Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आषाढी एकादशी… दर्शन विठ्ठलाचे
    ललित

    आषाढी एकादशी… दर्शन विठ्ठलाचे

    नीता चंद्रकांत कुलकर्णीBy नीता चंद्रकांत कुलकर्णीJuly 24, 2026Updated:July 25, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नीता कुलकर्णी, लेखिका नीता कुलकर्णी, नीता चंद्रकांत कुलकर्णी, आषाढी एकादशी, विठूरायाची रूपे, विठ्ठलाची रूपे, नातवात विठ्ठल दर्शन, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल दर्शनाची आस,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येते,” ती सुनबाईला म्हणाली.

    “आज कशाला जाता? एकादशीची फार गर्दी असेल.”

    “अगं, पंढरपूरला जायचं नशिबात नाही. इथल्या तरी विठ्ठलाला भेटून येते. देऊळ जवळ तर आहे…”

    सासूबाईंचं म्हणणं ऐकून ती म्हणाली, “बरं, या जाऊन.”

    “आजे मी येणार…”

    बारका नातू मागे लागला.

    “अरे, तुला कुठे गर्दीत सांभाळू?”

    तस नातवानं भोकांडच पसरलं…

    “मला पण विठ्ठलाला यायचंय…”

    तशी सुनबाई म्हणाली, “एवढं रडतंय तर न्या की… हे घ्या अकरा रुपये, ठेवा देवाला. या दोघं दर्शन करून…”

    पोरगं खूश झालं… खिदळायला लागलं…

    देवळात ही गर्दी होती! लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोरगं आनंदात होतं… नाचत होतं…. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तसं पोरग थोड्या वेळानंतर कंटाळलं…

    “आजे कधी दिसणार तुझा विठ्ठल?”

    “थोड्या वेळानं दिसेल हं… आता जवळ आलो आपण. लगेच दर्शन होईल…”

    तिने नातवाची समजूत काढली. जरा वेळानं पोरगं म्हणालं, “आजे गोष्ट सांग ना…”

    हेही वाचा – संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    “अरे इथे कुठे? घरी गेल्यावर सांगते.”

    “इथचं सांग.”

    तिच्या लक्षात आलं, पोराला काहीतरी सांगून नादी लावायला हवं… म्हणून तिने जनीची गोष्ट सांगायला सुरुवात केली…

    जनी दळण दळायला बसते. एकटीनं दळताना तिला थकायला होते… मग ती विठूरायाला म्हणते, ‘अरे, एवढं काम करून मी दमून गेले आहे… ये की रे माझ्या मदतीला…’ आणि खरोखरच प्रत्यक्ष विठूराया येऊन तिला दळायला मदत करतो… दोघं मिळून काम करतात.

    ती छोटी गोष्ट तिने सांगितली…

    “आजे, विठ्ठल तुझ्या घरी आला होता का? तुला दिसला का कधी तुझा विठ्ठल?”

    “माझं कुठलं बाबा एवढं भाग्य! मला कुठला दिसायला…” ती म्हणाली.

    “असं कसं झालं…. विठ्ठल तुला कधीच कसा दिसला नाही?”

    त्याच्या निरागस प्रश्नाला काय उत्तर द्यावं तिला कळेना… ‘तेवढी पुण्यवान नाही रे मी…’ असं ती मनाशीच म्हणाली.

    इतक्यात गोळ्या विकणारा मुलगा तिथे आला. नातू लगेच म्हणाला, “आजे मला गोळ्या घे की…”

    “गप रे… पैसे नाहीत…”

    “ए आजे, घे की…”

    पोरग ऐकेच ना… देवाचे पैसे, अकरा रुपये तेवढे होते. दुसरे आणलेच नव्हते… पण पोरगं  आलंय खरं आणि बराच वेळ झालाय कंटाळलय… जाऊ दे, लहान लेकरू आहे… दर्शन मिळायला अजून अवकाश आहे… हा विचार करून तिने दहा रुपयांचं गोळ्यांच पाकीट घेतलं. पोरगं जरा रमलं… पुढच्या दोन बारक्या पोरींनाही त्यांनी गोळ्या दिल्या… तशा त्या पोरीही  खूश झाल्या.

    “आजे तुला घे की गोळ्या…”

    “नको रे राजा, खा तू…”

    आजीचं लक्ष विठ्ठलाकडे…

    बऱ्याच वेळाने नंबर जवळ आला. तसं आजीने पोराला कडेवर घेतलं.

