Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दहावी नापास

    June 23, 2026

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » दहावी नापास
    ललित

    दहावी नापास

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरJune 23, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लघुकथा, मराठी साहित्य, दहावी नापास, सदानंद मानेंची खंत, सदानंद माने सरांची निवृत्ती, मुख्याध्यापक सदानंद माने, महेश झोपेची गुरुदक्षिणा, एक लाख रुपये गुरुदक्षिणा, दहावी नापास महेश झोपे, प्रामाणिक महेश झोपे, सरांसाठी शाळा बांधणारा महेश झोपे
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दहावीचे उत्तम वर्गशिक्षक असा लौकिक असणाऱ्या सदानंद माने सरांचा आज निवृत्तीचा दिवस. आजच्या या कार्यक्रमाला सरांच्या पहिल्या बॅचच्या, म्हणजेच 20 वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांना खास निमंत्रण देण्यात आले होते आणि याच बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी एका धनवंत विद्यार्थ्याने सरांसाठी एक लाख रुपयांची गुरुदक्षिणा पाठविली होती, स्वतःच्या नावाचा उल्लेख न करता!

    आपल्या भाषणात सरांनी दोन गोष्टींची खंत बोलून दाखविली. पहिली खंत म्हणजे, सरांच्या गेल्या 20 वर्षांच्या कार्यकाळात त्यांना आलेले एकमेव अपयश म्हणजे त्यांच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी 10वी पास झाला नव्हता. तो विद्यार्थी हुशार होता, परंतु त्याचे अभ्यासात लक्ष नव्हते. सरांनी वारंवार सांगूनही त्याने सरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. परिणाम व्हायचा तोच झाला… तो विद्यार्थी 10वीची परीक्षा नापास झाला आणि सरांच्या लौकिकाला अपयशाचा कलंक लागला. दुसरी खंत म्हणजे, उद्यापासून सरांना शाळेत जायचं नव्हतं, विद्यार्थ्यांना शिकवायचं नव्हतं. थोडक्यात, धावपळीच्या जीवनाला पूर्णविराम… सरांची इच्छा नसतानाही.

    कार्यक्रम संपल्यानंतर सरांच्या त्यांच्या माजी विद्यार्थ्यांबरोबरच्या गप्पा छानच रंगल्या.

    “सर, मी डॉक्टर.”

    “मी इंजिनियर.”

    “मी आर्किटेक्ट.”

    “मी बिल्डर.”

    “मी चार्टर्ड अकाउंटंट.”

    असे सांगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हेच सांगितले की, “आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच.”

    हेही वाचा – सदानंद सर अन् सावित्रीबाईंची स्वप्नपूर्ती!

    या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाच्या पार्श्वभूमीवर सरांना त्या दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्याची कीव आली. ‘असो, मी तरी काय करणार,’ म्हणत सरांनी स्वतःची समजूत काढली. विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा निरोप घेऊन सर आपल्या घरी चालत जायला निघाले 1 लाख रुपयांचे पाकीट घेऊन… शांत आणि मोकळा रस्ता. सर त्यांच्या विचारांच्या तंद्रीत पूर्णपणे हरवले होते आणि अचानक एका उंच नि धिप्पाड तरुणाने सरांना थांबविले.

    “तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, परंतु मला काही करू नका,” सर कळवळीने म्हणाले.

    “तुम्ही या गाडीत जाऊन बसा,” तरुणाने सांगितले.

    सर निमूटपणे बाजूला उभ्या असलेल्या गाडीत जाऊन बसले. दुतर्फा दाट झाडी असलेल्या मोकळ्या रस्त्यावरून गाडी सुसाट धावत होती.

    “अहो, हा तर खूप शांत एरिया वाटतो,” सर घाबरत घाबरत म्हणाले.

    “म्हणूनच तर या एरियाची निवड केली,” तो तरुण शांतपणे म्हणाला.

