Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026

    Dnyaneshwari : जी सत्यलोकु तुजमाजीं आहे, देखिला चतुराननु हा नोहे

    May 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 मे 2026

    May 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!
    ललित

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    स्नेहा सुतारBy स्नेहा सुतारMay 2, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, श्री जुईली प्रेमकथा, श्री जुईली विरहकथा, श्री जुईची प्रेमकहाणी, श्रीचे मेसेजना उत्तर न देणे, जुईलीला मेसेजची प्रतीक्षा, जुईलीला श्रीच्या मेसेजची प्रतीक्षा
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 12

    “जुईली… ए जुईली…” आईच्या आवाजाने जुईली दचकून जागी झाली.

    “अगं दिवेलागणीची वेळ आहे, काळोख का केलायस तो… आणि असं झोपू नये यावेळी. ऊठ चल, तोंड धू. देवापुढे बसून नामस्मरण कर जरा वेळ. बरं वाटेल.” असं म्हणून आईने खोलीतल्या लाइटचं बटण चालू केलं.

    जुईली उठली. छातीवरचं पुस्तक तिने पान क्रमांक बघून झाकून ठेवलं. पुस्तक वाचता वाचताच तिला डोळा लागलेला. आरामखुर्चीत अंगाची मुटकुळी करून जुईली कधी झोपी गेली तिचं तिलाच कळलं नाही. सवयीप्रमाणे तिने मोबाइलवर नोटिफिकेशन बघितलं. आता श्रीचा मेसेज येणार नव्हता. तरीही…

    कधीपासून अशी मुटकुळी करून राहिल्यामुळे जुईलीच्या पायांना मुंग्या आलेल्या. म्हणून जरा तिने पाय मोकळे सोडून पायांची बोटं ताणून वरखाली केली. नखं खाजवली. हळूहळू मुंग्या गेल्या तशी ती उठली आणि टेबलवरची बाटली उचलून त्यातलं पाणी घटाघटा तिने पिऊन घेतलं. तिचं डोकं फारच ठणकत होतं. तिने पुन्हा मोबाइल उचलला. श्रीच्या चॅट्समध्ये जाऊन तिने चॅट्स वाचले. एकतर्फीच होते.

    हेही वाचा – पाऊस असा रुणझुणता…

    ‘श्री बोल ना…’

    ‘नको झालेय का मी तुला?’

    ‘कसला राग आलाय का?’

    ‘श्री माझं काही चुकलंय का रे… असं का वागतोयस माझ्याशी यार… ‘

    ‘तुला मी नकोय ना तर, हे शेवटचं बोलतेय तुझ्याशी असं समज.’

    ‘बघ श्री पुन्हा कधीच तुला आयुष्यात दिसणार नाही मी तुझ्या.’

    ‘माझ्या सोन्या एकदा बोल शेवटचं.’

    ‘मला सांग काय झालंय नेमकं… असं काय वागतोयस आणि का?’

    ‘एकदा कळू तरी दे यार मला काय झालंय ते.’

    ‘माझ्या आयुष्याशी असा खेळ करायचा तुला कुणीच हक्क दिला नाहीये श्री. ‘

    ‘वाटेल तेव्हा जवळ घेतोस, वाटेल तेव्हा असं एकाएकी बोलायचं बंद होतोयस…’

    ‘बोल ना श्री…’

    ‘ हे सगळे मेसेजस बघतोयस तू मला माहीत आहे.’

    ‘एक रिप्लाय करायला जड जातोयस?’

    ‘श्री वेड लागेल मला अशाने…’

    ‘माझ्याशी जरा सुद्धा बोलणार नाहीयेस? एकदाही नाही?’

    ‘प्रेम आहे ना माझ्यावर?’

    ‘श्री… ऐक ना यार…’

    जुईलीने मोबाईल बंद करून टाकून दिला बेडवर… नकोच काही! राग अनावर होऊन ती वॉश बेसिनकडे जाऊन नळ चालू केला. पटपटा पाण्याचे हबकारे तिने चेहऱ्यावर मारून घेतले. डोळ्यातलं पाणी आणि हबकाऱ्यांचं पाणी एक होईपर्यंत. दार उघडून ती बाथरूममध्ये गेली. तिला मोठ्याने रडायचं होतं. बाथरूममधल्या भरलेल्या बालदीत तिने चेहरा बुडवला. बालदीतलं पाणी हिंदकळलं. चेहरा बालदीत बुडवून ती तशीच राहिली. जीव गुदमरेपर्यंत. एकदम तोंड बाहेर घेऊन तिने मोठा श्वास घेतला… चेहऱ्यावरचं पाणी हातानेचं बाजूला केलं. मोठे मोठे श्वास घेत ती तशीच तिथे बसून राहिली.

