Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 17, 2026Updated:August 17, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 17 ऑगस्ट 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 26 श्रावण 1948; तिथि : पंचमी 16:59; नक्षत्र : चित्रा 28:58;
    • योग : शुभ 27:28; करण : कौलव 29:19;
    • सूर्य : कर्क ; चंद्र : कन्या 16:18; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:06;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    नागपंचमी

    श्रावणी सोमवार शिवामूठ : तांदूळ

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    सूचिकार शंकर गणेश दाते

    टीम अवांतर

    मराठी लेखक आणि सूचिकार शंकर गणेश दाते यांचा जन्म 17 ऑगस्ट 1905 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे वडील हे मुंबईच्या कुलाबा वेधशाळेत हेडक्लार्क या पदावर काम करत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी व्यापारात चांगले यश मिळवले. पण 1914 साली त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर शंकरराव यांचे काका आणि मोठा भाऊ यांनी दाते यांचा सांभाळ केला.

    पुणे येथील सर परशुराम महाविद्यालयातून शंकरराव यांनी मराठी आणि संकृत या विषयांसाठी पदवीसाठी नाव नोंदवले होते. पण लोकसाहित्य या विषयाची आवड निर्माण झाल्याने ते त्या विषयाकडे वळले आणि नंतर त्यांनी लोककथांचे संकलन प्रकाशित केले.

    हेही वाचा – जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    दाते यांनी 1934 साली मराठीतील प्रकाशित ग्रंथांची विषयवार सूची करण्याचे काम हाती घेतले. 27 वर्षांच्या अथक परिश्रमाने ते काम 1961 साली पूर्ण केले. 1800 ते 1950 या 150 वर्षांतील मराठी ग्रंथांची विषयवार आणि शास्त्रीय पद्धतीने सूची करून त्यांनी प्रकाशित केली. तसे करताना दाते यांनी सूचीत नोंदवलेले प्रत्येक पुस्तक पाहून मग त्याची नोंद करण्याचे धोरण स्वीकारले होते. मराठी ग्रंथसूची हे मराठी भाषेत कोणकोणत्या विषयावर कोणकोणते ग्रंथ प्रकाशित झाले हे जाणून घेण्यासाठीचे उपयुक्त साधन बनले.

    मराठी ग्रंथसूचीत प्रत्येक ग्रंथाबद्दल जी माहिती नोेंदवलेली आहे ती साधारणपणे ग्रंथकाराचे नाव, ग्रंथाचे नाव, आवृत्ती, प्रकाशनस्थळ, प्रकाशक, पृष्ठसंख्या, आकार, चित्रांची माहिती, मूल्य अशा पद्धतीने आहे. माहितीसोबतच मुद्रक आणि मुद्रणस्थळ ही माहितीही या सूचीत नोंदवलेली आहे. तसेच ग्रंथाविषयीची महत्त्वाची इतर माहिती उदा. अनुवादित ग्रंथ असल्यास मूळ ग्रंथ, ग्रंथकार इ. टिपेत नोंदवलेली आहे. प्रत्येक ग्रंथाविषयीची ही माहिती ग्रंथ-वर्णन-कोश या विभागात विषयवार विभागून दिली आहे.

    नोंदींच्या वर्गीकरणासाठी ग्रंथालयशास्त्रात वापरण्यात येणारी मेलविल डयुई यांची दशांश-वर्गीकरण-पद्धती वापरली आहे. काही ठिकाणी उदा. चरित्रे या विभागात काही विशेष शीर्षकांचा वापर करून त्याविषयीचे सर्व ग्रंथ एकत्र पाहण्याची सोय केली आहे. उदा. शिवाजी महाराजांची सर्व चरित्रे. सूचीच्या प्रारंभी दशांश-वर्गीकरण-पद्धतीचे वर्ग आणि उपवर्ग यांचीही माहिती देण्यात आली आहे. तसेच सूचीच्या शेवटी लेखकाचे नाव, ग्रंथाचे नाव, विशेष शीर्षक यांच्या निर्देशसूची दिलेल्या असून त्यायोगे सूचीतील ग्रंथ शोधण्याची सोय करून दिलेली आहे. दोन खंडात प्रसिद्ध झालेल्या या सूचीत 26 हजार 607 मराठी ग्रंथांची नोंद घेतलेली आहे.

    मराठी ग्रंथसूचीव्यतिरिक्त त्यांनी मराठी लोककथांचे संकलन केले. याशिवाय ग्रंथालयशास्त्रावर पुस्तके लिहिली. भारतीय साहित्याची राष्ट्रीय ग्रंथसूची 1901-1951 भाग 3 या ग्रंथातील मराठी विभागाचे संपादनही त्यांनी केले. त्यानंतर मराठी नियतकालिकांची सूची तयार करण्याचे काम हाती घेण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यासाठी लागणारी आवश्यक ती सामग्रीही त्यांनी जमा केली होती. मात्र 10 डिसेंबर, 1964 रोजी वयाच्या साठाव्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले आणि हे कार्य अर्धवटच राहिले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – बुद्धी आणि संयमाची आज परीक्षा घेतली जाऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते, म्हणून लहानसहान समस्यादेखील गांभीर्याने घ्या.  तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले असतील, तर ते परत करण्यासाठी तुमच्यावर अचानक दबाव येऊ शकतो. मोठे धोके पत्करणे टाळणे उत्तम ठरेल.

