Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जॉबसंदर्भातील फाइलवरची स्वाक्षरी बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…
    ललित

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरApril 24, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, उन्हाळ्याचे दिवस, संन्यस्त पलाश, संन्यस्त पळस वृक्ष, वसंतातील पळस वृक्ष, ग्रीष्मातील पळस, पळसाचा भगवेपणा, पळसाच्या अग्निशिखा, पळासाचा फुलोरा, भगवाधारी पळस
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    होळी झाली की, वातावरणामध्ये बदल होतो. दिवसाचे तापमान हळूहळू वाढायला सुरुवात होते. मार्चअखेर त्यामध्ये चांगलीच वाढ झालेली असते. वातावरणातील बदलासारखेच निसर्गामध्ये वसंतोत्सवाची तयारी दिसायला लागते. पळस, पांगीरा, बहावा, गुलमोहर, बोगनवेलीया, करंज, काटेसावर आपापले देखणे रंग लेवून आपल्या हृदयात वसंत फुलवतात…  “हृदयी वसंत फुलतांना प्रेमास रंग यावे…” असे तर स्वतःशीच म्हणत नसतील ना? कारण झाडांना भावना असतात, असं लहानपणापासून ऐकिवात आहे,  ते काही असू दे पण निसर्ग मात्र आपल्या मुक्त हस्ताने रंगांची उधळण, या उत्सवात करत असतो, हे मात्र खरे आहे. प्रत्येक ऋतुमध्ये निसर्ग आपल्या मनमोहक अदाकारीने मानवाला भुरळ पाडतो. निसर्गातील हे ऋतुचक्र एकमेकांच्या हातात हात घालून अनादी काळापासून असेच सुरू आहे.

    ग्रीष्माची चाहूल लागली की, पळसाला फुलोरा यायला सुरुवात होते. मला पळसाप्रमाणेच या ऋतूत फुलणारी बहावा, गुलमोहर, काटेसांवर, करंज, बोगनवेलीया, चाफा, मोगरा अशी अनेक मनमोहक झाडे खूप आवडतात. या झाडांचे वैशिष्ट्यच हे आहे की, ग्रीष्मातल्या कडक उन्हातही यांच्या अंगीभूत असलेल्या सुगंधाने आणि आकर्षक रंगाने ते आपल्याला शीतलता देत असतात तसेच, आपल्या गुणांनी वातावरण आल्हाददायक आणि सुसह्य करत असतात. कडक उन्हात या झाडांकडे नजर गेली तरी, मनाला एक वेगळेच समाधान मिळत असते. खरंच, निसर्गाचे हे चमत्कार अनाकलनीय आहेत. माणसाला निसर्ग समजायला कितीतरी जन्म घ्यावे लागतील, तेव्हा कुठे पूर्णतः तर नाहीच, पण थोडेफार नैसर्गिक गूढ उकलण्यात मानव यशस्वी होऊ शकेल. मानवाने निसर्गनिर्मित ज्या गोष्टी आहेत, त्या आहे तशाच राहू दिल्या तर, किती बरं होईल? विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाची खूप मोठी हानी करतो आहे. हे दुष्टचक्र थांबले तर… निसर्ग पाहा मानवाला आपल्या सहस्त्र हातांनी किती भरभरून दान देतो फक्त मनुष्याने या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला नको!

    गुढीपाडवा झाल्यावर जंगलात गेल्यास अख्खं जंगल पळसाच्या अग्निशिखांनी भगवे झालेले आपल्याला दिसते. असंख्य ऋषिमुनी, संन्यासी आपल्या भगव्या वेशभूषेने सुसज्ज होऊन तिथे कुठल्या तरी, अधिष्ठानासाठी एकत्र जमले आहेत, अस वाटतं. आकाशात तळपणारा सूर्य आणि खाली त्यालाच साथ देणारे हे यज्ञकुंडासारखे केशरी रंगाचे उभे ठाकलेले अनेक पलाशवृक्ष पाहिले की, अचंबित व्हायला होत. मला खरंच पळसाचे झाड एखाद्या संन्याशासारखे वाटतं. वर्षभर निद्रीस्त असलेला हा संन्यासी या वसंत ऋतूत आपले खरे रूप दाखवायला सुरू करतो…

    हेही वाचा – मनात बहरलेला गुलमोहर!

    आता हा इतका सुंदर संन्यासी पाहिल्यावर त्याला वश करून घेण्याकरिता निसर्गातील इतर फुलझाडेदेखील स्वतःचे सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करत असावेत, असं असावं बहुतेक! पाहा नं, मनमोहक बहावा आपल्या पिवळ्याधम्मक सोनसळी फुलांनी लदबदलेल्या आपल्या फांदीरूपी हाताने या भगव्या रंगाने नटलेल्या पळसाला आपल्या बाहुत घेण्याचा प्रयत्न करत असताना ‘आम्रपाली’ सिनेमातील मीना कुमारीप्रमाणे त्या पळसाला म्हणत असावा का?

    संसार से भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे?

