Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आले जल गेले जल झाले जल आरपार…
    ललित

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    स्नेहा सुतारBy स्नेहा सुतारApril 26, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, पावसात प्रियकराचे भेटणे, प्रियकराची आठवण, प्रियकराची ओढ, श्री आणि जुईली, श्री जुईचे लाँग ड्राइव्ह, सूर्यास्ताचे साक्षीदार, सूर्यास्ताचे मोहक दृश्य, श्री जुईची प्रेमकहाणी, जुई श्रीची प्रेमकहाणी,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link
    भाग – 11

    अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
    उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
    जशी ओली हूर हूर तरारते रानभर   
    तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर
    सरीवर सर… सरीवर सर…

    संदीपचं गाणं सुरू होतं… पावसाच्या सुया नुसत्या मी मी म्हणून समोर गाडीच्या काचेवर आदळत होत्या… आणि श्री जुईलीचा हात गिअरवर ठेवून, आपला हात तिच्या हातावर ठेवून अटल सेतूवरून जात होता… जुईलीचा आनंद त्याच्या एकूण असण्यावरूनच जाणवत होता. ती नेहमीची गंभीर, विचारात असणारी जुईली आज जणू फुलपाखरू झाली होती… आज अगदी मनमोकळेपणाने बोलत होती, हसत होती…

    “या सेतूवर अगदी आकाशातून उडत जातोय, असं वाटतं नाही रे?”

    “होय ना, आणि हा असा पाऊस सुरू असताना, तुझा हात हातात असताना, तू अशी सोबत असताना मला अटल सेतूच कशाला, अगदी ओहोळाच्या बांधावरून जरी चालायला सांगितलं ना, तरी मी हवेतच उडत उडत चाललेला असेन बघ.”

    “ए! अति हा अति… म्हणे उडत उडत चाललेला असेन. ए, तुला आठवतेय का आपली पहिली भेट? त्या दिवशी मी, तू भेटल्यापासून स्माइल घेऊन घरी गेलेले वेड्यासारखी. त्यानंतर तू जेव्हा जेव्हा भेटलास तेव्हा हेच अनुभवलं मी! माझ्या चेहऱ्यावर स्माइल… तू असलास ना की, माझं हे असं होतं. कायम रहा बघू माझ्याजवळ… अस्साच!”

    “हं… बाईसाहेब… तुम्ही हसत रहा… हसत रहा… आम्ही सोबत आहोतच!”

    “अरे, श्री तुझं वेड म्हणजे एकेक भलतंच असतंय बघ. या अटल सेतूवरून पणजीत येताना आणि पणजीतून निघताना तुला जायचंच असतंय म्हणून तू एवढा मोठा वळसा घेतोस, येता-जाता. किती ट्रॅफिक बघ ना आता खाली लागणार आपल्याला… माझा स्टॉप मात्र चुकवायचा नाहीस हा तू खाली नदीकिनारचा… मला पाच मिनिटं का होईना तिथे बसायचंय. मग म्हणू नकोस उशीर होतोय! मागच्या वेळी फक्त दोन मिनिटांसाठी थांबलेलास… कुजक्या.”

    हेही वाचा – किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    “अगं नाही होणारं उशीर… आणि झाला तरी आज आपण सांगू काका-काकूंना! काही नको काळजी करू तू. आता सांग बघू कुठे जायचंय? आपला नेहमीचा स्पॉट की, अजून कुठे जाऊयात? आधी पोटाला काहीतरी घाल… नाहीतर पार्सल तरी घेऊयात आणि आपल्या स्पॉटवर जाऊन खाऊयात… काय करूयात सांग?”

    “पार्सल घेऊयात. स्पॉटवर जाऊन खाऊयात. नाहीतर मग काळोख होईल तिथे. वाटेत ते बर्गर हाऊस मिळेल, तिथे घेते तुला काहीतरी. तू नको उतरूस. तुला ठरवायलाच अर्धा तास लागेल काय घ्यायचं ते! मी जाऊन येते पटकन.”

    “बरं बाई… जा तूच. मी थांबतो गाडीत. काय रस्ते यार गोव्यात पोहोचेपर्यंत… नको झालंय ड्राइव्ह करून. मी थांबतोच गाडीत. मोडून आलंय अंग. मला मसाज दे हा चांगला खांद्याला…”

    “ओ ग्गं माझं गुंडूलं… दमलं माझं गुंडूलं”

    “हं, गप्प! खरंच यार… पार वाट लागलीय या रस्त्यांची… आणि हे गं काय पर्वरीत! मला सगळं नवीनच वाटलं गं… आधीची नाही ना गं राहिली ही पर्वरी, अनोळखी एकदम. खूप वर्षांनी बघितल्यासारखी! एवढा बदल होतो काहीच महिन्यांत?”

    “अरे मग काय… मी बसने येते, तेव्हा अरे पाठ, कंबर एक होते. म्हणून मी टाळते इकडे यायचं. पण ड्युटी लागली की यावंच लागतं ना रे…”

    “किती दिवस आता तुझं हे येणं जाणं मग? टीचर असतात का नेहमीच?”

    “अरे, हे कोण जाणे किती दिवस चालणार आहे? रोज नवीन काही ना काही असतंय. बदल आणि बदल… आज हे बदल, उद्या ते बदल. यातच जातायत दिवस. अरे पुढे बघ हां… ते बर्गर हाऊस लागेल. थांबव तिथे गाडी…”

    “हं… ते ना? ग्रीन लाइटवालं?”