    “हा घे रुपया जवळ गेलं की, त्या पेटीत टाक… आज दुसरं काहीच आणलं नाही देवा… परत येईन तेव्हा आणीन रे…” हात जोडून तिने विनवणी केली.

    समोर विठ्ठलाला पाहिलं… आज इथे का होईना, त्याचं दर्शन झालं… ते सावळं रूप समोर दिसलं… पिवळा पितांबर, भरजरीचा लाल शेला, गळ्यात तुळशीचे-फुलांचे हार, कपाळाला बुक्का भक्तीभावाने आजीने दर्शन घेतलं. आपल्याबरोबर नातवाचंही डोकं विठ्ठलाच्या पायावर टेकवलं…

    पोरगं हसलं….

    पुजाऱ्यानं पोराच्या कपाळाला बुक्का लावला… विठ्ठलाचा हार पोराच्या गळ्यात घातला…

    पोरगं हरखूनच गेलं…

    आजी बघायला लागली… गर्दीतून बाहेर आली. नातू गळ्यातला हार काढू देईना…

    “मी नाही काढणार,” म्हणत पळायला लागला… तशीच घरी आली. आता पोरगं जाम खूश होतं. नाचत होतं. दारातच सुनबाई उभी होती, म्हणाली,

    “झालं का दर्शन? आणि याच्या गळ्यात हार कोणी घातला?”

    “अगं, दर्शन झालं आणि लगेच पुजाऱ्याने याच्या गळ्यात हार कधी घातला मलाही कळलं नाही!”

    “बसा पाणी देते. पोरानं त्रास नाही ना दिला…”

    तसं पोरगं आईवर रागवलं. कमरेवर हात ठेवून आईकडे बघायला लागलं…

    “बघा सासूबाई ध्यान कसं दिसतंय…”

    आईने असं म्हटल्यावर पोरगं हसायला लागलं…

    आजी बघायला लागली…

    कमरेवर हात, कपाळाला बुक्का आणि गळ्यात तुळशीचा हार घातलेला नातू तिच्याकडे बघून गोड हसत होता…

    हेही वाचा – वारी पंढरीची… जीवनाचे तत्वज्ञान शिकवते!

    काय झालं कळलंच नाही… पण  नातवाचा चेहरा तिला आत्ता या क्षणी वेगळाच दिसायला लागला… तिचे डोळे भरून आले… क्षणभर काही समजेच ना… नातवाच्या जागी विठ्ठल ऊभा आहे, असा भास तिला झाला… साक्षात्कार झाल्यासारखंच झालं…

    नातू हसत होता…

    ती निरखून बघायला लागली… नातवाने मगाशी विचारलेलं… “आजे तुला दिसला का गं, तुझा विठ्ठल?” हे तिला आठवलं… तिच्या मनात आनंदाची एक लहर उठली होती…

    हसत हसत… नातू एकदम धूम पळाला… सुनबाई खिचडी करायला आत गेली…

    आतून तिला लख्खपणे काहीतरी जाणवलं… भरल्या गळ्यानं आजी म्हणाली, “इतका वेळ जवळ होतास का… आम्हाला अजूनही समजायला उशीर होतोय! धन्य आहे रे बाबा तुझी… जनाबाईची दळणं तू दळायला गेलाच असशील… पटलं बाबा मला आज!”

    एकादशीला पंढरपूरला जायला मिळालं नाही, याचं दुःख कुठल्या कुठे पळालं… विठ्ठलाने  नातवाच्या रूपात स्वतः येऊन क्षणभर का होईना… आपल्याला दर्शन दिलं असंच मनोमन  तिला वाटलं.

    त्याला कशा रूपात बघायचं, हेही तिला आज नीट उमगलं…

    आपल्याही आसपास असेलचं विठ्ठल… जरा नीट बघू आपण… प्रयत्न केला की हळूहळू येईल ती दृष्टी… आपल्यालाही दिसेल मग कुठल्या न कुठल्या रूपात… आपला विठूराया…

    Avatar photo
    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

    Related Posts

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026 ललित

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026 ललित

    बदला

    September 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सुधाकररावांची प्रस्तावना

    By दीपक तांबोळीSeptember 16, 2026

    पूर्वार्ध “सर नमस्कार. मी चेतन शेलार, माळी सरांनी मला तुमच्याकडे पाठवलंय,” दारात उभा असलेला तरुण…

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    बदला

    September 15, 2026

    वधू-वर सूचक मंडळ

    September 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 436
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 584
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 29
    • ललित 923
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.