मागील लेखात आपण योगासने अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. योगाभ्यासात मुद्रा अभ्यासाला विशेष महत्त्व आहे.
आरोग्यदायी हस्त मुद्रा म्हणजे काय?
आपले शरीर पंचतत्वांनी बनले असून आपल्या हातांच्या बोटांमध्ये पुढील प्रमाणे पंचतत्त्वे आहेत :
- अंगठा – अग्नीतत्व
- तर्जनी – वायूतत्व
- मध्यमा – आकाशतत्व
- अनामिका – पृथ्वीतत्व
- करंगळी – जलतत्व
हातांची बोटे जुळवून, एकमेकांवर दाब देऊन, एकमेकांत गुंफवून जी रचना तयार होते त्याला मुद्रा म्हणतात.
मुद्रा अभ्यास हातांच्या बोटांच्या साहाय्याने करतात, म्हणून यांना हस्त मुद्रा असे संबोधतात. या हस्त मुद्रा आपल्या व्याधी-विकारांवर नियंत्रण मिळवून आपणास आरोग्य प्रदान करतात, म्हणून या हस्त मुद्रांना आरोग्यदायी हस्त मुद्रा असे म्हणतात.
हेही वाचा – सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
हस्त मुद्रा अभ्यासासंबंधी महत्त्वाचे मुद्दे
- मुद्रा अभ्यास सर्व जण करू शकतात.
- दिवसभरात सोयीनुसार मुद्रा केल्या तरी चालते.
- मुद्रा दोन्ही हातांनी सहजपणे कराव्यात.
- मुद्रा अभ्यास श्रद्धेने करावा.
निवडक उपयुक्त हस्त मुद्रा
मानसिक आरोग्य संवर्धनासाठी पुढील निवडक उपयुक्त हस्त मुद्रांचा अभ्यास आवर्जून करावा.
- ध्यान मुद्रा
- ज्ञान मुद्रा
- प्राण मुद्रा
- शांत मुद्रा
- प्रार्थना मुद्रा
हस्त मुद्रा अभ्यासाचे मानसिक आरोग्य लाभ
शारीरिक व्याधी-विकारांचे निवारण करण्यासाठी आणि मानसिक संतुलनासाठी हस्त मुद्रांचा अभ्यास नक्कीच लाभदायी आहे. वरील सूचीतील निवडक उपयुक्त हस्त मुद्रांच्या अभ्यासातून मिळणारे विविध मानसिक आरोग्य लाभ साररूपाने पुढील प्रमाणे आहेत.
- मन शांत होऊन एकाग्रता वाढते.
- मन प्रसन्न होते.
- मानसिक संतुलन साधले जाते.
- मानसिक ताणतणाव कमी होतात.
- मानसिक स्वास्थ्य लाभते.
हेही वाचा – योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
आरोग्यदायी हस्त मुद्रांचा अभ्यास आवश्यकतेनुसार वेळोवेळी करणे नक्कीच हितावह आहे. हस्त मुद्रांच्या यथायोग्य अभ्यासातून साधकास निश्चितच शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ प्राप्त होतात.
योगाभ्यासातील निवडक उपयुक्त हस्त मुद्रांच्या कृती आणि फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक व मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.
आपण पुढील लेखात योगाभ्यासातील अशाच एका अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


