Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 15, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 15 मे 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 25 वैशाख शके 1948; तिथि : त्रयोदशी 08:31, चतुर्दशी 29:11; नक्षत्र : अश्विनी 20:15;
    • योग : आयुष्मान 14:21; करण : विष्टि 18:55;
    • सूर्य : मेष; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:04;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    शिवरात्री

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    श्रेष्ठ मराठी समीक्षक रा. श्री. जोग

    टीम अवांतर

    श्रेष्ठ मराठी समीक्षक रामचंद्र श्रीपाद म्हणजेच रा. श्री. जोग यांचा  जन्म 15 मे 1903 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या गावी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून संस्कृत आणि मराठी हे विषय घेऊन ते बीए आणि  एमए झाले. 1926-63 या काळात नाशिक येथील हं. प्रा. ठा. कॉलेज, सांगलीचे विलिंग्डन कॉलेज, तसेच पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज  येथे संस्कृत आणि मराठी या विषयांचे प्राध्यापक होते.

    ‘निशिगंध’ या टोपण नावाने कवी म्हणून त्यांचा साहित्यक्षेत्रात प्रवेश झाला. ‘ज्योत्स्नागीत’ तसेच ‘निशागीत’ हे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. सरल भावाविष्कार हे त्यातील कवितांचे वैशिष्ट्य. नंतर मात्र त्यांनी साहित्यशास्त्र आणि काव्यसमीक्षा हेच आपले कार्यक्षेत्र मानले.

    अभिनव काव्यप्रकाश या ग्रंथात संस्कृत काव्यशास्त्राची तत्त्वे साररूपाने मराठीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याने पुढे महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांमध्ये याचा समावेश झाला. या ग्रंथाच्या पुढील आवृत्त्यांमध्ये त्यांनी संस्कृत काव्यशास्त्रातील तत्त्वांशी पाश्चात्त्य वाङ्‌मयविचारांची सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याशिवाय, त्यांचे सौंदर्यशोध आणि आनंदबोध तसेच काव्यविभ्रम हे ग्रंथ देखील वाचकप्रिय ठरले.

    हेही वाचा – अल्लड हर्षा अन् तिच्या मैत्रिणी

    मुंबई मराठी साहित्य संघाच्या वा. म. जोशी व्याख्यानमालेत त्यांनी केशवसुतोत्तर आधुनिक मराठी कवितेतील प्रवृत्ती परंपरांचा जो आढावा घेतला, तो अर्वाचीन मराठी काव्य (केशवसुत आणि नंतर)  या नावाने ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला आहे. संस्कृत काव्यवाङ्‌मय या ग्रंथांत संस्कृत काव्याचा, केशवसुत (काव्यदर्शन) या ग्रंथात केशवसुतांच्या कवितेचा सविस्तर अभ्यास मांडला. पुणे विद्यापीठाच्या केळकर व्याख्यानमालेत त्यांनी ज्ञानेश्वर ते शाहीर या कालखंडातील बदलत्या अभिरुचीचे जे समालोचन केले होते. ते पुढे मराठी वाङ्‌मयाभिरुचीचे विहंगमावलोकन या ग्रंथात समाविष्ट झाले आहे. याशिवाय त्यांच्या साहित्यविषयक स्फुट लेखांचे चर्वणा, विचक्षणा तसेच दक्षिणा हे संग्रह प्रसिद्ध झाले.

    ठाणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अधिवेशनाच्या 42व्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निवृत्त प्राध्यापकांच्या योजनेतही त्यांची नेमणूक झाली होती. महाराष्ट्र साहित्य परिषद तसेच मराठी साहित्य महामंडळ यांच्या कार्याशी अनेक नात्यांनी त्यांचा दीर्घकाळ घनिष्ठ संबंध होता. तपशीलाविषयी दक्ष असणारे साक्षेपी आणि समतोल समीक्षक म्हणून लौकिक असणाऱ्या जोग यांचे 21 फेब्रुवारी 1977 रोजी निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – व्यवसाय करणे कधीकधी आव्हानात्मक असू शकते, मात्र तुमची कृती प्रत्येक परिस्थिती तुमच्या बाजूने वळवू शकते. योजनांमधील छोटे बदल मोठा नफा मिळवून देऊ शकतील. कुटुंबाचा सल्ला एखाद्या संजीवनी प्रमाणे काम करेल. कामात दिरंगाई करणे मात्र हानिकारक ठरू शकते. जीवनशैली सुधारण्यासाठी मोठा खर्च कराल.