    काय आहे हे सगळं? तिला काहीच कळत नव्हतं. काय खरं आणि काय खोटं तेच कळत नव्हतं. काही दिवसांपूर्वी हा होता, तो खरा? की आता आहे तो खरा? मन, डोकं, हृदय आहे की नाही मला? काय समजला असेल मला हा? का असं वागत असेल? काय चाललंय हे सगळं??? तिला कश्याचं आता काहीच कळत नव्हतं…

    हेही वाचा – आले जल गेले जल झाले जल आरपार…

    चालतं बोलतं, खातं पितं मशीन झालं होतं तिचं. माणसांचीच भीती वाटायला लागलेली. तिला वाटलं की, आपण एखाद्या खोल गुहेत शिरावं. कुणीतरी गुहेचं दार बंद करावं. कित्येक तास, दिवस, आठवडे… जोपर्यंत ती जगेल तोपर्यंत तिथे राहावं. एक्का जागी बसून… त्या गुहेच्या भिंतीवर फुलं लगडावीत… सोनचाफ्याची… वेलीवर यावीत ती. आणि हा वेल पूर्ण गुहेच्या भिंतीवर पसरत जावा. याच त्या त्याच्या आठवणी! बघ कशा पसरतायत भिंतींवर. वेल पसरत जातोय तसा तसा सोनचाफ्याच्या फुलांचा वास गडद होत जातोय. त्याच्या आठवणी तशा तशा लगडत जातायत त्या भिंतीला…

    हे बघ इथे आपण भेटलेलो, हे बघ इथे तू मला जवळ घेतलेलंस, हे बघ ना इथे… इथे तू माझा हात हातात घेतलेलास… आणि हे बघ ना तू माझ्याशी असं बोललेलास इथे.. ते बघ ना तिथे तू माझ्याशी तसं बोललेलास… अंगभर वास भिनावा… खोल खोल हुंगत जावा हा वास, अगदी आत खोल… या आठवणी मात्र पिंजून काढाव्यात एकेक… सगळी सोनचाफ्याची फुलं तेवढी खुडून घ्यावीत एकेक. भिंतभरची. त्यांचीच चादर घेऊन झोपी जावं आता… कायमचं… कुणीच उठवायला येणार नाही, असं…

    बसल्या जागी जुईलीला बाथरूमच्या भिंतींवर वेल चढताना दिसू लागली… सोनचाफ्याच्या फुलांची… आठवणींची… तिने डोकं गच्च पकडलं. डोळे गच्च मिटून घेतले.

    इतक्यात आईने बाहेर टीव्हीवर युट्यूबवर मोठ्याने गाणं लावलं…

    कसे सरतील सये
    माझ्यावीना दिस तुझे
    सरताना आणि सांग
    सलतील ना…

    गुलाबाची फुलं दोन
    रोज राती डोळ्यांवर
    मुसुमूसू पाणी सांग
    भरतील ना… भरतील ना…

    स्नेहा सुतार

    Related Posts

    जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    May 1, 2026 ललित

    कॉन्फरन्स रूममध्ये ‘ती’ व्यक्ती पाहून आराध्याचा श्वासच अडखळला

    May 1, 2026 ललित

    आश्वस्त करणारी मिठी

    May 1, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    By सुधीर करंदीकरMay 1, 2026

    बेरोजगारी, कामधंदा न मिळणे हा प्रकार सगळ्याच देशांमध्ये कमीजास्त प्रमाणात असतोच. परिणामी कमीजास्त प्रमाणात चोऱ्यामाऱ्या…

    कॉन्फरन्स रूममध्ये ‘ती’ व्यक्ती पाहून आराध्याचा श्वासच अडखळला

    May 1, 2026

    आश्वस्त करणारी मिठी

    May 1, 2026

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026

    Dnyaneshwari : जी सत्यलोकु तुजमाजीं आहे, देखिला चतुराननु हा नोहे

    May 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 मे 2026

    May 2, 2026

    जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    May 1, 2026

    कॉन्फरन्स रूममध्ये ‘ती’ व्यक्ती पाहून आराध्याचा श्वासच अडखळला

    May 1, 2026

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    May 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 285
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 403
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 202
    • मैत्रीण 18
    • ललित 598
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026

    Dnyaneshwari : जी सत्यलोकु तुजमाजीं आहे, देखिला चतुराननु हा नोहे

    May 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 मे 2026

    May 2, 2026
    Most Popular

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.