Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आज 29 जून 2025 चे पंचांग आणि दिनविशेष
    वास्तू आणि वेध

    आज 29 जून 2025 चे पंचांग आणि दिनविशेष

    Team AvaantarBy Team AvaantarJune 29, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

     

    आज भारतीय सौर : 08 आषाढ शके 1947

    अर्थात,

    दिनांक : 29 जून 2025, वार : रविवारी, तिथि : चतुर्थी 09:14, नक्षत्र : आश्लेषा 06:33

    योग : वज्र 17:57, करण : बव 21:12

    सूर्य : मिथुन, चंद्र : कर्क 06:33, सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 9:19

    पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन

    संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    ख्यातनाम कथा-कादंबरीकार दिगंबर मोकाशी

    ख्यातनाम मराठी कथा-कादंबरीकार दिगंबर मोकाशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1915 रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे झाला होता. लामणदिवा (1947) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर कथामोहिनी (1959), आमोद सुनासि आले (1960), वणवा (1965), चापलूस (1974), एक हजार गायी (1975), आदिकथा (1976), माऊली (1976) तसेच तू आणि मी (1977) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. विविध अनुभूतींतून माणूस शोधण्याचा, व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या लेखनाद्वारे केला आहे. रहस्यकथा, पिशाच्चकथा असे कथाप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. भावचित्रणातील हळुवारपणा आणि नाजुकपणा आणि घटनेतील नाट्य यांचा संगम त्यांच्या अनेक कथांतून आढळतो. स्थलयात्रा (1958), पुरूषास शंभर गुन्हे माफ (1971), देव चालले (1961), आनंद ओवरी (1974) आणि वात्स्यायन (1978) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. विख्यात अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या फॉर व्हूम द बेल टोल्स या प्रसिद्ध कादंबरीचा घणघणतो घंटानाद (1965) हा अनुवाद उल्लेखनीय आहे. संध्याकाळचे पुणे (१९८०) हे त्यांचे अखेरचे पुस्तक. मोकाशी यांनी  संध्याकाळच्या पुण्याची जी विविध रूपे दिसली, त्यांचे लालित्यपूर्ण दर्शन त्यांनी ह्या पुस्तकात घडविले आहे. 29 जून 1981 रोजी पुण्यातच त्यांचे निधन झाले.

    प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आशुतोष मुखर्जी

    न्यायशास्त्रज्ञ, बॅरिस्टर आणि गणितज्ञ आशुतोष मुखर्जी यांचा जन्म 29 जून 1864 रोजी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे झाला. कलकत्ता विद्यापीठाने घेतलेल्या गणित आणि भौतिकशास्त्रात दुहेरी पदव्युत्तर पदवी मिळविणारे पहिले विद्यार्थी होते. लॉ ऑफ परपेच्युइटीज हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. पाली, फ्रेंच, रशियन इत्यादी भाषाही त्यांना अवगत होत्या. आशुतोष मुखर्जी हे राजकारणापासून अलिप्त होते; मात्र 1899 मध्ये बंगाल विधान परिषदेत त्यांची सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली. तर, ते 1904मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर 1920मध्ये मुख्य न्यायाधीश झाले. आशुतोष यांनी गणित विषयात संशोधन केले. या विषयातील संशोधनात अंतर्भूत असलेल्या प्रमेयांचा केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला होता. 1904 – 1918 आणि 1921-1923 या काळात कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. ब्रिटिश सरकारने त्यांना 1907 मध्ये C. S. I. आणि 1911 मध्ये ‘Knight’ ह्या पदव्या देऊन त्यांचा गौरव केला. आशुतोष मुखर्जी यांचे पाटणा येथे 25 मे 1924 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn