Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मे 2026

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, May 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » दिनचर्या… तिची अन् त्याची!
    ललित

    दिनचर्या… तिची अन् त्याची!

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेMay 18, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, महिलेची दिनचर्या, पुरुषाची दिनचर्या, सबनीसांची दिनचर्या, माझी दिनचर्या, महिलांच्या घरच्या जबाबदाऱ्या, महिलांच्या कार्यालयीन जबाबदाऱ्या, कर्तव्यदक्ष गृहिणी, एकल मातेची जबाबारी, सबनीसांचे टोमणे मारणे, सबनीसांची कानउघाडणी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज थोडा उशीरच झाला ऑफिसमध्ये पोहोचायला. पोहोचले सव्वा दहा वाजता. नुसती धावपळ, घामाघूम करणारी. ऑफिसच्या वातावरणात गेल्यावर, थंडाव्याचं मोरपीस अंगावर फिरल्यावर जरा बरं वाटलं. तशी साडेनऊची वेळ, पण एक तास flexi time असतो. साडेनऊ ते साडेदहा या तासाभरात कधीही येऊ शकता तुम्ही… तेवढा वेळ उशिरापर्यंत थांबायचं म्हणजे दिवस गणला जातो.

    धप्पकन् बसले खुर्चीत, ओढणीनं वारा घेत. ग्लासभर पाणी ढोसल्यावर जरा जीवात जीव आला. वॉशरूममध्ये जाऊन तोंडावर पाण्याचे सपकारे मारून, पावडरचा हलकासा हात फिरवून, केस सारखे केल्यावर बरं वाटलं.

    लॅपटॉप उघडला, त्याला मनोभावे नमस्कार केला रोजच्याप्रमाणे आणि लॉगिन केलं. कामाचा फड आता रंगात येणार होता. सव्वाअकराची गूगल मीट होती. मुद्द्यांची उजळणी केली आणि अजून अर्धा तास हातात आहे, हे बघून जरा हायसं वाटलं.

    शेजारच्या वर्क स्टेशनवर नजर टाकली. लवकर येऊन बसणारे माझे सख्खे शेजारी, म्हणजे सबनीस… बसले होते आरामात. थोडासा विचित्र माणूस. आत्मप्रौढीत रमलेला, पण कामात चोख. टोमणे मारण्याची आणि नको तिथे नाक खुपसण्याची सवय सोडली, तर बाकी छान माणूस.

    नजरानजर झाल्यावर म्हणाले, “काय, आज पण उशीर?”

    मी कसनुसं हसले, म्हणाले – “गाड्या लेट होत्या…”

    “छे!! काहीही काय? मी आलोय सव्वानऊलाच. गाड्या वेळेवर आहेत आज. तुम्हालाच उशीर झालाय, मान्य करा ना!”

    हे आता नेहेमीचंच झालं होतं. मी वैतागले थोडीशी, पण वाद घालून दिवस नासवायचा नव्हता मला. मनात म्हटलं, आज यांची तंगडी यांच्याच गळ्यात घालू.

    विचारलं त्यांना, “का हो सबनीस, किती वाजता उठता तुम्ही?”

    “साडेपाचला!” अशा स्वरात जणू काही फार मोठा तीर मारलाय…

    “एवढ्या लवकर?”

    “हो, चालायला जातो, थोडी योगासनं करतो आणि साडेसहापर्यंत घरी येतो.”

    “नंतर?”

    “दाढी, आंघोळ, थोडं पेपर वाचन, मोबाइल यांच्यात रमतो… डबा घेतो आणि निघतो. ठरलेली गाडी, ठरलेला ग्रुप… मस्त मजेत प्रवास करून येतो ऑफिसला.”

    “आणि संध्याकाळी?”

    “घरी जातो, आवरतो. चहा घेतो, घरातली काही किरकोळ कामं असली तर करतो. तोपर्यंत स्वयंपाक तयार असतो. सोबत जेवतो आम्ही सगळे. नंतर ती आवरते, मी बातम्या बघतो. थोडावेळ टंगळमंगळ करतो आणि मग गुडूप. संपला दिवस… का हो, आज अगदी माझी दिनचर्या विचारलीत?”

    “काही नाही सहज. तुम्ही रोज वेळेवर कसे येता, ते जाणून घ्यायचं होतं. विशेष नाही काही…”

    “मी पण सकाळी सहाला उठते. उठावंच लागतं. सासूबाई आजारी असतात. त्यांना आणि सासऱ्यांना चहा देते. घोटभर मी घेते. लेकाचं कॉलेज असतं, त्याला हाका मारायला सुरुवात करते. कणिक भिजवते एकीकडे आणि भाजी फोडणीस टाकते. नाश्ता असतोच करायचा काहीतरी, त्याची तयारी करते. हे गेल्यापासून लेक जरा जबाबदारीनं वागतोय, पण सकाळी हल्या हल्या करून उठवावं लागतं, तेव्हा कुठे उठतो. त्यातही बराच वेळ मोडतो. पोळ्या, डबे भरणं, ओटा आवरणं आणि मग हे सगळं झाल्यावर आंघोळ आणि स्वतःचं आवरणं… कुकर लावतात नंतर सासूबाई त्यांच्यापुरता, पण पोळी भाजी करावीच लागते मला. पर्याय नसतो!”