    इस लोक को भी अपना न सके, उस लोक में भी पछताओगे…

    दुसरीकडे फॉरेनची जरी असली तरी आता भारतीय झालेली बोगनवेलीया सुद्धा आपला आकर्षक रंगांचा नटवेपणा दाखवून याला मोहात पाडण्यास उत्सुक असते. ती बोगनवेलसुद्धा त्याला आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी त्याचे आराधना करत असताना म्हणत असेल

    मुझको अपने गले लगा लो, ऐ मेरे हमराही

    तुम को क्या बतलाऊँ मैं के तुमसे कितना प्यार है…

    गुलमोहराचे मात्र वेगळेच काहीतरी सुरू असतं. हा आपल्या परदेशी नियमानुसार सतत पलाश वृक्षाशी तुलना करताना दिसतो. पळसाप्रमाणेच गुलमोहर आपल्या केशरी आणि लालभडक रंगाने आकर्षणाचे केंद्र होण्याचा प्रयत्न करत असतो… परंतु पळसाची बातच काही न्यारी आहे.

    काटेसांवर आपल्या मोठ्या आणि लालसर गुलाबी रंगाने पळसासमोर मीपण काही कमी नाही हे दाखवत असतो, परंतु वसंत ॠतुमधला मानांकित मात्र पलाशच (पळस)! पुराणांमध्ये नाही का एखाद्या ऋषींची तपस्या भंग करण्याकरता मेनका, अप्सरा, रंभा, उर्वशी आपले सौंदर्य पणास लावायच्या, तशा प्रकारेच या भगव्या रंगधारी संन्यासी पळस वृक्षाला आपल्या रुपाची आणि रंगाची मोहिनी घालण्याचा बहावा, काटेसांवर, बोगनवेलीया अशा सुंदर अप्सरा, मेनकारूपी झाडांचा प्रयत्न असावा. हे असं दरवर्षीच चाललेले असतं, परंतु हा आपला भगवा रंग ल्यालेला सुंदर पलाशरूपी संन्यासी यांना काही दाद देत नाही. आजपर्यंत तरी याची तपस्या निसर्गातील कोणतेही अप्सरारूपी झाड भंग करू शकले नाही.

    पळसाला फक्त संन्यस्त राहून आपल्या अंगीभूत असलेल्या गुणांनी इतरांना आपले औषधीयुक्त दान देऊन सुखी करणे इतकेच माहीत असतं. तो सहसा मोहपाशात अडकत नाही म्हणून तर तो इतरांपेक्षा वेगळा दिसतो. ‘पळसाला पाने तीनच’, ही म्हणसुद्धा या झाडाच्या हटवादीपणाला धरुनच असावी. हा वृक्ष खरच एखाद्या निष्काम कर्मयोग्यासारखा वाटतो. संन्यस्त राहून आपल्या शरीरावर फक्त तीन तीन पानांची वस्त्रे धारण करून वर्षभर समाधीस्थ व्हायचं आणि वसंतॠतू येताच, आपल्या भावसमाधीतून जागं होऊन आपल्या तपस्येने प्राप्त केलेले बल जगाच्या कल्याणाकरिता दान करायचे. या ऋतूमध्ये पळसाच्या झाडाकडे पाहिले की, अशा अनेक गोष्टी माझ्या मनात रुंजी घालू लागतात, म्हणून तर “रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा…” असा हा पलाश वृक्ष वाटतो.

    हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!

    तो भगवा, केशरी आहे, पण आकर्षक आहे. आपल्या रूपाने मनमोहीत करणारा आहे, डौलदार आहे… संन्यस्त वाटत असला तरी अनेकांना भुरळ पाडणारा आहे. आपल्या रंगाने तेजोमय असलेला हा पलाश स्वरक्षणासाठी सिद्ध असलेल्या एखाद्या योद्धा संन्याशासारखा आहे. या वृक्षाला पाहिले की, माझ्या कल्पनेचा वारू चौखूर उधळू लागतो. याच्या सौंदर्याकडे पाहिले की, तो दग्ध दिसत असला तरी मनःशांती देणारा शीतल गुणधर्माचा आहे. हा रूक्ष वाटत असला तरी, त्याच्या केशरी फुलांच्या दांड्यांना स्पर्श केलात तर मायेच्या मऊ हातासारखा आहे. तो खरंच वैरागी वाटत असला तरी आपल्या वैराग्याच्या रंगात सगळ्यांना रंगवणारा आहे.

    नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये आपल्याजवळचे जे असेल ते समर्पण करायचे आणि भविष्यातल्या एका नव्या संकल्प सिद्धीकरता ध्यानस्थ व्हायचे, अशा वैराग्याचा अनोखा नजारा पेश करत आपले वेगळेपण जपणारा हा पलाशवृक्ष खरंच संन्यस्त आहे.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    जॉबसंदर्भातील फाइलवरची स्वाक्षरी बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026 ललित

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026 ललित

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    April 24, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    जॉबसंदर्भातील फाइलवरची स्वाक्षरी बघून आराध्या चक्रावते…

    By प्रणाली वैद्यApril 24, 2026

    भाग – 22 तो तिला आतल्या खोलीत घेऊन गेला, आणि एका सुंदरशा सोफ्यावर बसायला सांगितलं.…

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    April 24, 2026

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जॉबसंदर्भातील फाइलवरची स्वाक्षरी बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 एप्रिल 2026

    April 24, 2026

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    April 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 277
    • अवांतर 183
    • आरोग्य 104
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 394
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 578
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जॉबसंदर्भातील फाइलवरची स्वाक्षरी बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026
    Most Popular

    जॉबसंदर्भातील फाइलवरची स्वाक्षरी बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.