    “हो, हो, तेच. थांब बाजूला.”

    जुईलीने बाहेर बघितलं तर, पाऊस आता पूर्ण थांबला होता. “बरं झालं बाई, पाऊस थांबला. छत्री न्यायला नको.” जुईली स्वतःलाच म्हणाली.

    श्रीने गाडी बाजूला घेऊन थांबवली. जुईली दार उघडलं आणि “आलेच हां, थांब…” म्हणून गेली.

    “जल्दी आओ…” – श्री.

    “आलेच्च…” हसत हसत जुईली म्हणाली आणि गेली सुद्धा. श्रीने मान हलविली, दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंफली आणि मस्त आळोखेपिळोखे देऊन त्याने स्टेअरिंगवर डोकं टेकवलं.

    गाडीच्या खिडकीवरची टकटक ऐकून श्रीला जागं आली. जुईली बाहेर त्याला तोंड वेडावून हातातलं पार्सल दाखवत होती. त्याने गाडी अनलॉक केली. दार उघडून जुईली आत बसली… “तुम्हारा फेव्हरेट फेव्हरेट… डबल क्रिस्पी चिकन बर्गर… आणि माझं व्हेज मखनी बर्स्ट… आणि सोबत चोको लाव्हा पण आणलाय.”

    “आहाहा… वास वास वास… घमघमतोय नुसता… झालं ना? अजून काही घ्यायचंय का?”

    “तुला काही हवंय का?

    “तू!”

    “हां, खा मला.”

    “हं… हं… हं… बघ हा काय सांगतेयस ते. नंतर नको म्हणायचं नाही.”

    “गप्प! पुरे तुझं! चल आता निघुयात… ”

    “हं… बघ, आताच मुकरलीस अपने जुबान से…”

    “लई तू… चल आता. मार हवाय तुला.”

    “हाय रे गालिब! म्हणून बिचारा शेरोशायरी करायला लागला… या मेहबूबा अशा मारायच्या, चेचायच्या गोष्टी करतात बेरेहेम… प्यार में ये हाल होते हैं!”

    “किती किती नौटंकी नुसती!”

    बोलता बोलता श्रीने गाडी पुन्हा रस्त्यावर घेतली. आता गाडी तालीगाव पठाराच्या दिशेने त्यांच्या आवडीच्या स्पॉटवर चालली होती… त्यांच्या आवडीच्या समुद्रावर… सरळसोट रस्त्यावरून गाडी डावीकडे वळली. पुढे वळणं घेत उताराला लागली आणि जरा खाली येताच समोर दिसू लागला मावळत्या सूर्याच्या सोन्याने चमचमणारा विस्तीर्ण सागर… दोघांचेही डोळे ते दृश्य बघून दिपून गेले…

    श्रीने उतारावरच गाडी काही क्षण थांबवली…

    “काय गं हे जुईली! कसलं भारी दिसतंय ना… बघ तरी काय सीन आहे यार… ”

    “हो ना रे… डोळ्यांत साठवून घ्यावा…”

    श्रीने पटकन मोबाइलवर समोरचं दृश्य त्यात टिपून घेतलं आणि पुन्हा गाडी सुरू केली. समोर उजवीकडे आणि डावीकडे असे दोन रस्ते जाऊन इंग्रजी T आकाराचा रस्ता होता. डावीकडचा इंडिकेटर देऊन श्रीने गाडी डावीकडे वळवली. काहीशी पुढे गेल्यावर डांबरी रस्ता संपला. तिथेच त्याने गाडी थांबवली. दोघंही गाडीतून उतरली.

    हेही वाचा – पाऊस असा रुणझुणता…

    “चल लवकर, तो बुडतोय…”

    म्हणून श्रीने जुईलीचा हात पकडला आणि दोघंही पळत पळत रेतीत आले… रेतीतून धावत किनाऱ्यावर आले… समोर फेसळता समुद्र आडवा पसरला होता… लालबुंद सूर्य आता त्यात बुडतच होता… पाऊस पडून गेल्यामुळे गार वारा अंगावर शिरशिरी आणत होता… यावेळी समुद्रावर कुणीच नव्हतं. दूर दूरवर फक्त फेसळणारा समुद्र आणि अधूनमधून त्यात समुद्रपक्षी सूर मारून जात होते. आकाशात चार-पाच पक्षी कुठूनतरी कुठेसे जात होते…   पायाखालची रेती पायाला हळुवारपणे हुळहुळ करत होती. धावत आल्यामुळे धपापलेल्या जुईलीला श्रीने हळूच जवळ घेतलं… मावळत्या सूर्याला साक्षी ठेऊन श्रीने जुईलीच्या ओठांवर आपल्या प्रेमाची मोहर उमटवली…

    स्नेहा सुतार

    Related Posts

    एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!

    April 25, 2026 ललित

    फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026 ललित

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!

    By मधुर सुनील कुलकर्णीApril 25, 2026

    पूर्वार्ध कॉलेज सुरू होऊन आठच दिवस झाले होते. शेवटचं सायकॉलॉजीचं लेक्चर सुरू होतं. गौरी अगदी…

    फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026

    Dnyaneshwari : सा विस्मितु पाहे कोडें, तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें

    April 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 एप्रिल 2026

    April 26, 2026

    आजची तरुण पिढी…

    April 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 279
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 397
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 580
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.