Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    लेडीज स्पेशल

    July 27, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – उच्च शिक्षण, प्रगती, स्थैर्य

    July 27, 2026

    वेटिंग लिस्ट

    July 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आईचं वाण…
    ललित

    आईचं वाण…

    Team AvaantarBy Team AvaantarJune 8, 2026Updated:June 9, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, लेकीकडे आईचे माहेरपण, महिलेला माहेरपणाची ओढ, माहेरपणाचे महिलांना कौतुक, प्राजक्ताचे आईबद्दलचे प्रेम, जावयाकडून सासूचे माहेरपण, जावयाचा सासूबद्दल आदर, जावयाचा सासूबद्दल स्नेह, शारदाताई आणि प्राजक्ताचा स्नेह, शारदाताईंची मुलगी प्राजक्ता
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अतुला प्रणव मेहेंदळे

    “प्राजक्ता, गोडाचा छान मंद सुवास येतोय गं! काय बनवते आहेस एवढं? मला अगदी फिरकूही देत नाहीयेस…” शारदा ताई हॉलमधूनच आपल्या लेकीला विचारत्या झाल्या. प्राजक्ताने मात्र ताकास तूर लागू दिला नाही. जावईबापू पराग आणि नातू श्रीकर हे डबा घेऊन गेले, तरीही त्यांना आज काय बेत आहे, ते काही कळले नाही. तशी कुणकुण लागली होती, पण लेकीच्या आनंदावर त्यांना अजिबात विरजण घालायचे नव्हते. दुपारी प्राजक्ताने दोघींची पाने घेतली आणि मग आईला हाक मारली. शारदा ताईंना थोडी डुलकी लागली होती. लेकीने हाक मारल्यावर मात्र त्यांना अगदी कानकोंडलं झालं. त्यावर प्राजक्ता म्हणाली, “आई, अगं एवढं काय त्यात! या वयात लागायचीच झोप… आणि उलट बरंच झालं, मला तुला कळू न देता पानं पण वाढता आली ना!” असं म्हणून तिने हसतच आईला पानावर बसवलं.

    शारदा ताई आनंदल्या. अगदी लहान अल्लड मुलीसारखी टाळी वाजवून त्यांनी दाद दिली. “वाह प्राजक्ता, माझ्या आवडीचे आयतमांडे आणि सोबत तिखट म्हणून अळूवडी… कित्ती छान! गेले कित्येक वर्षांत मी आयतमांडे केलेच नाहीत. सगळ्यांचं करता करता माझी आवड मात्र मी पूर्णतः विसरले होते बघ! पण तुला आवड लक्षात आहे माझी?” हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं…

    त्यावर प्राजक्ता घशाशी आलेला आवंढा गिळून म्हणाली, “आई, तू पोटभर खा. तुझी आवड मी नाही लक्षात ठेवणार तर कोण ठेवणार? अगं, तुला माझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी लक्षात असतात. लहानपणापासूनच त्या तू अगदी उत्तम जपल्या आहेत. मग मलाही तुझ्यासाठी एवढं करायला हवंच ना?”

    लेकीकडे सकौतुक बघत दोघी मायलेकी पोट तुडुंब होईपर्यंत मनसोक्त गप्पा मारत जेवल्या. दुपारी वामकुक्षी झाली आणि प्राजक्ताने वाफाळती कॉफी आईसमोर धरली. “काय हे प्राजक्ता, गेले 10-15 दिवस नुसतं माझं करण्यातच वेळ जातोय तुझा. अगं, इतके दिवस तुमचं काय ते वर्क फ्रॉम होम घेतलं आहेस, बॉस ओरडतील तुझे… आणि हे काय, तुझी कॉफी आण आणि बस बघू इकडे आधी.” प्राजक्ताने आतून तिचा कप आणला आणि दोघी गॅलरीमध्ये झोपाळ्यावर बसून निवांत कॉफी पीत बसल्या…

    हेही वाचा – अधिक मासाचं अनोखं वाण… जावयाकडून!

