मेष
- या आठवड्यात केलेली मध्यस्थी लाभदायक ठरेल. गुरु-शुक्र सहयोगामुळे घरात शुभवार्ता समजतील. नोकरदारांना कामांची जबाबदारी सहज पूर्ण करता येईल. तुमच्या ओळखीतील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकाल. व्यावसायिक वर्गाला नवीन प्रॉडक्ट बाजारात आणता येईल. नवीन गोष्टी अमलात आणू शकाल. महिलांना काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. पाहुणेमंडळी आल्याने घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
वृषभ
- या आठवड्यात रवी-हर्षल सहयोग संमिश्र फळ देईल. नोकरदारांनी कामाचे योग्य नियोजन करावे. त्यामुळे कामाचे कौतुक होईल. काही नवीन ओळखी होतील, जे लाभदायक ठरतील. व्यावसायिक वर्गाचे नवीन उपक्रम मार्गी लागतील. त्यामुळे प्रसिद्धी मिळू शकते. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांची गैरसमजातून भांडणे होण्याची शक्यता आहे. ही स्थिती टाळण्यासाठी गोष्टी स्पष्टपणे बोला, स्वतःचे मत ठामपणे मांडा. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल.
मिथुन
- या आठवड्यात गुरु-शुक्र सहयोग आयुष्य गतिमान ठेवेल. नोकरदारांना पर्यटनाची संधी मिळेल. मित्रांबरोबर संस्मरणीय वेळ व्यतीत कराल. काही नवीन ओळखी होतील. व्यावसायिक वर्गाचे महत्त्वाचे करार पूर्ण होतील. स्वतःवर विश्वास ठेवा, तर आणखी पुढे जाल. मुलांच्या उत्कर्षामुळे आनंदी रहाल. महिलांना भावाबद्दल चिंता राहील. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम करावे लागतील.
कर्क
- हा आठवडा कलाकारांसाठी महत्त्वाचा काळ आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी हितशत्रू त्रास देऊ शकतात. तथापि, त्यांना मोठ्यांच्या आशीर्वादाचे पाठबळ मिळेल. व्यावसायिक वर्गाला कर्तृत्व सिद्ध करता येईल. नवीन रोजगार निर्माण करू शकाल. तरुण आणि तडफदार स्टाफ मिळेल. महिलांची द्विधा मनःस्थिती होऊ शकते. परिणामी, निर्णय घेणे अवघड जाईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करावे. स्पर्धा परीक्षा द्याव्यात.
सिंह
- या आठवड्यात प्रलोभनांपासून दूर रहा. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. पण तरी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःची कामे स्वतः करा. तसेच, दुसऱ्याचे श्रेय घेऊ नका. व्यावसायिक वर्गाने भागीदारापासून काहीही लपवू नये. व्यवहारात स्पष्टता ठेवावी, अन्यथा कलह होऊ शकतो. महिलांना कुटुंबात मान-सन्मान मिळेल. तुमचे मत ग्राह्य धरले जाईल. विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणींपासून सावध राहावे. आपले वाहन कोणालाही देऊ नका.
हेही वाचा – “खरा डाव आता सुरू होतोय…”
कन्या
- या आठवड्यात घरातील प्रिय व्यक्तीचा भाग्योदय होईल. नोकरदारांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये वरिष्ठ तुम्हाला सहभागी करून घेतील. व्यावसायिक वर्गाने आपल्या प्रॉडक्टची योग्य पद्धतीने जाहिरात करणे फायद्याचे ठरेल. महिलांना वृद्धांची सेवा करावी लागेल. तसेच प्रवासाचाही योग आहे. होऊ विद्यार्थ्यांचा हा आठवडा खूप धावपळीचा जाईल.
तुळ
- या आठवड्यात सकारात्मक विचार करणे फायद्याचे ठरेल. नोकरदारांना सरकारी माध्यमातून लाभ मिळेल. कामाचे आणि वेळेचे योग्य नियोजन करा, त्यामुळे ताण कमी होईल. व्यावसायिक वर्गाने स्पर्धकांपासून सावध राहावे. नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करावी, प्रसंगी जाणकारांचा सल्ला घ्यावा. महिलांना नवीन खरेदी करता येईल. तसेच, माहेरी जाऊन सर्वांना भेटता येईल. विद्यार्थ्यांनी वाहन जपून वापरावे, वेगावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक
- या आठवड्यात नैराश्य दूर होईल. अपयशावर मात करू शकाल. नोकरदारांनी स्त्री सहकाऱ्यांशी सांभाळून बोलावे, अन्यथा ते त्रासदायक ठरू शकते. भावनांचा उद्रेक टाळावा. व्यावसायिक वर्गाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. गुरु-शुक्र सहयोग चांगले बदल घडवेल. महिलांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. त्यांना धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.
धनु
- या आठवड्यात भाग्योदय होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल, तडफदारपणे कामे पूर्ण करू शकाल. तुमच्या कामगिरीवर वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाला नवीन कामांमध्ये अनेक समस्या येतील, पण त्यातून यशस्वीपणे मार्ग काढू शकाल. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी. उन्हात फिरणे शक्यतो टाळावे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत निराशाजनक प्रसंग येऊ शकतात, पण त्यातून स्वतःला सावरून पुढे जाता येईल.
मकर
- या आठवड्यात विशेष असे काही घडणार नाही. नोकरदारांना कामाचा कंटाळा येईल. अशातच वरिष्ठ नवीन जबाबदाऱ्या देतील. हे नवीन काम करताना थोडा ताण जाणवेल. व्यावसायिक वर्गाला नवीन प्रकल्प सुरू करताना पैशाची गरज भासेल. अशा वेळी भागीदार आणि बँकेची मदत मिळू शकते. घरातील मदतनीसने अचानक सुट्टी घेतल्याने महिलांची कामे वाढतील. विद्यार्थ्यांना मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.
कुंभ
- या आठवड्यात कोणताही शॉर्टकट वापरू नका. नोकरदारांची कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील, त्याचा योग्य फायदा करून घ्या. व्यावसायिक वर्गाला काम करण्याच्या पद्धतीमुळे मोठा फायदा होईल. नवीन भागीदारांवर प्रभाव पडेल. महिलांना घरात धार्मिक कार्य आयोजित करता येईल. तसेच, घरासाठी नवीन खरेदी करू शकतील. विद्यार्थ्यांना आजोळी भाऊ-बहिणींबरोबर सुट्टी आनंदात घालवता येईल.
हेही वाचा – लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
मीन
- या आठवड्यात खूप निराश वाटू शकते. पण, घरात धार्मिक कार्य घडेल, त्यामुळे काहीसा उत्साह येईल. नोकरदारांच्या कामात आणि जागेत बदल होऊ शकतो. नवीन ओळखी होतील. नवीन अनुभव मिळतील. व्यावसायिक वर्गाला व्यापारात नफा होईल, पण पैसे मिळण्यास उशीर होईल. नवीन कामे देखील मिळतील. महिलांना घरात खूप शांत वातावरण जाणवेल. रोजची धावपळ कमी होईल, तरी उदासपण वाटू शकते. विद्यार्थ्यांना छोटा पार्ट-टाइम जॉब मिळू शकतो. त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.


