Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 7, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 07 एप्रिल 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 17 चैत्र शके 1948; तिथि : पंचमी 16:33; नक्षत्र : ज्येष्ठा 29:53
    • योग : व्यतिपात 16:15; करण : गरज 29:48;
    • सूर्य : मीन; चंद्र : वृश्चिक 29:53; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:53;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    भारतीय शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे

    टीम अवांतर

    भारतीय शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला. शंकर भिसे यांना लहानपणापासूनच शास्त्रीय मासिकांचे वाचन आणि लहान-सहान प्रयोग करण्याची आवड होती. एकदा रेल्वेने प्रवास करताना त्यांना काही अडचणी आल्या. त्यावर त्यांनी विचारपूर्वक संशोधन केले आणि पुढील स्टेशनचे नामदर्शक स्वयंचलित यंत्र आणि प्रवासोपयोगी डब्याचा स्वयंचलित दरवाजा यांचे शोध लावले. त्याकाळी पुण्यामध्ये पगड्या वापरत असत. त्यांनी पगड्या बनविण्याचे यंत्र बनविले.

    लंडनमधील ‘इन्व्हेंटर्स रिव्ह्यू अँड सायंटिफीक रेकॉर्ड’ यांच्यातर्फे एक स्पर्धा जाहीर केली होती. अवघ्या 14 तासांत भिसे यांनी स्वयंमापक यंत्र बनवून पारितोषिक तर मिळवलेच, परंतु औद्योगिक जगात या यंत्राने खळबळ उडवून दिली. लंडनच्या सोसायटी ऑफ सायन्स, लेटर्स अँड आर्टस् या संस्थेने त्यांना सन्माननीय सभासदत्व बहाल केले. अनेक देशीपरदेशी नियतकालिके, वर्तमानपत्रे यातून या स्वयंमापन यंत्राची सचित्र माहिती, लेख, संपादकीये लिहून आली आणि भारतातील भिसे यांना नवनिर्मितीचे मोठे संशोधक म्हणून जगन्मान्यता मिळाली.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    पुढे भिसे यांनी लंडन येथील वास्तव्यात रंगीत जाहिराती एकामागून एक प्रदर्शित करणारा दिवा आणि यंत्रणा बनविली, मालवाहक यंत्र, पिष्टमापक यंत्र (ऑटोमॅटिक वेईंग, रजिस्टरींग अँड डिलिव्हरींग मशीन) बनविले. त्याचप्रमाणे दुचाकी स्थिर ठेवणारे स्वयंचलित यंत्रही बनविले. याशिवाय मुद्रण व्यवसायात क्रांती घडविणारे भिसे टाईप यंत्र बनविले. या यंत्राचे त्यांनी इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स अशा अनेक देशात पेटंट मिळवले. लंडनमधील यंत्र तज्ज्ञांनी भिसे यांचा भारतीय एडिसन म्हणून गौरव केला.

    दातदुखी, पोटदुखी, मलेरिया, इन्फ्ल्यूएन्झा, पायोरिया इत्यादी रोगांवर उपयुक्त असे बेसेलीनवर संशोधन करुन शंकररावांनी त्याचे नाव आयोमिडीन ठेवले. पहिल्या महायुद्धात या औषधाने महत्त्वपूर्ण कार्य बजावले. त्यांनी विद्युत् क्षेत्रातही अनेक शोध लावले. विद्युतशक्तीच्या सहाय्याने वायूंचे पृथ:करण, तारेने छायाचित्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याची व्यवस्था आणि विद्युतशक्तीच्या सहाय्याने ऊर्जाशक्तीवर चालणारी मोटार बनवली. औद्योगिक रसायनशास्त्रात  रोली नामक धुलाई द्रव्याची निर्मितीही त्यांनी केली.

    प्रसिद्ध लोटस फिलॉसॉफी सेंटर आणि विश्वमंदिर प्रतिकृती त्यांनी बनविली. या संपूर्ण कार्याबद्दल भिसे यांचा न्यूयॉर्कमध्ये भव्य सत्कार करण्यात आला. त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या पदव्या बहाल करण्यात आल्या. अशा या महान शास्त्रज्ञाचे 7 एप्रिल 1935 रोजी न्यूयॉर्क येथे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस आरोग्यासाठी थोडा त्रासदायक असू शकतो. शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. व्यावसायिक जीवनात शिस्त राखणे अत्यावश्यक आहे. औदार्याची भावना प्रबळ असेल आणि समाजाकडून त्याची दखल घेतली जाईल.

