Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बेसनाचे लाडू… माँची आठवण
    ललित

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेApril 27, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, बेसनचे लाडू, बेसनच्या लाडू आठवणी, माँच्या हातचे बेसनचे लाडू, बेसनच्या लाडूमध्ये आईचे प्रेम, बेसनच्या लाडूत माँचे प्रेम, माँची आठवण, माँचे बेसन लाडू, आईचे बेसन लाडू,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माँ आज तुझी रोजच्या पेक्षा जास्त आठवण आली गं. कारण अगदीच क्षुल्लक होते. मी दोन आठवड्याच्या टूरवरून काल रात्री साडेबाराच्या सुमारास घरी आलो. मैथिलीच्या आणि मुलांच्या बेडरूममध्ये सामसूम होती. फ्लाइट कमालीची लेट झाली होती, त्यामुळे मी अवेळी घरी पोहोचलो होतो. फ्रेश झाल्यावर माझी पावलं नकळत स्वयंपाकघरात वळली. डबे शोधले पण आवडीचं आणि पोटभरीचं असं काहीच नाही मिळालं. त्याक्षणी तुझी अनुपस्थिती मला प्रकर्षाने जाणवली. आठवले इंजिनीअरिंग कॉलेजचे दिवस…

    ॲडमिशन मिळाली होती, मला दुसऱ्या शहरात. ते ऐकून तुझे डोळे पाणावले होते… पण तेव्हा बाबांनी तुला धीर देत समजावले होते. घरातील सुरक्षित वातावरणातून मी पहिल्यांदाच बाहेर पडत होतो. माझ्या सामानासोबत तू मोठा डबा दिला होतास, बेसनाच्या लाडूंचा. तीच माझी पहिली ओळख होती त्या लाडूंसोबत. त्यांच्या रुपात तुझं अस्तित्व कायम माझ्या अवतीभोवती फिरत असायचं, असं मला कायम वाटायचं. रात्री अपरात्री अभ्यास करून दमल्यावर क्षणभर विश्रांती घेताना पोटाची भूक भागली जायची तुझ्या लाडूंनी.

    माँ तुझ्या हातात मात्र कसली जादू होती कोण जाणे! तुझ्या हातांनी वळलेल्या त्या लाडूंनी माझं कॉलेज कॅम्पसमध्ये महत्त्व मात्र रातोरात वाढलं होतं. मी सुट्टीवरून परत येण्याची वाट माझे मित्र आतुरतेने बघायचे, कारण बेसनाच्या ताज्या लाडूंची त्यांना प्रतीक्षा होती. दिल्लीचा सोहेल आणि पंजाबचा विरेंदर तर बल्ले बल्ले तुटून पडायचे तुझ्या लाडूंवर. आमचा लाडका गुज्जूभाई केतनला काही केल्या बेसन शब्द आठवायचा नाही. तो आपला ‘यल्लो लड्डू’ अशी विचारणा करायचा. माँ तो पठ्ठ्या आता अमेरिकेत स्थायिक झाला आहे. आमच्यात जेव्हा बोलणं होतं, तेव्हा आजही तो त्या ‘यल्लो लड्डू’च्या आठवणीने भावनिक होऊन तुझी आठवण काढतो.

    हेही वाचा – आयुष्याचा वेग आणि रहाटगाडगे…

    माँ तुझा तर मी पहिल्यापासूनच लाडका. इंजिनीअरिंगची ॲडमिशन मिळाली, तेव्हा तुला सांगायचं कसं, या जाणिवेने मी अस्वस्थ झालो होतो. मी काही ना काही कारण काढून तुझ्या समोर येणं टाळत होतो. पण ही कोंडी अखेर तूच फोडलीस… एक दिवस माझ्या खोलीत येऊन तू माझ्या जाण्याची तारीख विचारली होतीस. ते ऐकून मला धक्काच बसला होता आणि त्याच अवस्थेत मी फक्त माँ एवढा एकच शब्द उच्चारू शकलो होतो! पुढच्या क्षणी मला तुझ्या छातीशी कवटाळून घेतलं होतं तू. काही क्षण तसेच गेल्यावर तूच तुझे डोळे पुसत मला बाजूला करत म्हणाली होतीस की, “जा तू खुशाल. तुझ्या शिक्षणाच्या आड मी येणार नाही. तुझं घरात नसणं ही कल्पनाच मी नाही करू शकत, कारण तुला पावलोपावली तुझी ही माँ लागली आजवर. माझ्याशिवाय तू कसा रहाणार या काळजीने मी अस्वस्थ होते, पण तेव्हा तुझ्या बाबांनी मला छानपैकी समजावून सांगितले सगळं.”

    हेही वाचा – मानसिक आधार देणारा सलाइनचा स्टँड!

    मी घरून निघालो तेव्हा हसतहसत निरोप दिला होतास मला तू… माँ कसं ग जमायचं तुला तुझं प्रेम त्या लाडूंमध्ये बेमालूमपणे मिसळायला? लाडूच्या प्रत्येक तुकड्यात मला तुझं प्रेम जाणवायचं. अचानकपणे नात्यातले किंवा ओळखीतले कोणी माझ्या शहरात येणार असले की, त्यांच्यासोबत तू आठवणीने लाडवाचा डबा पाठवायचीस माझ्यासाठी! माझ्या पदवीप्रदान समारंभाला तू आणि बाबा आला होतात, तेव्हा तुझ्या हातचे बेसनाचे लाडू कधी ना कधी खाल्लेल्या माझ्या प्रत्येक मित्राने पाया पडून तुझे आशीर्वाद घेतले होते.

    माँ आज तुला जाऊन कितीतरी वर्षे उलटली. पण तुझे बेसनाचे लाडू मात्र माझ्या आयुष्यात तुझ्या आठवणींचा गोडवा कायम जपून ठेवणार आहेत, यात तीळमात्र देखील शंका नाही.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026 ललित

    चांगुलपणाचा असाही अनुभव

    April 27, 2026 ललित

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    By पराग गोडबोलेApril 27, 2026

    शनिवारची शाळा म्हणजे अफाट आनंद. सकाळची शाळा, ती ही अर्धा दिवस… दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजे…

    चांगुलपणाचा असाही अनुभव

    April 27, 2026

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!

    April 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026

    चांगुलपणाचा असाही अनुभव

    April 27, 2026

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 280
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 398
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 583
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.