    त्याने कुणालातरी फोन केला आणि सांगितले, “मी 10 मिनिटांत जागेवर पोहोचतोय, तुम्ही देखील तिथे या.”

    हा तरुण आपल्याला लुबाडण्यासाठी कोणत्यातरी शांत ठिकाणी नेत आहे आणि मदतीसाठी त्याने त्याच्या मित्रांना देखील बोलावले आहे, सरांची मनोमनी खात्री झाली.

    गाडीने मुख्य रस्ता सोडून कच्चा रस्ता पकडला. गाडीचा वेग कमी झाला, शांतता वाढली, मधूनमधून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज तेवढा येत होता. थोड्याच वेळात गाडी अचानक थांबली, एका प्रचंड मोठ्या विहिरीसमोर. सरांनी बाहेर बघितले. चार धष्टपुष्ट तरुण तेथे आधीच येऊन थांबले होते. सरांच्या छातीची धडधड वाढली. ज्या तरुणाने सरांना गाडीतून आणले त्याने सरांना बाहेर येण्याची खूण केली.

    पाच धष्टपुष्ट तरुणांच्या गराड्यात सदानंद माने सर मधोमध उभे होते. सर खूप घाबरले होते.

    “तुम्हाला काय हवे ते घ्या, परंतु मला मारू नका. माझ्याजवळ एक लाख रुपये आहेत, माझ्या एका माजी विद्यार्थ्याने मला गुरुदक्षिणा म्हणून दिलेले. खरंतर, हे एक लाख रुपये देऊन मी माझ्यावर असलेले बँकेचे कर्ज फेडणार होतो; परंतु तुम्हा लुटारूंना गुरुदक्षिणा आणि तिचे मूल्य काय समजणार?” सर कळवळून म्हणाले.

    बोटातील सोन्याची अंगठी, घड्याळ आणि एक लाख रुपयांचे पाकीट त्या तरुणाला देण्यासाठी सरांनी थरथरत हात पुढे केला. तो तरुण पुढे आला आणि त्यानंतर काय झाले ते सरांना समजले नाही. सरांचे भान हरपले. त्या तरुणाचे हात होते सरांच्या पायांवर आणि सरांचे हात त्याच्या डोक्यावर.

    तो तरुण म्हणत होता, “सर, मी तुमचा विद्यार्थी, एकमेव विद्यार्थी 10वी नापास झालेला. सर, मी तुमच्याकडून अभ्यास शिकलो नाही; परंतु प्रामाणिकपणा, सचोटीने वागणे, कुणालाही न फसवणे आणि सतत कष्ट करत राहणे या गोष्टी मी तुमच्याकडून शिकलो आणि त्याच्या जोरावरच मी भरपूर प्रगती केली. हा मोकळा प्लॉट आणि यामागील वनराई हे सर्व माझे आहे. तुमच्या निरोप समारंभाला मी आलो होतो. माझ्यामुळे आलेल्या अपयशाची खंत तुम्हाला अजूनही जाणवते आणि शिकविण्याची तुमची भूक अजूनही संपलेली नाही, हे मला जाणवले आणि म्हणूनच मी ठरविले की, या मोकळ्या जागेवर एक शाळा काढायची आणि या शाळेचे मुख्याध्यापक तुम्ही असणार, कधीही निवृत्त न होणारे. एक अशी आदर्श शाळा की, ज्या शाळेतील एकही विद्यार्थी 10वी नापास होणार नाही आणि तुमच्या यशाला अपयशाचे गालबोट कधीच लागणार नाही… सर, हे माझे चार जिवलग मित्र आपल्याला शाळेच्या उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करतील… मित्रहो, हे माझे आदरणीय गुरुवर्य, सदानंद माने सर. आज मी जो काही आहे ते केवळ या सरांमुळेच.”

    चारही मित्रांनी सरांना वाकून नमस्कार केला.