    वृषभ – आज नशीबाची मोठी साथ मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आधी केलेल्या  गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. व्यवसायातही तेजी येईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. एका छोट्याशा गोष्टीमुळे नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो. सहकाऱ्यांशी प्रेमाने आणि आदराने संवाद साधलात, तर दिवस आणखी चांगला जाईल.

    मिथुन – विवेकबुद्धी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता ही आज तुमची सर्वात मोठी ताकद असेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि बऱ्याच काळापासून अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतील. तुम्ही घेतलेले काही निर्णय आजूबाजूच्या लोकांना आश्चर्यचकित करू शकतात, परंतु त्यांचा परिणाम सकारात्मक असेल. प्रवासाचे नियोजन कराल. मात्र कोणत्याही गोष्टीत घाई करणे टाळा. एक चुकीचा निर्णय सुरू असलेला एखादा प्रकल्प उद्ध्वस्त करू शकतो.

    कर्क – अपूर्ण कामे पूर्ण करण्याकडे आज विशेष लक्ष द्या, ती पुढे ढकलल्यास नंतर समस्या वाढू शकतात. वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगा, घाई करणे टाळा. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी दुरावा किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे जोडीदाराशी मोकळा संवाद ठेवा. घरात एखाद्या मंगल कार्यक्रमाची  तयारी सुरू होऊ शकते, ज्यामुळे व्यस्तता वाढेल. कुटुंबासोबत मिळून काम केले तर दिवस सुरळीत जाईल.

    सिंह – आज समाजात तुमची ओळख आणि प्रभाव वाढेल. तुमच्या गोड शब्दांनी लोक प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात, पण दुसऱ्याच्या यशाबद्दल मत्सर बाळगू नका. तुमची ऊर्जा तुमच्या ध्येयांवर केंद्रित करणे सर्वोत्तम ठरेल. प्रवास करताना स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्या. मन विचलित करणाऱ्या गोष्टी टाळल्यास, महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल.

    कन्या – आजचा दिवस धावपळीचा आणि व्यस्त असेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगा. सखोल चौकशी केल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करणे टाळा. कामाच्या ठिकाणी मिळणारी जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणाने आणि गांभीर्याने पार पाडा. आज वरिष्ठांचा रोष ओढवून घेणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

    तुळ – आज कुटुंबात आनंदी वातावरण असू शकते. इतरांना आपल्या  वैयक्तिक गोष्टी सांगणे टाळा, कारण कोणीतरी तुमच्या माहितीचा गैरफायदा घेऊ शकते. इतरांचा सल्ला ऐका, पण अंतिम निर्णय तुमच्या स्वतःच्या विचारांनुसार घ्या. भावनिक होऊन घेतलेले निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतात.

    वृश्चिक – आज आनंद आणि व्यस्तता दोन्हींचा अनुभव येईल. कामाचा ताण थोडा त्रास देऊ शकतो, पण लहान आर्थिक लाभ समाधान देऊन जातील. शेजाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यातला तुमचा अनावश्यक सहभाग टाळा. स्वतःच्या करिअरबाबत निष्काळजी राहू नका. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल. आज शिस्त आणि संयम राखली, तर दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील.

    हेही वाचा – जेन झी

    धनु – अनेक नवीन संधी आज उपलब्ध होऊ शकतात. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग खुले होतील, आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत.  सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांनी गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणे टाळा, कारण भविष्यात त्याची परतफेड करणे कठीण होऊ शकते. आपल्या क्षमतेचा विचार करून आर्थिक निर्णय घ्या.

    मकर – आज सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे. घाईने घेतलेल्या निर्णयामुळे आर्थिक किंवा वैयक्तिक नुकसान होऊ शकते, म्हणून संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतरच महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घ्या. वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडवा टिकून राहील. कर्ज किंवा आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे, परंतु आपले उत्पन्न, खर्च आणि भविष्यातील गरजा यांचा अचूक हिशोब ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

    कुंभ – व्यवसायात आज नफा होण्याची शक्यता आहे.  अधूनमधून तांत्रिक समस्या किंवा किरकोळ अडथळे येऊ शकतात. मात्र तुमचा अनुभव आणि व्यावहारिक ज्ञान वापरून ती परिस्थिती  हाताळू शकाल. सासरच्या मंडळींना वैयक्तिक गोष्टी सांगणे टाळा. एखादी छोटी सहल शक्य आहे. कोणत्याही बाबतीत तुमच्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहा; यामुळे तुमच्या नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल.

    मीन – तुमची मेहनत हेच तुमचे वैशिष्ट्य ठरेल. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. जर आर्थिक मदतीची गरज भासली, तर जवळच्या एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून मदत मिळू शकते. तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येवर उपाय शोधत असाल, तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑक्टोबर 2026

    October 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    October 5, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    By Team AvaantarOctober 7, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 ऑक्टोबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 15…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑक्टोबर 2026

    October 6, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    October 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑक्टोबर 2026

    October 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    उंबऱ्यापलीकडचा सातबारा

    October 6, 2026

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    October 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 461
    • अवांतर 216
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 617
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 975
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.