Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी
    ललित

    लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी

    प्रणाली मंगेश महाशब्देBy प्रणाली मंगेश महाशब्देMay 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, अधिक मासाचे वाण, अधिक मास, अधिक मासातील धोंड्याचे जेवण, लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी, अधिक मासात जावयाचे कौतुक, अधिक महिन्यात सूनेचे कौतुक, जावई सून दोन्ही सारखेच, कुटुंब राखणारी सून, घरातल्या लक्ष्मीचे कौतुक, गृहलक्ष्मीचे कौतुक
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अधिक महिना सुरू होण्यापूर्वीच कितीतरी दिवस आधीच त्याचे वेध लागले. सगळीकडे जावयाला काय काय देता येईल याबद्द्ल वेगवेगळ्या कल्पना समोर येत आहेत… आणि अशातच मन थोडे विचारात रमले. मुलगी जन्माला येतेच मुळी लक्ष्मीच्या पावलांनी. लक्ष्मी जन्माला आली असेच म्हटले जाते. (नारायण जन्माला आला असे नाही म्हणत.) तेवढ्याच लाडात तिला वाढवले जाते. वयात आल्यावर लग्न होते आणि या लक्ष्मीला नारायण मिळतो. लग्नाला येणारा प्रत्येकजण, मग तो कोणाच्याही बाजूचा असो, “किती छान लक्ष्मी-नारायणाचा जोडा आहे” असेच म्हणत असतो. सासरी तर तिचे गृहलक्ष्मी म्हणूनच स्वागत केले जाते.

    लक्ष्मी (गृहलक्ष्मी)- नारायणाचा प्रवास सुरू होतो. वेगवेगळे सण, कार्यक्रम, सोहळे दोघांचे एकमेकांच्या साथीने सुरू होतात. पहिल्या वर्षात दोन्हीकडील सणांमध्ये हे लक्ष्मी (गृहलक्ष्मी)- नारायण आनंदाने सहभागी होतात. नंतर काळानुसार अनेक गोष्टींमध्ये बदल होत जातात. त्यातूनच मधून मधून येणारा अधिक महिना दोघांनाही लक्ष्मी-नारायण असल्याची आठवण करून देत असतो!

    पहिली एक-दोन वर्षं हा नारायण पण, सासु-सासऱ्यांना पुण्य मिळते म्हणून किंवा इतर काही कारणामुळे अधिक महिन्यात आवर्जून सासुरवाडीला जातो. धोंडे खाऊन, वाण घेऊन येतो. (सासु-सासरे काही कमवत नसले तरी, जावयाचे वाण स्वत:च्या ऐपतीप्रमाणे करत असतात. शक्यतो मुलाकडून त्यासाठी मदत घेण्याचे टाळतात.) नंतर मात्र हा नारायण काही कारण काढून, नेहमी नेहमी कशाला? असा विचार करून किंवा अन्य काही कारणाने जाण्याचे टाळू लागतो. काही ठिकाणी तर सासु-सासऱ्यांच्या पश्चात काही भाऊ आवर्जून बोलावतात. पण तेथे पण ‘आता कशाला’ म्हणणारे किंवा ‘नाते जपायचे आहे’ असे म्हणून भावाचा मान ठेवत जाणारे पण अनेक नारायण दिसतात. काही असो यामध्ये त्या लक्ष्मीला काही महत्त्व दिसत नसले तरी तिच्यासाठी तर माहेरी जाण्याचे ते निमित्त असते!

    हेही वाचा – गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    माहेरची लक्ष्मी खरंतर आता सासरी पूर्णपणे मिसळून गेलेली असते. लक्ष्मीची गृहलक्ष्मी झालेली असते. नारायण पण आई-वडिलांसाठी जबाबदार व्यक्ती झालेला असतो. मग मनात येते की सासू-सासऱ्यांचे पुण्य फक्त लक्ष्मीच्याच आई वडिलांना का? सासू-सासरे म्हणून तर नारायणाचे पण आई-वडील आहेतच की! त्यांच्या लेखी पण मुलगा आणि सून हे लक्ष्मी (गृहलक्ष्मी)-नारायणच आहेत की… मग जसे जावयाचे कौतुक केले जाते, तसे खरेतर त्यापेक्षा जास्त सुनेचे कौतुक केले गेले पाहिजे. जावई हा कायम सासुरवाडीचा पाहुणाच असतो. पण सून घरची असते. ती दोन्ही घरं तेवढ्याच ताकदीने संभाळते. मग तिचे पण कौतुक यानिमित्ताने का होईना, करायला काय हरकत आहे!

    गृहलक्ष्मीचे कौतुक करण्याची, तिला छान वाण नाही, पण निदान काही बक्षीस देण्याची किती छान संधी! असे अचानक झालेले कौतुक हे पुढे घरातील सौख्य, आनंद टिकवण्यासाठी नक्कीच मदत करेल आणि तेव्हाच लक्ष्मी ही सर्वार्थाने गृहलक्ष्मी म्हणून मिरवेल. नेहमीच तिच्याबरोबर असणारा नारायण आहेच की, त्यानिमित्ताने तो पण आई-वडिलांकडून थोडे कौतुक करून घेईल.

    हेही वाचा – घरासमोरची रांगोळी आणि बरेच काही…

    कन्यादान असो नाहीतर अधिक महिना हे पुण्य फक्त मुलीच्या आई-वडिलांनाच मिळते. परंतु आजकाल घरात फक्त एक मुलगा किंवा एक मुलगी असते, अशा वेळेस मुलाच्या आई-वडिलांना असे काही करता येत नाही. तेव्हा, असा अधिकचा विचार करायला काय हरकत आहे? अनेक बदल स्वीकारत आहोत, मग हा पण बदल स्वीकारून बघू… आणि यावर्षीपासून गृहलक्ष्मीचे पण कौतुक करू!

    प्रणाली महाशब्दे
    प्रणाली मंगेश महाशब्दे

    संचालिका सोहन वाचन कट्टा, लेखिका, निवेदिका, Counsellor, Signature Analyst, Music Therapist, Flower Remedies Therapist, NLP practitioner, 25 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. Online-offline स्वरूपात अनेक ठिकाणी मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत. मोबाइल – 9730020494

    Related Posts

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026 ललित

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026 ललित

    सदाफुली… पण विरहात मलूल झालेली!

    May 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    By शोभा भडकेMay 17, 2026

    भाग – 26 “चला… चला… पटकन नाव घ्या दोघे आणि लवकरात लवकर प्रवेश करा घरात,”…

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026

    सदाफुली… पण विरहात मलूल झालेली!

    May 16, 2026

    “खरा डाव आता सुरू होतोय…”

    May 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    May 17, 2026

    लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी

    May 17, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 17 ते 23 मे 2026

    May 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 301
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 423
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 209
    • मैत्रीण 19
    • ललित 631
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.