    महेश झोपे नावाप्रमाणेच वर्गात झोपणारा, सरांचे अजिबात न ऐकणारा, नेहमी गुंडगिरीची भाषा करणारा महेश, आता पूर्णपणे बदलला होता. सरांनी महेशला जवळ घेतले. ते धष्टपुष्ट तरुण अजूनही सरांच्या जवळपास होते, कुत्र्यांचे भुंकणे देखील चालूच होते, परंतु त्यातील भय मात्र संपले होते. सरांच्या डोळ्यांत अश्रू होते, मात्र ते भयाचे नव्हे तर आनंदाचे!

    हेही वाचा – गणिताचे सर… एका शिक्षकाच्या खडतर जीवन प्रवासाची सत्यकथा

    महेशच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या एका मित्राने सरांना घरी सोडले. अतिशय अदबशीर आणि विनम्र वागणे… इतक्या चांगल्या तरुणांना मी गुंड समजलो, सर मनातल्या मनात शरमले. गप्पांच्या ओघात सरांना समजले की, ‘ममता‘ ही महेशची एकुलती एक मुलगी आणि तिने खूप शिकावे, ही महेशची तीव्र इच्छा.

    मोठ्या खुशीत सर घरी परतले. त्यांनी सावित्रीबाईंना सर्व वृत्तांत सांगितला आणि ते एक लाख रुपयांचे पाकीट सावित्रीबाईंना दिले.

    सावित्रीबाईंनी पाकीट उघडले आणि त्या ओरडल्या, “सदा, यात एक लाख रुपयेच नाहीत….”

    “सावित्री, कसं शक्य आहे ते?” सदानंद आश्चर्याने म्हणाले.

    “सदा, अरे मला पूर्ण बोलू दे. अरे यात एक लाख रुपयेच नाहीत तर त्याचबरोबर एक लेटरहेडदेखील आहे, एका खूप मोठ्या माणसाचे. ते आहेत, ममता बँकेचे चेअरमन, ममता सहकारी संस्थेचे संस्थापक, ममता रिटेलचे संचालक आणि ममता फार्मचे मालक. त्यावर लिहिले आहे, “सर, तुमचा एकमेव विद्यार्थी, 10वी नापास झालेला आणि या अपयशाची खंत मनात कायम बाळगणारा, 10वी नापास म्हणून अनेकांकडून अपमानित झालेला तुमचा विद्यार्थी, महेश झोपे.”

    सरांचे डोळे पाणावले. सरांच्या पटकन लक्षात आले की, आपण ममता बँकेतून घेतलेले एक लाख रुपयांचे कर्ज आपल्याला परत फेडता यावे म्हणूनच महेशने गुरुदक्षिणेच्या रूपात आपल्याला एक लाख रुपये दिले. 20 वर्षे मनात असलेली अपयशाची भावना क्षणात नाहीशी झाली. निवृत्तीनंतर आता काय करायचे, हा प्रश्नदेखील मिटला होता. आता सरांना एक शाळा काढायची होती, एक आदर्श शाळा, अगदी महेशच्या मनात होती तशी!

    काम तसे सोपे नव्हते, परंतु सदानंद माने सरांसाठी ते अवघडही नव्हते, कारण आज सरांना कळले होते की, त्यांचे एकमेव अपयशच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश ठरले होते.

    गुरूच्या शब्दांचे बीज

    काळजात खोल रुजले

    एक “नापास” आयुष्य

    अंती यशवृक्ष बनले…

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026 ललित

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026 ललित

    बेटर हाफ

    June 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    By Team AvaantarJune 23, 2026

    हिमाली मुदखेडकर भाग – 4 पहिल्या सुनावणीनंतर जवळपास दोन महिने उलटले होते. मध्यंतरीच्या काळात आणखी…

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दहावी नापास

    June 23, 2026

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 337
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 728
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दहावी नापास

    June 23, 2026

    संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    June 23, 2026

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026
    Most Popular

    असेच कानावर पडलेले संवाद…

    June 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.