Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक
    ललित

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारAugust 2, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता हवालदार, डॉ अस्मिता हवालदार, Bookshelf, नेमसेक पुस्तक, लेखिका झुम्पा लाहिरी, झुम्पा लाहिरी यांची नेमसेक कादंबरी, नेमसेकचा अनुवाद - उल्का राऊत, आकाश आशिमी दाम्पत्य, गोगोल मुलगा, लेखक निकोलाय गोगोल
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    झुम्पा लाहिरी या प्रसिद्ध कथा कादंबरीकार असून त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. नेमसेक ही त्यांची गाजलेली कादंबरी! यावर सिनेमा सुद्धा आहे. उल्का राऊत यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. ही अमेरिकेत घडणारी आशिमा आणि अशोक या बंगाली जोडप्याची कथा आहे. गोगोल या नावाभोवती पूर्ण कादंबरी गुंफली आहे.

    अशोक हा बंगाली तरुण ट्रेनमधून जात असताना निकोलाय गोगोल या लेखकाचे ‘द ओव्हरकोट’ (The Overcoat) पुस्तक वाचत असतो. सहप्रवासी पुस्तकाबद्दल त्याला विचारतो आणि बोलता बोलता अमेरिकेत जाण्याचा सल्ला देतो. पुढे अशोकचा आशिमाशी विवाह होतो. आशिमा इंग्रजी विषयात पदवीधर असते. दोघांचा संसार अमेरिकेत सुरू होतो. त्यांच्या पहिल्या अपत्याचे नाव तो गोगोल ठेवतो. तो बाळाला म्हणतो, माझ्या आयुष्यात दोन चमत्कार घडले. पहिला गोगोलशी संबंधित आणि दुसरा तू… त्यामुळे तुझं नाव गोगोल!

    गोगोलच्या वर्गातली मुलं त्याला नावावरून चिडवत असत निकोलाय गोगोल हा प्रसिद्ध लेखक विचित्र वेडसर वागणुकीसाठी देखील प्रसिद्ध होता. या नावावरून अशोकच्या गोगोलने आयुष्यात खूप दु:ख भोगले. त्यामुळे तो चिडून आई-बाबांना म्हणतो की, “मला नाव बदलायचे आहे.” त्यानुसार त्याचे नाव निखिल ठेवले जाते. तो पदवी मिळवतो, तेव्हा त्याला अशोक निकोलाय गोगोलचे ‘द ओव्हरकोट’ पुस्तक भेट देतो आणि सांगतो की, आपले सर्वांचे आयुष्य यात सामावले आहे. एकही इंच न हलता पूर्ण जगाचे दर्शन करून देणारे ते पुस्तक असल्याचे तो सांगतो.

    हेही वाचा – वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’

    कॉलेजमध्ये मुले त्याला ‘निक’ म्हणत असतात, पण कुटुंबीयांसाठी तो गोगोलच असतो. अशोकची बदली होते, कामावर रुजू होण्यासाठी तो एकटाच जाणार असतो, तेव्हा कुटुंबीय आणि गोगोलची मैत्रीण एकत्र जमतात. त्यावेळी अशोक त्याला गोगोल नाव ठेवण्यामागचे रहस्य सांगतो. जणू ‘गोगोल, तू माझा जीव आहेस,’ हेच त्याला सांगायचे असते. “मला गोगोलने जीवनदान दिले, ते तू आहेस… इतका तू मला प्राणप्रिय आहेस,” असे अशोक गोगोलला सांगत असतो. बाबांची भावना समजल्यावर त्याला त्यांच्या प्रेमाची अनुभूती होते.

    अशोक आणि अशिमाची भारताबद्दल असलेली ओढ त्यांच्या अमेरिकन मुलांना गोगोल आणि सोनियाला उमजत नाही. त्यांचे बंगाली अमेरिकन मित्रसुद्धा आपल्या चालीरीती सोडत नाहीत. गोगोलचे डोळे लाल झालेले असताना बंगाली मावशी म्हणते, ‘तुला नजर लागली’ आणि लाल मिरच्यांनी दृष्ट काढते. ती गोगोलला सांगते, “तुला गर्लफ्रेंड्स कितीही असोत, लग्न बंगाली मुलीशीच करायचं.”