    वृषभ – आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे अखेर पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. कामाच्या ठिकाणी, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन वरिष्ठांना प्रभावित करेल, त्यामुळे पदोन्नतीबद्दलच्या चर्चेला अधिक जोर मिळेल. वाहन दुरुस्तीवर मोठा खर्च करावा लागेल. ज्याचा तुमच्या बजेटवर थोडा परिणाम होऊ शकतो.

    मिथुन – प्रवासादरम्यान किंवा सहलींमधून मिळालेली माहिती भविष्यात महत्त्वपूर्ण लाभ मिळवून देऊ शकते. काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटल्याने  व्यवसायाला चालना मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची घाई केल्यास नुकसान होऊ शकते, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नवीन नोकरीची संधी मोहक वाटू शकते, मात्र सध्याच्या पदावर राहणे अधिक फायदेशीर ठरेल.

    कर्क – तुमचे रखडलेले प्रकल्प आई-वडिलांच्या आशीर्वादाने वेगाने पूर्ण होतील. जोडीदारासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचाराने उत्साह वाढू शकतो. एखाद्या दीर्घकालीन आरोग्य समस्येसाठी तपासणी करून घेण्याची गरज भासू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील आणि तुमची प्रतिमा सुधारेल.

    सिंह – खर्च नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल, अन्यथा बजेट बिघडू शकते. तुमच्या निष्काळजीपणामुळे कुटुंबातील सदस्य नाराज होऊ शकतात, त्यामुळे स्वभावात बदल करणे आवश्यक ठरेल. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद मिळेल, पण जुने वादग्रस्त मुद्दे उपस्थित करणे टाळा. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

    कन्या – आव्हाने अधिक मोठी वाटू शकतात, मात्र डगमगू नका. संयमाने राहा. मित्र आणि जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. जोडीदाराला नवीन नोकरीची संधी मिळाल्यास घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. संततीसोबत वेळ घालवल्याने मानसिक ताण कमी होईल. कुटुंबीयांशी सुसंवाद ठेवा, आनंदाचे वातावरण राहील.

    तुळ- समाजसेवा आणि चांगल्या कामांमुळे समाजातील तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढू शकतो. मोठा दानधर्म कराल ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मनमोकळ्या संभाषणाने जोडीदारासोबतचा सुरू असलेला वाद मिटू शकतो. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना महत्त्वाची बातमी मिळू शकते. कुटुंबातील वैयक्तिक बाबी अनोळखी लोकांना सांगणे टाळा.

    वृश्चिक – उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या अधिक जवळ येऊ शकते. भावांचा सल्ला  तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही लाभही मिळू शकतात.

    हेही वाचा – शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    धनु – आजचा दिवस पूर्वीपेक्षा अधिक चांगला आणि आरामदायी असेल. आपल्यातील उणिवा ओळखून पुढे वाटचाल केली, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करू शकते, पण सत्य तुमच्याच बाजूने असेल. त्यामुळे फार ताण घेऊ नका. पण सावध रहा. आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा.

    मकर – नोकरीच्या ठिकाणी आनंद आणि जबाबदाऱ्या यांचा मिलाफ अनुभवायला मिळेल. संतती तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील, अभिमान वाटेल असे काम करतील. कामाच्या ताणामुळे घरच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने वडीलधाऱ्यांची नाराज ओढावून घ्याल. बँकिंग किंवा वित्त क्षेत्रात काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

    कुंभ – अनेक आव्हाने तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात. कठीण परिस्थितीतही शांत राहणे हे तुमच्या विजयाची गुरुकिल्ली ठरेल. एखाद्या शुभ कौटुंबिक कार्यक्रमाची तयारी केल्याने सुखद वातावरण निर्माण होऊ शकते. स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय यशाकडे घेऊन जाईल. संततीच्या भावना आणि चिंता समजून घेणे आवश्यक आहे.

    मीन – तुमच्या कामगिरीबाबत वरिष्ठ खूप प्रभावित होतील. तुमच्या सूचनांनाही महत्त्व दिले जाईल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आजूबाजूचा परिसरात आणि समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते, परंतु मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत काळजी घ्या. प्रेम आणि संवादाच्या माध्यमातून  कौटुंबिक कटुता दूर कराल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 ऑगस्ट 2026

    August 22, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    By प्राजक्ता काथेAugust 23, 2026

    मेष हा आठवडा मेष राशीसाठी उत्तम आहे. नोकरदारांच्या बाबतीत जागेत बदल संभवतो. नव्या कामाच्या ठिकाणी…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 ऑगस्ट 2026

    August 22, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.