    “प्राजू, मी उद्या निघायचं म्हणते,” शारदाताई सहज म्हणाल्या. त्यावर प्राजक्ता खट्टू होत म्हणाली, “का गं आई, इतक्यातच चाललीस? कंटाळलीस का गं? घराची आठवण येतेय का? थांब ना अजून थोडे दिवस. 15 दिवसांत आपल्या अगदी निवांत अशा, पूर्वी बाबा झोपल्यावर रात्री बसून मारायचो, तशा गप्पाच झाल्या नाहीत. इतक्या वर्षांत दरवेळी कधी माझी गरज म्हणून, तर कधी तुझं डोळ्याचं ऑपरेशन म्हणून, कुठे इतर ठिकाणी जायचं म्हणून फक्त धावती भेट होत राहिली. मीच कायम माहेरपण करून घ्यायला येत राहिले. यावेळी मला संधी मिळाली आहे तर, तू मला का देत नाहीयेस?” हे बोलताना प्राजक्ता अगदी रडवेली झाली. त्यावर तिचा हातात हात घेत शारदाताई म्हणाल्या, “अगं वेडाबाई कित्ती करशील! मला तर वाटतंय मी आई म्हणून नाही तर, तुझी मुलगी म्हणून माहेरपणाला आलेय की काय! गेले 15 दिवस मी अगदी राणीसारखी राहिले बघ. 10 वर्षांपूर्वी तुझी आजी गेली आणि माहेर सुटलं. तशी मी खूप काही जातच नव्हते. पण आई आहे, ही गोष्ट खूप सुखावत होती बघ.”

    “आपल्याला अगदीच काहीच नाही तरी दोन दिवसाचं माहेरपण हवं असतं… काहीही म्हण अनेक वर्षं झाली कुठेतरी निवांत रहावं म्हटलं तरी जमलंच नाही! माहेर म्हणजे स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. अजूनही आईची रोज आठवण येतेच. अगदी हटकून येते बघ. मग मन हळवं होतं आणि खूप पोकळी निर्माण होते. मनात खूप काही चालू असतं पण घरात आता मी एकटीच. कुणाशी बोलायचं. आता या वयात आमच्यासारख्या म्हाताऱ्यांकडे सगळं असतं साड्या, वस्तू, भांडी अगदी सगळं. पण क्वचित सरप्राइज म्हणून आठवण ठेवून कुणीतरी गिफ्ट दिलं, आवडीचे दोन पदार्थ दिले, एवढंच काय साधी येता जाता चौकशी केली ना तरी आमचा आनंद गगनात मावत नाही बघ! …आणि हे सगळं सगळं तू गेल्या 15 दिवसांत केलंस. अगदी गरम गरम तव्यावरची पोळी म्हणू नकोस, परवा रात्री केसांना तेल लावून देणं म्हणू नकोस…. माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ घातलेस. अगं, तूच काय जावयांनी पण कित्ती केलं माझ्यासाठी! आता मात्र निघते. अगं थोडक्यात समाधान मानावं. नाहीतर तुम्हाला कंटाळा येईपर्यंत राहिले तर मलाच त्रास होईल,” असं म्हणून डोळ्यातलं पाणी लपवत त्या लगोलग आपल्या खोलीत गेल्या.

    दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार असल्याने पराग आणि श्रीकर दोघेही सासूबाईंना आणि लाडक्या आजीला सोडायला बस स्टँडवर जाणार होते. शारदाताई बॅग घेऊन हॉलमध्ये आल्या आणि प्राजक्ताने हाताला धरून आईला स्वयंपाकघरात देवासमोर खुर्चीवर बसवलं. “काय गं, आता काय झालं?” असं विचारताक्षणी प्राजक्ताने भरल्या ओटीच ताट आईसमोर आणलं… “आई मी तुझी साडी देऊन ओटी भरणार आहे.”