    गोगोल वडिलांच्या मृत्यूनंतर दु:खात असताना त्याची अमेरिकन मैत्रीण त्याला म्हणते, “दु:खातून बाहेर येण्यासाठी आपण कुठेतरी फिरायला जाऊया.” त्यावर तो म्हणतो, ”पण मला यातून बाहेर यायचं नाहीये.” अशोक अशिमाने ठरवलेले असते की, मुले मार्गाला लागल्यावर भारतात परत जायचं.

    आशिमा म्हणजे सीमा नसलेली. तिच्यासाठी घर म्हणजे भारत. ती मनाने अमेरिकन होत नाही. अशोकला देश सोडून आल्याचं दुख असतं. ही साधीशी वाटणारी कथा गोगोल नावाच्या रहस्यामुळे गुंतवून ठेवते. चारचौघांचं सामान्य आयुष्य जगणारे, फारशी महत्वाकांक्षा नसलेले हे दोघे पतीपत्नी आणि जन्मतःच अमेरिकन विचारसरणी असलेली त्यांची मुले ही या कादंबरीची मुख्य पात्र असली तरी, कादंबरीचा नायक ‘गोगोल’ हे नावच आहे.

    गोगोलची मैत्रीण अशोक आणि अशीमाला नावाने बोलावते, गालावर किस करते… त्यामुळे दोघे अवघडून जातात. पण पुढे मुलगी सोनिया जेव्हा अभारतीय मुलाशी लग्न ठरवते, तेव्हा ते सहज मान्य करतात. त्यांचे विचार बदललेले असतात. असे असले तरी मातृभूमीची ओढ आणि त्यामुळे होणारी मानसिक ओढाताण राहतेच.

    अशिमाला पाहायला अशोक आणि पालक आलेले असतात, तेव्हा ती त्याचे बाहेर ठेवलेले शूज घालते आणि चालून पाहते. नंतर अशोकच्या मृत्यूनंतर गोगोल त्याचे शूज घालून पाहतो. दोन्ही प्रसंगांतून लेखिका प्रतिकात्मकरित्या मानसिक आंदोलन दाखवते.

    हेही वाचा – डॉ. आनंदीबाई जोशी… जीवनाचे सापडलेले ध्येय!

    अमेरिकन ड्रीम असण्याच्या काळात अनेक जण अमेरिकेत गेले. लेखिकेने तो काळ कादंबरीत मांडला आहे. खरंतर, परदेशी राहणाऱ्या प्रत्येकाचे हे पुस्तक प्रतिनिधित्व करते. परदेशात आलेल्या पहिल्या पिढीची मानसिक कुचंबणा होते, धड ना इथले ना तिथले! त्यांच्या मुलांना दोन्ही संस्कृतींमधल्या फरकाला समजून घ्यायचे असते. गोगोल जेव्हा त्याच्या आई-बाबांना ‘यू गाईज’ संबोधतो, तेव्हा अशिमा त्याला रागावते; पण हे संबोधन गोगोलसाठी दुरावा दाखवणार नसते. एक लेखक वाचकाच्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम करू शकतो हे लेखिकेने खुबीने दाखवून दिले आहे.

    नावात काय आहे? ही उक्ती जगन्मान्य असताना नावात इतके बरेच काही असते, नाही का?

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026 ललित

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026 ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    By विशाल कुलकर्णीAugust 2, 2026

    उत्तरार्ध रोहन सधन घरचा. वडिलांचा छोटासाच, पण स्वतःचा कारखाना होता. घरी लक्ष्मी पाणी भरत होती.…

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    August 2, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 381
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 516
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 824
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.