम कराल. तथापि, तब्येतीची काळजी घ्या, पाणी भरपूर प्या. व्यावसायिक वर्गाची सकारात्मक कामे होतील. सगळी कामे सुरळीत पूर्ण होतील. जुनी येणी वसूल होईल. अनेक ठिकाणांहून संधी मिळतील. महिलांच्या नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. विद्यार्थी इतरांना मदत करू शकतील. भावंडांची भेट होईल.
वृश्चिक
- या आठवड्यात आर्थिक प्रगती होईल. नोकरदारांचा सर्वांगीण विकास होईल. वरिष्ठांची मदत मिळेल. कामे अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पूर्ण करू शकाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि श्रेय मिळेल. व्यावसायिक वर्गाला आर्थिक लाभ होईल. नवीन कामे मिळतील. इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. प्रामाणिक मेहनत करत राहा, यश मिळेल. महिलांना खरेदी करता येईल. मैत्रिणीबरोबर ट्रिपला जाण्याचा प्लॅन करू शकाल. विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
धनु
- हा आठवडा अनुकूल आहे. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. पण जबाबदारीने कामे पूर्ण करू शकाल. कुटुंबातील मतभेद दूर होतील. समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे पटवून देण्यात व्यावसायिक वर्गाला यश मिळेल. व्यवसायातही वाढ होईल. महिलांना धार्मिक कार्यात सहभागी होता येईल, दानधर्म करू शकाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. मनोरंजनात वेळ घालवू नका, सोशल मीडियापासून लांब राहा.
मकर
- या आठवड्यात मुद्देसूद बोला. नोकरदारांच्या दृष्टीने या आठवड्यात कामाचा ताण खूप कमी असेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. नवीन जबाबदारी सध्या स्वीकारू नका. व्यावसायिक वर्गाने नवीन बदल स्वीकारावेत. जाहिरात करताना सोशल मीडियाचा वापर करा. प्रदर्शन आणि उत्सव यात सहभाग घ्या. महिलांनी बोलताना सांभाळून बोलावे, गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी घाईगडबडीत कुठलेही काम (प्रोजेक्ट) करू नये. उशीर झाला तरी चालेल, पण चुका करू नका.
कुंभ
- या आठवड्यात कुणाच्याही बाबतीत मध्यस्थी करू नका. नोकरदारांनी अनावश्यक खर्च टाळावेत. काम हाती घेण्यापूर्वी आधी नियोजन करावे. इतरांना काम सोपवताना काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाने कोणालाही सल्ले देऊ नयेत. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. कोणाशीही वाद घालू नका. महिलांनी घरात कुणाच्याही बाबतीत मध्यस्थी करू नये, शांत राहावे. विद्यार्थ्यांनी आपली कामे वेळेवर पूर्ण करावीत. मनोरंजनावर वेळ वाया घालवू नका.
हेही वाचा – वास्तुशास्त्र आणि आपल्या जीवनातील उर्जेचा संबंध
मीन
- या आठवड्यात आर्थिक नियोजन नीट करा. नोकरदारांच्या कामाचा ताण कमी होईल. कामाचे स्वरूप बदलेल. वरिष्ठ खूश राहतील. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे, तिथे व्यावसायिक वर्गाने जाऊ नये. स्वतःचे मत इतरांवर लादू नका. व्यापारवृद्धीसाठी आवश्यक ते सर्व उपाय करा. महिलांनी अतिविचार करू नये, तब्येतीची काळजी घ्या. खास करून, आत्मपरीक्षण करावे. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे. आईशी वाद घालू नका.


