Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026

    मारवाडी…

    June 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज

    Team AvaantarBy Team AvaantarMay 10, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला । विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥357॥ हळाहळ आगीं पियालें । नवल मरण मारा पेटलें । तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥358॥ परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटिलिया अंतराळ । आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ॥359॥ नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं । तैं उघडले हाटकेश्वरीं । जेवीं पाताळकुहर ॥360॥ तैसा वक्त्रांचा विकाशु । माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु । विश्व न पुरे म्हणोनि घांसु । न भरीचि कोंडें ॥361॥ आणि पाताळव्याळांचां फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं । तैसी पसरलिये वदनदरी- । माजीं हे जिव्हा ॥362॥ काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें । जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे । तैसे आवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे ॥363॥ आणि ललाटपटाचिये खोळे । कैसें भयातें भेडविताती डोळे । हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले ॥364॥ ऐसें वाऊनि महाभयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहातोसि काज । तें नेणें परी मज । मरणभय आलें ॥365॥ देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलों प्रतिफळें । बा देखलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥366॥ अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परि आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वांचे ॥367॥ एऱ्हवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे । अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥368॥ परी येतुलियाही वेगळा । जो केवळ आनंदैककळा । तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥369॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    अर्थ

    हे कसे झाले पाहा! जसा वार्‍याला धनुर्वात व्हावा, समुद्र महापुरात पडावा किंवा विषग्नी वडवानळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा. ॥357॥ अग्नीने जसे हालाहल विष प्यावे अथवा आश्चर्य असे की, मरण जसे मारण्यास तयार व्हावे, त्याप्रमाणे या संहारतेजाला मुख झाले आहे, असे समजा. ॥358॥ परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल, तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशास खिंड पडून राहाते, ॥359॥  अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहेत शिरला, तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळारूपी गुहेचे द्वार उघडले, ॥360॥ त्याचप्रमाणे तोंडे पसरलेली आहेत आणि त्यामध्ये जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत; त्यांच्या घासास विश्व पुरे पडणार नाही, म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही. ॥361॥ आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा या वदनरूपी दरीत पसरली आहे. ॥362॥ प्रलयकाळाच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत. ॥363॥ आणि ललाटरूप वस्त्रांच्या खोळीत असलेले डोळे, हे जसे भयासच भेडसावीत आहेत, अथवा ते डोळे, महामृत्यूचे लोटच असून (भिवयांच्या – भुवयांच्या) अंधारात राहिले आहेत. ॥364॥ असे हे मृत्यूचे कौतुक धारण करून (म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून) या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पाहातोस, ते मला कळत नाही! परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे. ॥365॥ अहो देवा, विश्वरूप पाहण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा, तुमचे विश्वरूप पाहिल्याने डोळे शांत व्हावे, तसे झाले आहे. ॥366॥ अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चयेकरून नाश पावणारच, त्याची काळजी कोणी केली आहे? परंतु आता माझे चैतन्यच कदाचित वाचते की नाही, असे मला वाटू लागले आहे. ॥367॥ एऱ्हवी भयामुळे अंग कापावयास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की, मनाला ताप होतो, अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान विगलित होतो. ॥368॥ परंतु या सर्वांहून वेगळा, जो केवळ आनंदाचा अंश आहे, असा जो अंतरात्मा, त्या शांत आत्म्याला देखील भयाने शहारे आले. ॥369॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

     सार्थ ज्ञानेश्वरी : जे प्राणाचां घरीं, अंगें राबते भाऊ चारी

    June 27, 2026 अध्यात्म

     सार्थ ज्ञानेश्वरी : तोंडेसीं तोंडा न पडे, बोलेंसीं बोला न घडे 

    June 26, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

     सार्थ ज्ञानेश्वरी : जे प्राणाचां घरीं, अंगें राबते भाऊ चारी

    By Team AvaantarJune 27, 2026

    अध्याय तेरावा पाखांडाचे कडे । नागवीं लुंचिती मुंडे । नियोजिली वितंडें । ताळासि येती ॥21॥…

     सार्थ ज्ञानेश्वरी : तोंडेसीं तोंडा न पडे, बोलेंसीं बोला न घडे 

    June 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Dnyaneshwari : जो भक्तजनवत्सलु, प्रेमळजनप्रांजलु

    June 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026

    मारवाडी…

    June 27, 2026

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जे प्राणाचां घरीं, अंगें राबते भाऊ चारी

    June 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 341
    • अवांतर 191
    • आरोग्य 124
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 468
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 741
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026

    मारवाडी…

    June 27, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.