    हेही वाचा – तो डंख कुरवाळला अन्…

    “घाईघाईत आवरते… हे सगळं होईपर्यंत साडेसात झालेले असतात. मग मशीन लावते धुण्याचं, कपडे सासरे वाळत घालतात, पण त्यांना मशीन नाही लावता येत, म्हणून तेही मलाच लावावं लागतं… आमचं घर लांब आहे स्टेशनपासून. खाली उतरल्यावर बसच्या रांगेत उभी राहते. तिथून स्टेशन, लोकल आणि मग ऑफिस असा द्राविडी प्राणायाम असतो…”

    “संध्याकाळी जाताना भाजी, किराणा, फळं असं घेऊन जाते. घरी गेल्यावर सासूबाई चहा देतात हातात. तो घेऊन परत ओट्याशी. ताज्या पोळ्या, भाजी, वरण भात असं साग्रसंगीत जेवण… नंतर ओटा आवरणं, उद्याच्या डब्याची तयारी करणं, यात मग उरलेला वेळ खर्ची पडतो आणि डोळे मिटायला लागतात आपसूक. पाठ टेकल्याटेकल्या जी झोप लागते, ती सकाळी गजर झाल्यावरच उघडते. परत रामरगाडा सुरू…”

    “रविवारी तुम्ही जशा फर्माईशी करता बायकोकडे, तशा लेक करतो. मग काहीतरी चटपटीत करावं लागतं. शनिवारी बँकांची कामं असतातच. एकटीने गाडा ओढायचा म्हणजे जीव मेटाकुटीला येतो… त्यात तुमची आणि इतर लोकांची तिरकस बोलणी. सहानुभूती, कणव वगैरे नको, पण थोडासा समजूतदारपणा हवा असतो समाजाकडून. तोच आवश्यक असतो, पण नाही मिळत! तुम्हाला काय हो, स्वतःचं आवरायचं आणि चालू पडायचं. मग सव्वानऊ काय, सव्वाआठला पण येऊ शकता तुम्ही. एकदा माझ्या भूमिकेत शिरून बघा एखादा दिवस, मग किती वाजता येणं होतंय ते पाहूया आपण.”

    “हो, मी येते दहाच्या नंतर कधीकधी, पर्याय नसतो, पण संध्याकाळी थांबते वेळ पूर्ण होईपर्यंत, हे सोयीस्कररित्या विसरता तुम्ही.”

    माझ्या तोंडाचा दांडपट्टा सुरू झाला होता आणि सबनीस बिचारे हवालदिल झाले होते. बोलताबोलता पाणी तरळलं माझ्या डोळ्यात आणि तेवढ्यात मीटिंग रिमाइंडर वाजलं. दहा मिनिटं होती हातात. पटकन पाणी मारून आले तोंडावर आणि आवेग दडवून हास्याचा मुखवटा चढवला…

    हेही वाचा – ऑफिसचा डबा आणि आलू पराठे!

    सर्कशीतला विदूषक जसा स्वतःची दु:खं दडवतो मुखवट्यामागे, तशी मी, माझ्या वेदना दडवून सिद्ध झाले होते लढण्यासाठी, परत एकदा.

    सबनीसांना “सॉरी” म्हंटलं, पण तेच मला म्हणाले, “मॅडम, हे सगळं मला ठाऊक असायला पाहिजे होतं. यापुढे बोलताना मी खरंच काळजी घेईन. माझे डोळे उघडलेत तुम्ही.”

    सबनीसांची अपराधी नजर मग त्यांच्या लॅपटॉपकडे वळली आणि ते कामाला लागले त्यांच्या…

    माझ्या या स्पष्टवक्तेपणामुळे तिरकस बोलणी बंद होऊन विसंवादाचं रूपांतर आता तरी सुसंवादात होईल अशी आशा बाळगून मी हेडफोन चढवले आणि मीटिंगमध्ये शिरले…

    दिवस आत्ता कुठे सुरू होत होता.

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026 ललित

    शेअर बाजार अन् सामंत काका

    May 18, 2026 ललित

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    By सुधीर करंदीकरMay 18, 2026

    यावर्षी उन्हाळा खूपच म्हणजे खूपच जास्त जाणवतो आहे. उन्हात फिरल्यामुळे बऱ्याच जणांना छोटे मोठे आजार…

    शेअर बाजार अन् सामंत काका

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026

    लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी

    May 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मे 2026

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026

    दिनचर्या… तिची अन् त्याची!

    May 18, 2026

    Kitchen Tips : मटकीचे सूप, व्हेज पुलाव, कडधान्याची उसळ बनविताना…

    May 18, 2026

    शेअर बाजार अन् सामंत काका

    May 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 302
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 424
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 210
    • मैत्रीण 19
    • ललित 634
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मे 2026

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.