    वृषभ – आजचा दिवस आनंदाचा आहे. घरातील वातावरण सुखद असेल. वैयक्तिक ध्येयांवर लक्ष केंद्रित कराल, व्यवसायात भरभराट होईल. समाजातील तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा यात वाढ होण्याचे संकेत आहेत. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला अधिक मानसिक पाठबळ मिळेल. औद्योगिक योजनांना गती मिळेल, ज्यामुळे भविष्यासाठी एक मजबूत पाया घातला जाईल.

    मिथुन – आधी केलेल्या मेहनतीमुळे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीत वाढ होईल. वेळेवर ध्येय गाठण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील, त्यामुळे सहकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील. आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे; शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा.

    कर्क – आजचा दिवस विविध निर्णय आणि त्यासाठी लागणाऱ्या समन्वयाने भरलेला असेल. तुमच्या क्षमतेनुसार जबाबदाऱ्या स्वीकाराल, ज्यामुळे समाजात आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल, परंतु तुमची बुद्धिमत्ता आणि नैतिक नियमांचे पालन केल्यामुळे विजयी व्हाल. शैक्षणिक क्षेत्रातील काही जातकांना महत्त्वाच्या संधीही मिळू शकतात.

    सिंह – आज तुम्हाला वागणुकीत आणि संवादात संयम बाळगण्याची गरज आहे. भावनिक होऊन कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. तुमचे लक्ष वैयक्तिक कामांवर केंद्रित राहील. आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असाल. करिअरमध्ये विवेकबुद्धीने पुढे जायला हवे. प्रियजनांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही व्यक्तीबद्दल कोणताही पूर्वग्रह टाळा.

    कन्या – आजचा दिवस धैर्य आणि शौर्याने भरलेला आहे. तुमचा समाजकार्यातील सहभाग वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा आणि  प्रतिष्ठा उंचावेल. व्यवसायात नफा मिळवण्याच्या नवीन संधी निर्माण होतील. सकारात्मक परिणामांमुळे उत्साह वाटेल. ओळखी आणि संवादामुळे अनेक प्रलंबित कामे पूर्ण व्हायला मदत होईल.

    तुळ – आज कुटुंबात सलोखा वाढेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते. लग्न समारंभाच्या निमित्ताने एखादी मोठी खरेदी केली जाईल. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आणि वागणुकीमुळे नोकरीचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात. महिला वर्गाची पारंपरिक कामांमधील आवड वाढेल, त्या घर सजवण्यावर लक्ष केंद्रित करतील.

    वृश्चिक – आजचा दिवस करिअरमधील प्रगतीसाठी उत्तम संधी घेऊन आला आहे. तुमची प्रतिभा आणि कौशल्ये ध्येये साध्य करण्यास मदत करतील. तुमच्या सर्जनशील प्रयत्नांचे कौतुक होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा, ज्यामुळे आयुष्यात सहजतेने पुढे जाता येईल. तुमच्या संपर्कांचे आणि संवादाचे वर्तुळ विस्तारेल, ज्याचा भविष्यात फायदा होईल.

    धनु – आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत घाई टाळा. महत्त्वाची कामे संयमाने आणि शिस्तीने पूर्ण करा. नातेसंबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. परदेशातील व्यवहारांना गती मिळू शकते, मात्र कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. इतरांच्या चुका माफ करायला शिका.

    हेही वाचा – देखल्या देवा…

    मकर – आजचा दिवस भरपूर संधी घेऊन येणारा आहे. तुमची कामगिरी अपेक्षेपेक्षा उत्तम होईल. कार्यशैलीत सकारात्मक बदल घडवाल. व्यावसायिक आघाडीवर ठामपणे उभे राहाल आणि सर्व अडथळ्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. परिणामी, व्यवसायातील नफा वाढेल, प्रलंबित कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. मित्रांसोबतचे संबंध सुधारतील.

    कुंभ – आजचा दिवस उच्च पद आणि सन्मान मिळवण्याचा आहे. वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे नव्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल आणि तुमचा व्यवसाय वाढवू शकाल. नवीन लोकांवर आंधळा विश्वास ठेवू नका; योग्य वेळेची वाट पाहा. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने वळू शकतील.

    मीन – आज तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यांमधील आवड वाढेल आणि त्याअनुषंगाने दूरचा प्रवास शक्य आहे. तुमच्या योजना यशस्वी होतील, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. प्रलंबित निधीच्या उपलब्धतेमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल, ज्यामुळे व्यावसायिक जीवनात फायदा होईल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 11, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 एप्रिल 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 21…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 18
    • ललित 548
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.