    शारदाताई थोड्या चरकल्या. त्या तशा जुन्या विचारांच्या. बाबा हयात नसताना प्राजक्ताने असं करावं, याचं भय त्यांच्या चेहऱ्यावर प्राजक्ता आणि परागला स्पष्ट दिसलं. तेव्हा सासूच्या समोर मांडी घालून बसत परागच म्हणाला, “आई, अहो यात काही गैर नाही. अहो बाबा नसले म्हणून काय झालं. ते आपल्यातच आहेत आजूबाजूला. या जुनाट गोष्टीवर आमचा अजिबात विश्वास नाहीये. अहो, दरवेळी प्राजक्ता माहेराहून निघताना तुम्ही तिला भरभरून देता आणि माहेरची ओटी भरता. त्यात तुम्ही पहिल्यांदाच इतके दिवस आमच्याकडे राहिलात. यावेळी भरपूर दिवस आम्हाला मज्जा आली, आईची सेवा करायला! माझी आई नाहीये आता, त्यामुळे आता तुम्हीच माझी आई आहात… आणि आज तर हा तुमचा मान आहे. आजपासूनच अधिक महिना चालू झाला आहे. दर वेळी अधिक महिन्यात तुम्ही आम्हाला देत आलात, आता आमच्याकडून ही प्रेमाची भेट समजा!”

    हेही वाचा – धोंडा माझा भला…

    “तुम्हीच म्हणालात ना माझं इतक्या वर्षांनी छान माहेरपण झालं. खरंतर तुम्ही आई म्हणूनच हा अधिक महिन्याचा मान स्वीकारायला हवा. पण तुम्हाला अडचणीचं वाटत असेल तर यावेळी आपण असं म्हणू की, तुम्ही आमच्याकडे माहेरपणाला आला होतात तर, आज प्राजक्ता तुमची आई आणि तुम्ही तिची ‘लेक’! नाही म्हणू नका आई. तुमच्या लेकीला आणि जावयाला बरं वाटेल…”

    परागचं हे म्हणणं ऐकल्यावर शारदाताईंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. समोर लेक आणि जावयाच्या रूपाने त्यांना आपले आई-वडीलच उभे आहेत, असंच वाटलं. त्यांनी आनंदाने लेकीच्या ओटीरुपी वाणाचा आणि आईपणाच्या सन्मानाचा स्वीकार केला. आज एक आई आणि तिचं माहेरपण सगळ्यांच्याच डोळ्यांतून ओतप्रोत भरून वहात होतं…

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    लेडीज स्पेशल

    July 27, 2026 ललित

    वेटिंग लिस्ट

    July 27, 2026 ललित

    Bookshelf : अमूल्य ठेव्याची नीट ओळख करून देणारे ‘राम रामेति रामेति…’

    July 26, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    लेडीज स्पेशल

    By अतुला प्रणव मेहेंदळेJuly 27, 2026

    “अरे वरुण, आई कुठेच दिसत नाहीये! कुठे गेली सकाळी सकाळी? खोलीत नाहीये… आणि इकडे पण…

    वेटिंग लिस्ट

    July 27, 2026

    Bookshelf : अमूल्य ठेव्याची नीट ओळख करून देणारे ‘राम रामेति रामेति…’

    July 26, 2026

    नळ स्टॉपची कहाणी…

    July 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    लेडीज स्पेशल

    July 27, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – उच्च शिक्षण, प्रगती, स्थैर्य

    July 27, 2026

    वेटिंग लिस्ट

    July 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हृदयशुद्धीचां आवारीं, आराध्यु तो धुरु करी

    July 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जुलै 2026

    July 27, 2026

    Bookshelf : अमूल्य ठेव्याची नीट ओळख करून देणारे ‘राम रामेति रामेति…’

    July 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 374
    • अवांतर 199
    • आरोग्य 133
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 508
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 809
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    लेडीज स्पेशल

    July 27, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – उच्च शिक्षण, प्रगती, स्थैर्य

    July 27, 2026

    वेटिंग लिस्ट

    July 27, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.