Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    June 3, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!
    ललित

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    Team AvaantarBy Team AvaantarJune 3, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, आईचे मृत्यूपत्र, वडिलांचे मृत्यूपत्र, प्रेमाची जोडणी करणारे मृत्यूपत्र, भावाबहिणीच्या प्रेमाचे मृत्यूपत्र, मुलीच्या माहेरपणाचे मृत्यूपत्र, भावाला बहिणीच्या पाठबळाच मृत्यूपत्र, भावाबहिणीच्या प्रेमाची जोडणी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    हल्ली ती झोपूनच असायची. फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं. तसं वयही झालं होतं म्हणा… नवरा गेल्यापासून डोळे मिटून गतजीवनातल्या घडामोडी आठवत राहायची.  आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्युपत्राची आठवण आली. तो दिवस आठवला…

    चार दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागदं फाडायच असं सुरू होत. तिने विचारलं,

    “काय करताय?”

    “महत्त्वाचं काम करतोय… मृत्युपत्र लिहितोय! विचार करून ते लिहायचं असतं…”

    “काय मृत्युपत्र? आत्ता…? कशासाठी?”

    “आत्ता नाही तर कधी करणार? सगळं व्यवस्थित केलं म्हणजे मुलांना काळजी नको.”

    “म्हणजे वाटणी का?”

    यावर तो जरा रागवलाच…

    “नुसती वाटणी नसते ती…! बरं ते जाऊ दे… उगीच काहीतरी विचारत बसू नको… तुला काय त्यातल समजणार? एक वाजायला आलाय जेवायला वाढ.”

    ती गप्प बसली.

    खरंच आपल्याला काय कळणार? आणि समजा काही सांगितलं तरी, त्यांनी काही ऐकून घेतलं नसतं! त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं.

    नेहमीचच होतं ते… त्याचं बोलणं तिने मनावर घेतलं नाही. तरी आत कुठेतरी वाईट वाटलच…

    का कोण जाणे… पण गेले काही दिवस मृत्युपत्र हेच तिच्या डोक्यात होतं… आज लेक भेटायला येणार होती. ती आल्यावर तिच्याजवळ हा विषय काढायचा, असं तिने ठरवले.

    लेक आली. थोड्यावेळाने तिने तिला जवळ बोलावले आणि म्हणाली, “माझ्या मनातली एक गोष्ट तुला सांगायची आहे.”

    “सांग ना…”

    “मला मृत्युपत्र करायचं आहे…”

    आईचं बोलणं ऐकून लेकीला आश्चर्यच वाटले.

    “तुला मृत्युपत्र करायचंय? कशासाठी? काय लिहिणार आहेस त्यात?”

    मुलीने जरा हसत विचारलं.

    हेही वाचा – हा खेळ कागदांचा…

    आईचं लक्षच नव्हतं. ती तिच्याच नादात होती. पुढे म्हणाली,

    “अगं एक महत्त्वाच विचारायचं होतं, मृत्युपत्र लिहिले की, त्याप्रमाणे वागावं लागतं का? ते बदलता येत नाही ना?”

    आईचा शांत संयमित आवाज ऐकून लेकीच्या लक्षात आलं… आई गंभीरपणे काही सांगते आहे. ती म्हणाली…

    “हो नाही बदलता येत… त्याप्रमाणेच करावं लागतं. पण आई आज असं का विचारते आहेस?”

    “मला पण करायचे आहे मृत्युपत्र. आण कागद… पेन… घे लिहून…”

    “अगं कशाची वाटणी करणार आहेस? काय आहे तुझ्याजवळ?”

    लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं… ती तंद्रितच बोलत होती…

    “भावांनी बहिणीला वर्षातून एकदा माहेरपण करायचं… राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं. त्याला ओवाळायचं… तबकात अगदी अकरा रुपये टाकले तरी चालतील… ते महत्त्वाचं नाही! भावाला घरी बोलवायचं. गौरीला माहेरची सवाष्ण हवी… नाही जमलं तर एखाद्या श्रावणी शुक्रवारी तिला घरी बोलवायचं… तिची ओटी भरायची. बहिणीने भावाच्या अडीनडीला धावून जायचं… त्याला मदत करायची. वहिनीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं तिच्यावर माया करायची… आपापसात सगळ्यांनी प्रेमाने, आनंदाने आपुलकीने राहायचं… आत्या, काकू, मामा, मामी सगळी नाती जपायची… एकोप्याने रहायचं. पुढच्या पिढीने पण हे असंच सुरू ठेवायचं…”

    एवढं बोलल्याने ती दमली, मग श्वास घेण्यासाठी थोडा वेळ थांबली.

    लेक थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती… आई मनाच्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेलं अंतरंग तिच्याजवळ उघडं करत होती…

    “तू विचारलंस ना, माझ्याकडे काय आहे वाटणी करायला? खरंच, काही नाही गं… मला वाटणी नाहीच करायची तर, तुमची जोडणी करायची आहे. तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे… आलं गेलं तरच ती टिकून राहील! हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असं समजा.”

    हेही वाचा – म्हातारा-म्हातारी आणि मृत्यूपत्र!

    लेकीचे डोळे भरून वाहत होते. आईची प्रांजळ भावना तिला समजली. तिने आईचा हात हातात घेतला… त्यावर थोपटलं… आश्वासन दिल्यासारखं! आपल्या मुलाबाळांचं पुढचं आयुष्य सुखात जावं म्हणून लाखमोलाचं सद्विचारांचं धन आईनी आज वाटलं होतं…

    दारात भाऊ भावजय मायलेकींचं बोलणं ऐकत उभे होते. ते आत आले त्यांनीही आईचा हात हातात घेतला.

    चौघांचे डोळे भरून वाहत होते.

    आता ती निश्चिंत झाली होती. खूप दिवसांनी ती समाधानाने हसली. मनात म्हणाली…

    ‘रामराया आता कधीही येरे न्यायला मी तयार आहे!’


    मोबाइल – 9763631255

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Bookshelf : तुंबाडचे खोत… काळ कोणताही असो माणूस तोच!

    June 2, 2026 ललित

    आंधळा मागतो एक डोळा…

    June 2, 2026 ललित

    वर्षश्राद्ध

    June 1, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : तुंबाडचे खोत… काळ कोणताही असो माणूस तोच!

    By डॉ. अस्मिता हवालदारJune 2, 2026

    लेखक श्री ना पेंडसे यांचे ‘तुंबाडचे खोत’ म्हणजे, दोन खंडांत, चार भागांत 1358 पानांत लिहिलेली…

    आंधळा मागतो एक डोळा…

    June 2, 2026

    वर्षश्राद्ध

    June 1, 2026

    अधिक मासाचं अनोखं वाण… जावयाकडून!

    June 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    June 3, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026

    Dnyaneshwari : जी विश्वरूपाचां सागरीं, होतों तरंग मवित वांवेवरी

    June 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 जून 2026

    June 3, 2026

    Bookshelf : तुंबाडचे खोत… काळ कोणताही असो माणूस तोच!

    June 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 317
    • अवांतर 189
    • आरोग्य 116
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 441
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 218
    • मैत्रीण 20
    • ललित 673
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    June 3, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.