मेष
- यश मिळवून देणारा हा कालावधी आहे. या आठवड्यात कमी श्रमात कामे सहज पूर्ण करू शकाल. नोकरदारांना ओळखी तसेच मध्यस्थी यांची मदत होईल. सरकारी कामे पूर्ण करू शकाल. मोठी उलाढाल होऊन व्यावसायिक वर्गाला फायदा मिळेल. नवीन कल्पना अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल करू शकाल. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी, पथ्ये पाळा. तसेच, घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल.
वृषभ
- या आठवड्यात सामाजिक संस्थांकडून मान-सन्मान मिळेल. एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवू शकाल. नोकरदारांना वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फायदे नोकरदारांना आता दिसू लागतील. व्यावसायिक वर्गाला नवीन बदल उपयोगी पडताना दिसतील, त्यातून प्रगती होईल आणि उत्साहही वाढेल. नवीन व्यवहार केले जातील. महिलांना आधुनिक सुखसोयी मिळतील, त्यादृष्टीने खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना कुटुंबाचे नाव उज्ज्वल करता येईल, कौतुक होईल.
मिथुन
- या आठवड्यात कलाकारांचा भाग्योदय होईल. नोकरदारांना अपेक्षित कामे पूर्ण करता येतील. त्यांच्या कामाचे कौतुक होईल. त्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे, त्यानुसार पगारवाढ होईल. व्यावसायिक वर्गाला प्रसिद्धी मिळेल. तुमच्या प्रॉडक्टला पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होईल. महिलांच्या दृष्टीने घरात आनंदी वातावरण राहील. घरात लग्नकार्य ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या हातून एखादे चांगले सामाजिक कार्य घडेल, त्यासाठी मान-सन्मान मिळू शकतो.
कर्क
- या आठवड्यात नवीन वास्तू खरेदी करू शकाल. त्यासाठी पैशांची सोय होऊ शकेल. नोकरदारांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर, तशा संधी मिळतील. व्यावसायिक वर्गाला वेगळ्या संकल्पनांचा वापर करून कर्तृत्व सिद्ध करता येईल. कष्टाचे चीज होईल आणि नफा वाढेल. महिलांच्या बाबतीत घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे, पण जास्त न बोलता दुर्लक्ष करून वाद वाढणार नाही, याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना भावंडांकडून आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल.
सिंह
- या आठवड्यात कायदेशीर स्वरूपाची कामे पूर्ण होतील. नोकरदारांना नवीन कामे मिळतील. मात्र, दिखाऊपणा करू नका. इतरांना बोलू द्या, ऐकून घ्या आणि मग स्वतःचे मत मांडा. व्यावसायिक वर्गाला हितशत्रूंवर मात करता येईल. इतर अडथळे आणि पैशांच्या समस्या आल्या तरी त्यातून मार्ग काढू शकाल. फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा. महिलांनी कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींना मानाने वागवावे. कुटुंबात वाद होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांनी दिखाऊपणा आणि फाजील आत्मविश्वास टाळावा.
हेही वाचा – प्रसादची हीच ती सखी!
कन्या
- या आठवड्यात सकारात्मक विचार करा. नोकरदारांच्या बाबतीत आजूबाजूचे वातावरण अनुकूल राहील. त्यांची सगळी कामे विनासायास पार पडतील. तथापि, कोणाच्या भूलथापांना बळी पडू नये. कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो, स्पर्धा निर्माण झालेली दिसेल. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने परिस्थिती चांगली राहील. मात्र, व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. सर्व व्यवहार प्रामाणिकपणे करा. महिलांनी इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आपली मते इतरांवर लादू नका. विद्यार्थ्यांचे भावंडांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे, अशावेळी वाद निर्माण होऊ देऊ नका.
तुळ
- या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती सफल होतील. त्यातून आर्थिक समस्या सुटतील आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. घरातील मुलांच्या प्रगतीच्या बातम्या ऐकायला मिळतील. व्यावसायिक वर्गाच्या उत्पन्नात वाढ होईल, अनेक मार्गांनी पैसा मिळेल. हितशत्रूंचा त्रास वाढण्याची शक्यता आहे, सावध रहा. महिलांना सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना आनंदी बातम्या समजतील, त्यामुळे उत्साह वाढेल, मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल.
वृश्चिक
- या आठवड्यात खेळाडूंना प्रसिद्धी आणि पैसा, दोन्ही मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना अपेक्षित असलेल्या गोष्टी पूर्ण होतील. प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधीही मिळेल. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढेल, परिणामी उत्पन्नात वाढ होईल. पूर्वी केलेले नियोजन सफल होईल. कामातील अडथळे दूर होतील. व्यवसायानिमित्त नव्या व्यक्तीची भेट होईल, त्याचा पुढे फायदा होईल. महिलांचा प्रिय व्यक्तीबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे.
धनु
- या आठवड्यात महत्त्वाचे करार होतील. सरकारी काम करत असाल तर, मूळ जागी येण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये चांगली प्रगती करू शकाल. तुम्हाला मेहनतीचे श्रेय मिळेल. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे वरिष्ठांबरोबरचे संबंध सुधारतील. व्यावसायिक वर्गाची चांगली आर्थिक प्रगती होईल. जुनी येणी वसूल होतील. नवीन स्टाफ मिळेल. काही महत्त्वाच्या करारांवर सही कराल. महिलांना उत्पन्नातील काही पैसा जागेत गुंतवता येईल. विद्यार्थ्यांना मैत्रिणींबरोबर वेळ घालवता येईल, नवीन मित्र मिळतील.
मकर
- या आठवड्यात वैयक्तिक सुवार्ता ऐकायला मिळतील. त्यामुळे उत्साह वाढेल. नोकरदारांना हातातील कामे जलदगतीने पूर्ण करता येतील. त्यातून अपेक्षित लाभ होईल. सुट्टी घेऊन सहलीचा आनंद अनुभवाल. व्यावसायिक वर्गाचे निर्णय अचूक ठरल्यामुळे फायदा होईल. नवीन प्रकल्प हाती घ्याल. सरकारी कामे स्वतः प्रयत्न करून पूर्ण करणे इष्ट. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. महिलांना मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध काही घटना घडू शकतात. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या बातम्या मिळतील. सकारात्मक विचार ठेवा.
कुंभ
- या आठवड्यात कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घरातील प्रिय व्यक्तीबद्दल असलेली चिंता मिटेल. नोकरदारांना कामात यश मिळेल. तुमच्या बुद्धी, कौशल्य आणि बोलण्याचा प्रभाव वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांवर पडेल. व्यावसायिक वर्गाचे आर्थिक प्रश्न सुटतील. तसेच, नवीन संधी मिळतील, त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. महिलांना सर्व बाजूंनी सुवार्ता मिळतील. घरात प्रसन्न वातावरण राहील. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे, विशेषत: वेगावर नियंत्रण ठेवा.
हेही वाचा – बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट
मीन
- या आठवड्यात नैराश्याचे मळभ दूर होईल. नोकरदारांना जमीन किंवा घरात गुंतवणूक करता येईल. आरोग्यातही सुधारणा दिसेल. जे नव्या नोकरीच्या शोधात असतील त्यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात क्षेत्रात व्यावसायिक वर्गाला चांगली प्रगती होईल. त्याचबरोबर नवीन कॉर्पोरेट विभागात व्यवसाय केल्यास फायदा होईल. महिलांना घरात जास्त काम करावे लागेल, त्यामुळे ताण जास्त असेल. पण शांत रहाणे उत्तम. विद्यार्थ्यांना गुरुजनांची मदत मिळेल, शिष्यवृत्ती मिळू शकते.


